IPL 2024, RR vs KKR : राजस्थान कोलकाता आमनेसामने, श्रेयसने जिंकला टॉस आणि प्रथम गोलंदाजी
आयपीएल 2024 स्पर्धेतील साखळी फेरीतील शेवटचा सामना राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात होणार होता. पावसामुळे हा सामना 7 षटकांचा झाला आहे.
आयपीएल 2024 स्पर्धेतील साखळी फेरीतील शेवटचा सामना राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात होत आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल कोलकाता नाईट रायडर्सने जिंकला. श्रेयस अय्यरने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली आहे. पावसाच्या व्यत्ययामुळे हा सामना 7 षटकांचा होणार आहे. त्यामुळे धावसंख्येचा पाठलाग करणं सोपं होणार आहे. हा सामना राजस्थान रॉयल्ससाठी महत्त्वाचा आहे. हा सामना जिंकला तर राजस्थान रॉयल्सला टॉप 2 मधील स्थान पक्कं करता येईल. जर पराभव झाला तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुविरुद्ध सामना खेळावा लागेल. श्रेयस अय्यर म्हणाला की, “हा सात षटकांचा खेळ आहे, तो कसा खेळला जातो याची आम्हाला चांगली कल्पना येईल. अनुकुल रॉयला संघात घेतलं आहे.”
राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसन म्हणाला की, ” आम्ही आधीही गोलंदाजी केली असती. शेवटची खेळपट्टी खूप कोरडी होती, यात थोडा जास्त ओलावा आहे त्यामुळे आम्हालाही गोलंदाजी करायची होती. आम्ही शेवटच्या क्षणी बदल केले. मला वाटतं नांद्रे बर्गर येऊ शकेल.” पण पावसाने पुन्हा एकदा हजेरी लावली आहे. त्यामुळे हा सामना पुन्हा सुरु होणं कठीण आहे.
सुरुवातीला विजयाची चव चाखल्यानंतर राजस्थानची गाडी रुळावरून घसरली. सलग चार सामन्यात पराभवाचं तोंड पाहिल्यानंतर टॉप 2 मध्ये राहण्यासाठी आजच्या सामन्यातील विजय महत्त्वाचा आहे. पण पावसाच्या व्यत्ययामुळे सात षटकांचा खेळ करण्यात आला होता. तीन गोलंदाजांना दोन षटक टाकण्याची परवानगी होती. आता हा सामना सुरु झाला नाही तर राजस्थान रॉयल्सचं नुकसान होणार आहे.
दोन्ही संघांची प्लेइंग 11
राजस्थान रॉयल्स (प्लेइंग इलेव्हन): यशस्वी जैस्वाल, टॉम कोहलर-कॅडमोर, संजू सॅमसन (विकेटकीपर/कर्णधार), रियान पराग, ध्रुव जुरेल, रोवमन पॉवेल, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, संदीप शर्मा, आवेश खान, नांद्रे बर्गर.
कोलकाता नाईट रायडर्स (प्लेइंग इलेव्हन): रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), सुनील नरेन, व्यंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर (कर्णधार), रिंकू सिंग, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, अनुकुल रॉय, मिचेल स्टार्क, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती.