RCB vs DC : इशांत शर्मा आणि विराट कोहलीचं भांडण! पाहा नेमका काय शेवट झाला ते Watch Video
आयपीएल 2024 स्पर्धेतील महत्त्वाचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात पार पडला. बंगळुरुच्या एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये हे दोन संघ भिडले. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने बाजी मारली. पण यात इशांत शर्मा आणि विराट कोहलीची वेगळीच जुगलबंदी पाहायला मिळाली. एक क्षण तर क्रीडाप्रेमींची धाकधूक वाढली होती.
आयपीएल स्पर्धेच्या 62व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि दिल्ली कॅपिटल्स हे संघ आमनेसामने आले होते. हा सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा होता. मात्र या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने बाजी मारली. दिल्लीने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने 20 षटकात 9 गडी गमवून 187 धावा केल्या आणि विजयासाठी 188 धावांचं आव्हान दिलं. दिल्लीचा संघ 19.1 षटकात सर्वबाद 140 धावा करू शकला आणि 47 धावांनी पराभवाचं तोंड पाहावं लागलं. या सामन्यात विराट कोहली 13 चेंडूत 27 धावा करून बाद झाला. यात त्याने 3 षटकार आणि एक चौकार मारला. विराटला बाद करण्यात इशांत किशनला यश आलं. इशांतच्या गोलंदाजीवर फटका मारताना चुकला आणि थेट कट लागून अभिषेक पोरेलच्या हाती चेंडू गेला. बाद केल्यानंतर या दोघांमध्ये शाब्दिक चकमक पाहायला मिळाली. इशांतने विराटला पहिल्यांदाच टी20 मध्ये बाद केले. विराटला बाद केल्यानंतर त्याच्या आनंदाला पारावार उरला नाही.
इशांतने विराट कोहलीला डिवचण्याची संधी सोडली नाही. त्याच्या जवळ जात त्याला डिवचलं. इशांतने अशी कृती करताच मैदानात उपस्थित आणि लाईव्ह सामना पाहणाऱ्यांना भीती वाटली. कारण विराट कोहली मैदानात असं कोणी काय केलं तर ऐकतंच नाही. अशी अनेक उदाहरणं आतापर्यंत पाहिली आहेत. विराट कोहलीला ढकलल्यानंतरही खाली बघत हसत पॅव्हेलियनमध्ये परतला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
— Reeze-bubbly fan club (@ClubReeze21946) May 12, 2024
विशेष म्हणजे विराट कोहलीने आऊट होण्यापूर्वी इशांत शर्माला डिवचलं होतं. इशांतच्या पहिल्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकला होता. तसेच त्याच्याकडे जात त्याला काहीतरी म्हणाला होता. त्यानंतर दुसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर विराटने चौकार ठोकला होता. पण त्यानंतर इशांत शर्माने त्याला बाद केलं. इतकंच काय तर इशांत शर्मा फलंदाजीला आला तेव्हाही विराट त्याच्याशी मस्करी करताना दिसला. त्यांच्या हसण्याचा आणि बोलण्याचा व्हिडीओही व्हायरल होत आहे.
Kohli – Ishant moment. 😄👌
– When 2 West Delhi Boys meet each other….!!!! pic.twitter.com/ZX751RwrlR
— Johns. (@CricCrazyJohns) May 13, 2024
खरं सांगायचं तर विराट कोहली आणि इशांत शर्मा हे दोघेही चांगले मित्र आहेत. दोघेही लहानपणापासून दिल्लीसाठी एकत्र डॉमेस्टिक क्रिकेट खेळत मोठे झाले. इशांत शर्माने मुलाखतीत या मैत्रीचा उलगडा केला आहे. त्यानंतर आयपीएलमध्ये हे दोन मित्र आमनेसामने आले.