IPL 2024, RCB vs RR : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने पंजाबसमोर ठेवलं 242धावांचं लक्ष्य, कोण मारणार बाजी?
आयपीएल 2024 स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि पंजाब किंग्स हे दोन संघ आमनेसामने आहेत. या सामन्यात पराभूत होणारा संघ स्पर्धेतून बाहेर पडणार आहे. त्यामुळे विजय किती महत्त्वाचा आहे अधोरेखित होत आहे. दरम्यान बंगळुरुने 20 षटकात गडी गमवून धावा केल्या.
आयपीएल 2024 स्पर्धेतील 58वा सामना पंजाब किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात होत आहे. हा सामना प्लेऑफच्या दृष्टीने खूपच महत्त्वाचा आहे. दोन्ही संघ प्लेऑफसाठी जर तरच्या वेशीवर आहेत. पण कधीही काहीही होऊ शकतं या अपेक्षेने झुंज देत आहेत. या सामन्यात नाणेफेकीचा कौल पंजाब किंग्सच्या बाजूने लागला. पंजाब किंग्सचा कर्णधार सॅम करनने क्षणाचाही विलंब न करता प्रथम गोलंदाजीला प्राधान्य दिलं. मागच्या सामन्यातही हाच निर्णय घेतला होता. मात्र तेव्हा सर्व गणित फिस्कटलं होतं. पण पुन्हा एका सॅम करनने गोलंदाजी घेण्याचा निर्णय घेतला आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने 20 षटकात 7 गडी गमवून 241 धावा केल्या. तसेच विजयासाठी 242 धावांचं आव्हान दिलं आहे. आता बंगळुरुने दिलेलं आव्हान पंजाब गाठणार का? असा प्रश्न क्रीडाप्रेमींना पडला आहे. पंजाबच्या तुलनेत बंगळुरुचा नेट रनरेट चांगला आहे. त्यामुळे जर तरच्या गणितात बंगळुरुला संधी मिळू शकते.
विराट कोहली आणि फाफ डु प्लेसिस ही जोडी मैदानात उतरली होती. मात्र तिसऱ्या षटकात फाफची विकेट पडली. 9 धावा करून तंबूत परतला. विल जॅक्सही काही खास करू शकला नाही. 12 धावांवर असताना त्याला विधवथ केवरप्पाने तंबूत पाठवलं. त्यानंतर विराट कोहलीने रजत पाटीदार सोबत मोठी भागीदारी केली. संघाच्या 119 धावा असताना सॅम करनने रजत पाटीदारला तंबूत पाठवलं. त्याने 23 चेंडूत 6 षटकार आणि 3 चौकारांच्या मदतीने 55 धावा केल्या. दुसरीकडे, विराट कोहलीने आपली रनमशिन सुरु ठेवली होती. त्याला कॅमरून ग्रीनची साथ मिळाली. मधल्या काळात पावसाने हजेरी लावल्याने दुसऱ्या डावात गोलंदाजी करणं अजून कठीण जाऊ शकतं. विराट कोहलीने 47 चेंडूत 92 धावांची खेळी केली. यात 7 चौकार आणि 6 षटकार मारले. त्याचं या स्पर्धेतील दुसरं शतक अवघ्या 8 धावांनी हुकलं.
दोन्ही संघांची प्लेइंग 11
रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (प्लेइंग इलेव्हन): विराट कोहली, फाफ डू प्लेसिस (कर्णधार), विल जॅक्स, रजत पाटीदार, महिपाल लोमरोर, कॅमेरॉन ग्रीन, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), स्वप्नील सिंग, कर्ण शर्मा, मोहम्मद सिराज, लॉकी फर्ग्युसन.
पंजाब किंग्ज (प्लेइंग इलेव्हन): जॉनी बेअरस्टो (विकेटकीपर), प्रभसिमरन सिंग, रिली रोसो, शशांक सिंग, सॅम कुरन (कर्णधार), लियाम लिव्हिंगस्टोन, आशुतोष शर्मा, हर्षल पटेल, राहुल चहर, अर्शदीप सिंग, विद्वत कवेरप्पा.