IPL 2024, RR vs RCB : राजस्थान रॉयल्सचा विजयी चौकार, विराटची शतकी खेळी बटलरपुढे पाण्यात

आयपीएल 2024 स्पर्धेत राजस्थान रॉयल्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुवर 6 गडी राखून विजय मिळवला. या स्पर्धेत राजस्थानने रॉयल्स चॅलेंजर्सने विजयी चौकार मारला आहे. या विजयासह गुणतालिकेत अव्वल स्थान गाठलं आहे. तसेच विराट कोहलीची शतकी खेळीही व्यर्थ गेली आहे.

IPL 2024, RR vs RCB : राजस्थान रॉयल्सचा विजयी चौकार, विराटची शतकी खेळी बटलरपुढे पाण्यात
Follow us
| Updated on: Apr 06, 2024 | 11:07 PM

आयपीएल 2024 स्पर्धेत राजस्थान रॉयल्सने सलग चौथा विजय मिळवला आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा 8 गडी राखून पराभव केला आहे. या विजयासह किंग कोहलीची शतकी खेळी पाण्यात गेली आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने 20 षटकात 3 गडी गमवून 183 धावा केल्या. तसेच विजयासाठी 184 धावा दिल्या होत्या. हे आव्हान राजस्थान रॉयल्स संघाने 4 गडी गमवून पूर्ण केलं. या सामन्यात विराट कोहलीचं शतक संजू सॅमसन आणि जोस बटलरच्या खेळीपुढे व्यर्थ गेलं.  जोस बटलरने 58 चेंडूत 9 चौकार आणि 4 षटकाराच्या मदतीने नाबाद 100 धावा केल्या.या विजयासह राजस्थान रॉयल्सने दोन गुणांची कमाई केली आहे. तसेच 8 गुणांसह थेट अव्वल स्थानी झेप घेतली आहे. त्यामुळे प्लेऑफच्या दिशेने राजस्थान रॉयल्सने कूच सुरु केली आहे. तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा हा चौथा पराभव आहे. त्यामुळे या स्पर्धेतील आव्हान आणखी खडतर होत जाणार आहे.

राजस्थान रॉयल्सचा डाव

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने दिलेल्या धावांचा पाठलाग करताना राजस्थानची सुरुवात निराशाजनक राहिली. यशस्वी जयस्वालला आपलं खातंही खोलता आलं नाही. रिसी टोपलेच्या गोलंदाजीवर मॅक्सवेलने त्याचा झेल पकडला. यशस्वीच्या नावावर सिल्व्हर डक कोरला गेला. त्यानंतर जोस बटल आणि संजू सॅमसन यांनी सावध खेळी केली. दुसऱ्या गड्यासाठी या दोघांनी 148 धावांची भागीदारी केली. संजू सॅमसन 42 चेंडूत 69 धावा करून बाद झाला. त्याने 8 चौकार आणि दोन षटकार ठोकले. त्यानंतर आलेल्या रियान परागला काही खास करता आलं नाही. रियान पराग 4 धावा करून बाद झाला.  ध्रुव जुरेलही मैदानात आला आणि हजेरी लावून गेला. त्याला फक्त दोन धावा करता आल्या.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा डाव

विराट कोहली आणि फाफ डू प्लेसिस या जोडीने बंगळुरुला चांगली सुरुवात करून दिली. 14 षटकात या दोघांनी मिळून 125 धावांची भागीदारी केली. मात्र शेवटच्या चेंडूवर फाफ युझवेंद्र चहलच्या गोलंदाजीवर बाद झाला. जोस बटलरने त्याचा झेल घेतला आणि तंबूत पाठवलं. फाफने 33 चेंडूत 2 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 44 धावा केल्या. त्यानंतर आलेला ग्लेन मॅक्सवेल फॉर्मसाठी झुंजताना दिसला. या सामन्यातही तो फेल ठरला आणि 1 धाव करून नांद्रे बर्गरच्या गोलंदाजीव त्रिफळाचीत झाला. सौरव चौहानने विराट कोहलीला साथ दिली मात्र काही खास करू शकला नाही. 6 चेंडूत एका षटकाराच्या मदतीने 9 धावा केल्या चहलच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्यानंतरही विराट कोहलीने फटकेबाजी सुरुच ठेवली आणि आणि या पर्वातील पहिलं शतक ठोकलं. 72 चेंडूत 12 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने नाबाद 113 धावा केल्या.

दोन्ही संघांची प्लेइंग 11

रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (प्लेइंग इलेव्हन): विराट कोहली, फाफ डू प्लेसिस (कर्णधार), रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, कॅमेरॉन ग्रीन, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), सौरव चौहान, रीस टोपले, मयंक डागर, मोहम्मद सिराज, यश दयाल.

राजस्थान रॉयल्स (प्लेइंग इलेव्हन): यशस्वी जयस्वाल, जोस बटलर, संजू सॅमसन (विकेटकीपर/कर्णधार), रियान पराग, ध्रुव जुरेल, शिमरॉन हेटमायर, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, आवेश खान, नांद्रे बर्गर, युझवेंद्र चहल.

लाडक्या बहिणींनो खुशखबर! 'या' महिन्यानंतर 2100 रुपये मिळणार
लाडक्या बहिणींनो खुशखबर! 'या' महिन्यानंतर 2100 रुपये मिळणार.
मोफत अन्न बंद करण्यावरून भिकाऱ्यांवर नेम, विखेंच्या प्रतिष्ठेची कोंडी
मोफत अन्न बंद करण्यावरून भिकाऱ्यांवर नेम, विखेंच्या प्रतिष्ठेची कोंडी.
'त्याला भाजप संपवतो...म्हणून शिंदे अन् दादांची नार्को टेस्ट करा'- कडू
'त्याला भाजप संपवतो...म्हणून शिंदे अन् दादांची नार्को टेस्ट करा'- कडू.
मतदारांचा अपमान,संजय गायकवाडांची घसरली जीभ तर अजितदादांचीही उर्मट भाषा
मतदारांचा अपमान,संजय गायकवाडांची घसरली जीभ तर अजितदादांचीही उर्मट भाषा.
2 कोटींच्या खंडणीची डील थेट मुंडेंच्या सरकारी बंगल्यावर? धसांचा आरोप
2 कोटींच्या खंडणीची डील थेट मुंडेंच्या सरकारी बंगल्यावर? धसांचा आरोप.
'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण
'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण.
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट.
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ.
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये.