RCB vs SRH : दिनेश कार्तिकची अफलातून खेळी पण हैदराबादच विजयी, बंगळुरुवर 25 धावांनी मात

IPL 2024 RCB vs SRH Highlights In Marathi : दिनेश कार्तिकने सनरायजर्स हैजराबाद विरुद्ध एकाकी झुंज दिली. हैदराबाद जिंकली पण पुन्हा एकदा दिनेश कार्तिकने आपला धमाका दाखवून दिला.

RCB vs SRH : दिनेश कार्तिकची अफलातून खेळी पण हैदराबादच विजयी, बंगळुरुवर 25 धावांनी मात
dinesh karthik,Image Credit source: BCCI/IPL
Follow us
| Updated on: Apr 15, 2024 | 11:34 PM

सनरायजर्स हैदराबादने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुवर धावांनी मात केली आहे. सनरायजर्स हैदराबादने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला विजयासाठी 288 धावांचं आव्हान दिलं होतं. आरसीबीने या धावांचा पाठलाग करताना जोरदार झुंज दिली. दिनेश कार्तिकने एक बाजू धरुन किल्ला लढवला. मात्र बंगळुरचे प्रयत्न 25 धावांनी अपुरे पडले. आरसीबीला  20 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 262 धावांपर्यंत मजल मारता आली.  दिनेश कार्तिकच्या खेळीमुळे आरसीबीला विजयी होता आलं नाही. मात्र कार्तिकने 83 धावांची खेळी करुन विजयातील फरक निश्चित कमी केला.

आरसीबीने विजयी धावांचा पाठलाग करताना जोरदार सुरुवात केली. कॅप्टन फाफ डु प्लेसीस आणि विराट कोहली या दोघांनी 80 धावांची सलामी भागीदारी केली. त्यानंतर विराट 42 धावांवर आऊट झाली. विराटनंतर हैदराबादने आरसीबी ठराविक अंतराने धक्के दिले. फाफ डु प्लेसीस याचा अपवाद वगळता टॉप आणि मिडल ऑर्डरमधील फलंदाजांनी निराशा केली. फाफने 62 धावांची खेळी केली. तर विल जॅक्स 7, रजत पाटीदार 9, सौरव चौहान झिरोवर आऊट झाला.

हैदराबादला मोठ्या फरकाने विजयाची संधी होती मात्र दिनेश कार्तिकने त्यांना सहजासहजी जिंकून दिलं नाही. कार्तिकने एक बाजू लावून धरुन हैदराबादला चांगलं धारेवर धरलं. कार्तिकने आपल्या अनुभवाच्या जोरावर अफलातून बॅटिंग केली. मात्र त्याला दुसऱ्या बाजूने अपेक्षित साथ मिळाली नाही. महिपाल लोमरुर 11 धावा करुन माघारी परतला. तर अनुज रावत 25* आणि विजयकुमार वैशाख याने 1* धाव केली. हैदराबादकडून पॅट कमिन्स याने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. मयंक मार्कंडे याने दोघांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. तर टी नटराजन याने 1 विकेट घेतली.

हैदराबादची बॅटिंग

त्याआधी आरसीबीने टॉस जिंकून हैदराबादला बॅटिंगसाठी भाग पाडलं. हैदराबादने या संधीचा पूर्ण फायदा घेतला. हैदराबादने आपलाच 19 दिवसांआधीचा रेकॉर्ड ब्रेक करत इतिहास रचला. हैदराबादने ट्रेव्हिस हेड याच्या शतकाच्या जोरावर आयपीएलमधील हायेस्ट स्कोअर केला. हैदराबादने 20 ओव्हरमध्ये 3 विकेट्स गमावून 287 धावा केल्या.

हैदराबादकडून अभिषेक शर्मा याने 34, ट्रेव्हिस हेड 102 आणि हेन्रिक क्लासेन याने 67 धावा केल्या. तर एडन मारक्रम आणि अब्दुल समद ही जोडी अनुक्रमे 32 आणि 37 नाबाद धावा करुन परतली. आरसीबीकडून लॉकी फर्ग्यूसन याने 2 विकेट्स घेतल्या. तर रीसे टॉपली याने 1 विकेट घेतली.

रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू प्लेइंग ईलेव्हन : फाफ डू प्लेसिस (कॅप्टन), विराट कोहली, विल जॅक्स, रजत पाटीदार, सौरव चौहान, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), महिपाल लोमरोर, विजयकुमार विशक, रीस टोपले, लॉकी फर्ग्युसन आणि यश दयाल.

सनरायझर्स हैदराबाद प्लेइंग ईलेव्हन : पॅट कमिन्स (कर्णधार), ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, एडन मार्करम, नितीश रेड्डी, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अब्दुल समद, शाहबाज अहमद, भुवनेश्वर कुमार, जयदेव उनाडकट आणि टी नटराजन.

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.