RR vs GT : 25 मिनिटांच्या विलंबाने टॉस, गुजरातच्या बाजूने नाणेफेकीचा कौल
Rajasthan Royals vs Gujarat Titan Toss Ipl 2024 : राजस्थान रॉयल्सने या हंगामात आतापर्यंत खेळलेले चारही सामने जिंकलेले आहेत. त्यामुळे गुजरातसमोर राजस्थानला रोखण्याचं आव्हान असणार आहे.
आयपीएलच्या 17 व्या मोसमातील 24 व्या सामन्यात राजस्थान रॉयल्स विरुद्ध गुजरात टायटन्स आमनेसामने आहेत. संजू सॅमसन राजस्थान रॉयल्सचं नेतृत्व करणार आहे. तर शुबमन गिल याच्याकडे गुजरातची सूत्रं आहेत. हा सामना सवाई मानसिंह स्टेडियम, जयपूर येथे होणार आहे. सामन्याला नियोजित वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात तर 7 वाजता टॉस होणं अपेक्षित होतं. मात्र पावसामुळे 25 मिनिटांच्या विलंबाने 7 वाजून 25 मिनिटांनी टॉस झाला. गुजरातने टॉस जिंकला. कॅप्टन शुबमन गिल याने फिल्डिंगचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे 7 वाजून 40 मिनिटांनी सुरुवात होणार आहे.
हेड टु हेड रेकॉर्ड्स
आयपीएलच्या इतिहासात दोन्ही संघ आतापर्यंत एकूण 5 वेळा आमनेसामने आले आहेत. गुजरात यामध्ये वरचढ राहिली आहे. गुजरातने 4 सामन्यात विजय मिळवला आहे. तर राजस्थानला 1 सामन्यात विजय मिळवता आला आहे. त्यामुळे आकड्यांच्या हिशोबाने गुजरात राजस्थानवर वरचढ आहे. मात्र राजस्थान या हंगामात आतापर्यंत अजिंक्य आहे. राजस्थानने या मोसमात खेळलेल्या चारही सामन्यात विजय मिळवला आहे. तर गुजरातने 5 पैकी 2 सामने जिंकले आहेत. त्यामुळे गुजरातसमोर राजस्थानचा विजयरथ रोखून विजयी ट्रॅकवर परतण्याचं आव्हान असणार आहे.
गुजरात टीममध्ये बदल
गुजरात टायटन्सने प्लेईंग ईलेव्हनमध्ये बदल केले आहेत. डेव्हिड मिलर आणि ऋद्धीमान साहा हे दोघे दुखापतीतून सावरत आहेत. तर बीआर शरथ याच्या जागी अभिनव मनोहर याला संधी देण्यात आली आहे. तर मॅथ्यू वेड याचं कमबॅक झालं आहे. वेडला केन विलियमसन याच्या जागी संधी देण्यात आली आहे.
गुजरातने टॉस जिंकला
🚨 Toss Update 🚨
Gujarat Titans win the toss and elect to field against Rajasthan Royals.
Follow the Match ▶️ https://t.co/1HcL9A97Ch#TATAIPL | #RRvGT pic.twitter.com/Hw76YqvfOW
— IndianPremierLeague (@IPL) April 10, 2024
राजस्थान रॉयल्स प्लेइंग ईलेव्हन : संजू सॅमसन (कॅप्टन आणि विकेटकीपर), यशस्वी जयस्वाल, जोस बटलर, रियान पराग, ध्रुव जुरेल, शिमरॉन हेटमायर, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, आवेश खान, कुलदीप सेन, युझवेंद्र चहल
गुजरात टायटन्स प्लेइंग ईलेव्हन : शुभमन गिल (कॅप्टन), साई सुदर्शन, विजय शंकर, अभिनव मनोहर, मॅथ्यू वेड (विकेटकीर), राहुल तेवतिया, रशीद खान, उमेश यादव, स्पेन्सर जॉन्सन, नूर अहमद आणि मोहित शर्मा.