6 6 6 6 6 : बंगळुरूमध्ये निकोलस पूरन यांचं वादळ, स्टेडियमच्या बाहेर लावला गरगरीत सिक्सर, पाहा Video
Nicholas Pooran hit 106 meter six : चिन्नास्वामी स्टेडियममध्ये सहज सिक्सर जातात, लखनऊ आणि बंगळुरूमधील सामन्यात निकोलस पूरन याने पाच सिक्सर मारले. यामधील एक सिक्स त्याने स्टेडियमच्या बाहेर मारला. व्हिडीओ सोशल मीडियावर झाला आहे.
आयपीएल 2024 मधील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यातील सामन्यात निकोलस पूरन याने वादळी खेळी केली. प्रथम फलंदाजी करणाऱ्या लखनऊने 20 ओव्हरमध्ये 181-5 धावा केल्या. यामध्ये सर्वाधिक 70 धावा क्विंटन डिकॉक याने केल्या. आरसीबीच्या गोलंदाजांनी दमदार गोलंदाजी करत लखनऊच्या धावांना ब्रेक लावला होता. त्यामुळे लखनऊ 160 धावसंख्येपर्यंत पोहोचतात की नाही याबाबत शंका होती. मात्र निकोलस पूरन याचं वादळ आलं आणि आरसीबीच्या गोलंदाजांना नेस्तनाबूत केलं. गड्याने पाच सिक्स मारले यामधील एक सिक्स तर स्टेडियमच्या बाहेर लावला. व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
पाहा व्हिडीओ:-
Topley to Pooran
106 meters SIX smashed by Pooran#RCBvsLSGpic.twitter.com/4acwzQDHec
— Don Cricket 🏏 (@doncricket_) April 2, 2024
निकोलस पूरन याने टॉप गिअरमध्ये धडाकेबाज बॅटींग केली.
21 बॉलमध्ये 5 सिक्सर आणि 1 चौकार मारत नाबाद 40धावा करत आरसीबीच्या गोलंदाजांवर हल्ला चढवला. पूरन याने टॉपलीच्या एका ओव्हरमध्ये सलग तीन षटकार मारत आरसीबीला शेवटच्या ओव्हर्समध्ये बॅकफूटला ढकललं.
106M SIX BY NICHOLAS POORAN. 🤯#RCBvsLSG pic.twitter.com/FqjXMwpzbh
— JOHNS (@criccrazyjohns9) April 2, 2024
दोन्ही संघांची प्लेइंग 11
विराट कोहली, फाफ डु प्लेसिस (C), कैमरून ग्रीन, ग्लेन मैक्सवेल, रजत पाटीदार, दिनेश कार्तिक, अनुज रावत (WK), रीस टॉपले, मयंक डागर, मोहम्मद सिराज, यश दयाल
लखनऊ सुपर जायंट्स (प्लेइंग इलेवन): क्विंटन डी कॉक (WK), केएल राहुल (C), देवदत्त पडिक्कल, मार्कस स्टोइनिस, निकोलस पूरन, आयुष बदोनी, क्रुणाल पंड्या, रवि बिश्नोई, यश ठाकुर, नवीन-उल-हक, मयंक यादव