IPL 2024 RCB vs GT Live Streaming : आरसीबी गुजरातचा गेम बिघडवणार? कोण जिंकणार?
Royal Challengers Bengaluru vs Gujarat Titans Live Streaming : आरसीबी आणि गुजरात दोन्ही संघ आयपीएलच्या 17 व्या मोसमात पहिल्यांदाच आमनेसामने असणार आहेत.
आयपीएलच्या 17 व्या मोसमातील 52 व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध गुजरात टायटन्स आमनेसामने असणार आहेत. शुबमन गिल याच्याकडे गुजरातची धुरा आहे. तर फाफ डु प्लेसीस आरसीबीची कॅप्टन्सी करणार आहे. आरसीबी आणि गुजरातचा हा 11 वा सामना असणार आहे. आरसीबीने 10 पैकी 3 सामने जिंकले आहेत. आरसीबी पॉइंट्स टेबलमध्ये सर्वात शेवटी आहे. तर गुजरात आठव्या स्थानी आहे. गुजरातला 10 पैकी 4 सामन्यात यश आलं आहे. गुजरातला प्लेऑफमधील आव्हान कायम ठेवायचं असेल, तर त्यांना कोणत्याही परिस्थितीत हा सामना जिंकावा लागणार आहे. गुजरातची ‘करो या मरो’ अशा स्थिती आहे. तर आरसीबी गुजरातवर मात करुन त्यांचा खेळ बिघडवू शकते. त्यामुळे या सामन्यात चांगलीच रस्सीखेच पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
आरसीबी विरुद्ध गुजरात सामना केव्हा?
आरसीबी विरुद्ध गुजरात यांच्यातील सामना हा शनिवारी 4 मे रोजी होणार आहे.
आरसीबी विरुद्ध गुजरात सामना कुठे?
आरसीबी विरुद्ध गुजरात सामना एम चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळुरु येथे होणार आहे.
आरसीबी विरुद्ध गुजरात सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?
आरसीबी विरुद्ध गुजरात सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होईल. तर 7 वाजता टॉस होईल.
आरसीबी विरुद्ध गुजरात सामना टीव्हीवर कुठे पाहता येईल?
आरसीबी विरुद्ध गुजरात सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहता येईल.
आरसीबी विरुद्ध गुजरात सामना मोबाईलवर कुठे पाहायला मिळणार?
आरसीबी विरुद्ध गुजरात मोबाईलवर जिओ सिनेमा एपवर मोफत पाहायला मिळेल.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु टीम : फाफ डू प्लेसिस (कर्णधार) यश दयाल, विजयकुमार वैशाख, रीस टोपले, स्वप्नील सिंग, कर्ण शर्मा, हिमांशू शर्मा, राजन कुमार, मोहम्मद सिराज, अल्झारी जोसेफ, लॉकी फर्ग्युसन, मयंक डागर, सुयश प्रभुदेसाई, ग्लेन मॅक्सवेल, महिपाल लोमरोर, विल जॅक्स, कॅमरन, कॅमरून , मनोज भंडागे, आकाश दीप, रजत पाटीदार, विराट कोहली, दिनेश कार्तिक, सौरव चौहान आणि अनुज रावत.
गुजरात टायटन्स टीम : शुबमन गिल (कॅप्टन), डेव्हिड मिलर, ऋद्धीमान साहा, साई सुधारसन, शाहरुख खान, मॅथ्यू वेड, केन विल्यमसन, अजमतुल्ला ओमरझाई, अभिनव मनोहर, राशीद खान, विजय शंकर, राहुल तेवतिया, स्पेन्सर जॉन्सन, कार्तिक त्यागी, जोशुआ लिटल, दर्शन नळकांडे, नूर अहमद, आर साई किशोर, मोहित शर्मा, जयंत यादव, उमेश यादव, सुशांत मिश्रा, संदीप वॉरियर, शरथ बीआर आणि मानव सुथार.