IPL 2024, RR vs DC : राजस्थान दिल्ली संघातील या खेळाडूंकडे असेल सामन्याची चावी, जाणून घ्या बेस्ट प्लेयर्स
आयपीएल 2024 स्पर्धेतील 56वा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात होत आहे. प्लेऑफच्या दृष्टीने दिल्लीला हा सामना काहीही करून जिंकायचा आहे. तर राजस्थानचं प्लेऑफमधील स्थान जवळपास निश्चित झालं आहे. असं असलं तरी या सामन्यात 11 खेळाडूंकडे सामना फिरवण्याची ताकद आहे.
आयपीएल 2024 स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना होणार आहे. गुणतालिकेत राजस्थानचा संघ दुसऱ्या, दिल्लीचा संघ सहाव्या स्थानावर आहे. राजस्थानचे 16 गुण असून प्लेऑफमधील स्थान जवळपास निश्चित आहे. तर दिल्ली कॅपिटल्सने 11 सामन्यात 10 गुण मिळवले असून सहाव्या स्थानावर आहे. त्यामुळे उर्वरित तीन सामन्यात विजय मिळवून प्लेऑफमध्ये स्थान मिळवू शकतो. त्यामुळे हा सामना खऱ्या अर्थाने दिल्ली कॅपिटल्सच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. दिल्लीच्या अरुण जेटली मैदानात हा सामना पार पडणार आहे. दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स आयपीएल स्पर्धेत 28 वेळा आमनेसामने आले आहेत. यात दिल्लीने 13, राजस्थानने 15 वेळा विजय मिळवला आहे. अरुण जेटली मैदानात 8 वेळा भिडले असून यात दिल्लीचं पारडं जड आहे. दिल्लीने 5, तर राजस्थानने तीन वेळा विजय मिळवला आहे.
या मैदानातील खेळपट्टी ही फलंदाजांना पूरक आहे. या खेळपट्टीवर 200 पार धावसंख्या होऊ शकते. ही खेळपट्टी फिरकीपटूंना मदत करेल. तसेच दव फॅक्टरने काहीही फरक पडणार नाही. रिकी पॉटिंग यांच्या मते दिल्ली हैदराबाद सामना झाला त्यात खेळपट्टीवर हा सामना होणार आहे. ही खेळपट्टी फिरकीपटूंसाठी चांगली ठरेल. तसेच मोठे मारणं वाटतं तितकं सोपं नाही. या सामन्यावेळी पावसाची काहीच शक्यता नाही. धुळीमुळे थोडा त्रास होऊ शकतो.
राजस्थान रॉयल्सकडून 6 आणि दिल्ली कॅपिटल्सकडून 5 खेळाडू महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. राजस्थान रॉयल्सकडून जोस बटलर, संजू सॅमसन, यशस्वी जयस्वाल, रियान पराग, ट्रेंट बोल्ट आणि युझवेंद्र चहल महत्त्वाची भूमिका बजावतील. तर दिल्ली कॅपिटल्सकडून ऋषभ पंत, ट्रिस्टन स्टब्स, जैक फ्रेझर मॅकगुर्क, अक्षर पटले आणि कुलदीप यांच्या कामगिरीकडे लक्ष असेल.
दोन्ही संघांची प्लेइंग 11
राजस्थान रॉयल्स : यशस्वी जयस्वाल, जोस बटलर, संजू सॅमसन (विकेटकीपर/कर्णधार), रियान पराग, ध्रुव जुरेल, शिमरॉन हेटमायर, रोवमन पॉवेल, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, आवेश खान, युझवेंद्र चहल.
दिल्ली कॅपिटल्स : डेविड वॉर्नर, जैक फ्रेझर मॅकगुर्क, अभिषेक पोरेल, शाई होप, ऋषभ पंत (कर्णधार/विकेटकीपर), ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रसिख सलाम, मुकेश कुमार, खलील अहमद.