RCB vs CSK : आरसीबीच्या विजयानंतर विराट कोहली भावूक, अनुष्काचा आनंद गगनात मावेना, व्हीडिओ व्हायरल

virat kohli Emotional : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने चेन्नई सुपर किंग्ससवर रनरेटनुसार विजय मिळवत प्लेऑफमध्ये एन्ट्री मारली. आरसीबीच्या या थरारक विजयानंतर विराट कोहली भावूक झाला.

RCB vs CSK : आरसीबीच्या विजयानंतर विराट कोहली भावूक, अनुष्काचा आनंद गगनात मावेना, व्हीडिओ व्हायरल
Virat Kohli Emotional anushka sharmaImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: May 19, 2024 | 1:14 AM

विराट कोहली, आरसीबीचा माजी कर्णधार आणि आयपीएलच्या सुरुवातीपासून ते आतापर्यंत एकाच संघासाठी खेळणारा निष्ठावान खेळाडू. आरसीबीला गेल्या 16 वर्षांमध्ये एकदाही आयपीएल चॅम्पियन होता आलं नाही. मात्र आरसीबीने यंदा 17 व्या हंगामात अखेरच्या क्षणी कारनामा केला आहे. सलग 6 सामने गमावणाऱ्या आरसीबीने विजयी षटकार ठोकत प्लेऑफमध्ये धडक मारली आहे. आरसीबीने घरच्या मैदानात चेन्नई सुपर किंग्सचा 27 धावांनी पराभव करत 22 मार्चच्या पराभवाचा वचपा घेतला. तसेच आरसीबी प्लेऑफमध्ये  पोहचणारी चौथी टीम ठरली. आरसीबीच्या या विजयासह विराट कोहली हा भावूक झालेला दिसून आला. तर दुसऱ्या बाजूला विराटची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्मा हीलाही आनंद गगनात मावेनासा झाला.

आरसीबी आणि चेन्नई या दोन्ही संघांचा हा या हंगामातील अखेरचा आणि करो या मरो असा सामना होता. चेन्नईला प्लेऑफमध्ये पोहचण्यासाठी हा सामना केवळ जिंकायचा होता. मात्र आरसीबीला प्लेऑफच्या तिकीटासाठी हा सामना 18 धावांच्या फरकाने जिंकायचा होता. आरसीबीने चेन्नईसमोर 219 धावांचं आव्हान ठेवलं होतं. चेन्नईने या धावांचा पाठलाग करत आशा कायम ठेवल्या होत्या. आरसीबीला नेट रनरेटनुसार क्वालिफाय करण्यासाठी शेवटच्या 3 ओव्हरमध्ये विजयासाठी 50 आणि अखेरच्या षटकात 17 धावांचा बचाव करायचा होता. तर चेन्नईकडून रवींद्र जडेजा आणि महेंद्रसिंह धोनी ही घातक जोडी मैदानात होती.

कॅप्टन फाफ डु प्लेसीस याने यश दयाल याला अखेरची ओव्हर दिली. महेंद्रसिंह धोनीने यश दयालच्या पहिल्याच बॉलवर सिक्स ठोकला. मात्र आशा सोडतील ते आरसीबी फॅन्स कुठले? यश दयालने दुसऱ्याच बॉलवर धोनीला कॅच आऊट केलं आणि आरसीबीचा विजय निश्चित केला. यशने पुढील 4 बॉलमध्ये फक्त 1 धाव दिली. यशने यशस्वीपणे अखेरच्या ओव्हरमध्ये 17 धावांचा बचाव करताना फक्त 7 धावा दिल्या. आरसीबीने यासह इतिहास रचला आणि प्लेऑफचं तिकीट 14 गुणांसह मात्र नेट रनरेटच्या जोरावर मिळवलं.

विराटला आनंदाश्रू, अनुष्काही भावूक

विराटने या विजयानंतर मैदानात आनंदाने उड्या मारल्या. कॅप्टन फाफ डु प्लेसीस आणि अन्य सहकाऱ्यांना कडाडून मीठी मारली. पत्नी अनुष्कालाही आरीसीबीच्या विजयाचा आनंद झाला.

रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू प्लेइंग ईलेव्हन : फाफ डू प्लेसिस (कॅप्टन), विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल, रजत पाटीदार, कॅमेरॉन ग्रीन, महिपाल लोमरोर, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), कर्ण शर्मा, यश दयाल, लॉकी फर्ग्युसन आणि मोहम्मद सिराज.

चेन्नई सुपर किंग्ज प्लेइंग ईलेव्हन : ऋतुराज गायकवाड (कॅप्टन), रचिन रवींद्र, डॅरिल मिशेल, अजिंक्य रहाणे, रवींद्र जडेजा, महेंद्रसिंह धोनी (विकेटकीपर), मिचेल सँटनर, शार्दूल ठाकुर, तुषार देशपांडे, सिमरजीत सिंग आणि महेश तीक्षना.

'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप.
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र.
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?.
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले..
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले...
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'.
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?.
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ.
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण.
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.