RR vs GT : राशिद खान गुजरातच्या विजयाचा नायक, राजस्थानवर शेवटच्या चेंडूवर मात

IPL 2024 Rajasthan Royals vs Gujarat Titans Highlights In Marathi : राजस्थान रॉयल्सने गुजरात टायटन्सला विजयासाठी 197 धावांचं आव्हान दिलं होतं.

RR vs GT : राशिद खान गुजरातच्या विजयाचा नायक, राजस्थानवर शेवटच्या चेंडूवर मात
rashid khan rr vs gt ipl 2024,
Follow us
| Updated on: Apr 11, 2024 | 12:11 AM

गुजरात टायटन्सने शेवटच्या चेंडूवर राजस्थान रॉयल्सवर सनसनाटी विजय मिळवला आहे. गुजरातला विजयासाठी शेवटच्या चेंडूवर 2 धावांची गरज होती. तेव्हा राशिद खान याने चौकार ठोकून गुजरातला विजय मिळवून दिला. गुजरातने राजस्थानचा विजयी रथ रोखला. गुजरातने राजस्थानवर 3 विकेट्सने मात केली. राजस्थान रॉयल्सने गुजरात टायटन्ससमोर विजयासाठी 197 धावांचं आव्हान ठेवलं होतं. राजस्थानने हे आव्हान 7 विकेट्स गमावून 20 ओव्हरमध्ये पूर्ण केलं. गुजरातने 199 धावा केल्या. राहुल तेवतिया आणि राशिद खान ही जोडी गुजरातच्या विजयाची शिल्पकार ठरली. या दोघांनी अखेरच्या क्षणी निर्णायक खेळी करुन गुजरातला सामना जिंकून देण्यात मोठी भूमिका बजावली.

राशिद खान याने 11 बॉलमध्ये 4 चौकारांच्या मदतीने नाबाद 24 धावांची खेळी केली. तर राहुल तेवतिया याने 11 बॉलमध्ये 3 चौकारांसह 22 धावा केल्या. विजय शंकर आणि शाहरुख खान या दोघांनी अनुक्रमे 16 आणि 14 धावा केल्या. मॅथ्यू वेड आणि अभिनव मनोहर या दोघांना विशेष काही करता आलं नाही. दोघे 4 आणि 1 अशा धावांवर बाद झाले. तर कॅप्टन शुबमन गिल साई सुदर्शन आणि सलामी जोडीने सर्वाधिक धावा करत गुजरातला चांगली सुरुवात करुन दिली.या दोघांनी खऱ्या अर्थाने विजयाचा पाया रचला. शुबमनने 44 बॉलमध्य 72 धावांची खेळी केली. तर साई सुदर्शन याने 35 धावांचं योगदान दिलं. तर राजस्थानकडून कुलदीप सेन याने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. युझवेंद्र चहल याने दोघांना बाहेरचा रस्ता दाखवला. तर आवेश खान याच्या खात्यात 1 विकेट गेली.

राजस्थानची बॅटिंग

दरम्यान त्याआधी गुजरात टायटन्सने टॉस जिंकून कॅप्टन शुबमन गिल याने राजस्थान रॉयल्सला बॅटिंगसाठी भाग पाडलं. राजस्थानने या निर्णयाचा चांगला फायदा घेतला. राजस्थानने आश्वासक सुरुवातीनंतर झटपट 2 विकेट्स गमावले. यशस्वी जयस्वाल 24 आणि जॉस बटलर 8 धावांवर आऊट झाले. त्यामुळे राजस्थानची स्थिती 2 बाद 42 अशी स्थिती झाली. त्यानंतर कॅप्टन संजू सॅमसन आणि रियान पराग या दोघांनी गुजरात विरुद्ध जोरदार फटकेबाजी केली. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 83 बॉलमध्ये 130 धावांची भागीदारी केली.

गुजरातने रोखला राजस्थानचा विजयी रथ

रियान पराग 48 बॉलमध्ये 76 धावा केल्या. तर त्यानंतर संजू सॅमसन आणि शिमरॉन हेटमायर दोघे नाबाद परतले. संजूने 38 बॉलमध्ये 7 फोर आणि 2 सिक्ससह नॉट आऊट 68 रन्स केल्या. तर शिमरॉन 13 धावावंर नाबाद परतला. तर गुजरातकडून मोहित शर्मा, उमेश यादव आणि राशिद खान या तिघांच्या खात्यात 1-1 विकेट गेली.

राजस्थान रॉयल्स प्लेइंग ईलेव्हन : संजू सॅमसन (कॅप्टन आणि विकेटकीपर), यशस्वी जयस्वाल, जोस बटलर, रियान पराग, ध्रुव जुरेल, शिमरॉन हेटमायर, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, आवेश खान, कुलदीप सेन आणि युझवेंद्र चहल.

गुजरात टायटन्स प्लेइंग ईलेव्हन : शुभमन गिल (कॅप्टन), साई सुदर्शन, विजय शंकर, अभिनव मनोहर, मॅथ्यू वेड (विकेटकीर), राहुल तेवतिया, रशीद खान, उमेश यादव, स्पेन्सर जॉन्सन, नूर अहमद आणि मोहित शर्मा.

मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा.
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला.
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?.
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?.
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी.
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?.
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला..
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला...
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र.
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं.
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?.