RR vs PBKS : रियान परागने लाज राखली, पंजाबला विजयासाठी 145 धावांचं आव्हान
Rajasthan Royals vs Punjab Kings 1st Innings Recap : राजस्थान रॉयल्सचा युवा फलंदाज रियान पराग याने कलेल्या 48 धावांच्या खेळीमुळे पंजाबला सन्मानजनक आव्हान देता आलं.
आयपीएलच्या 17 व्या मोसमातील 65 व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने पंजाब किंग्सला विजयासाठी 145 धावांचं आव्हान दिलं आहे. राजस्थानने 20 ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावून 144 धावा केल्या. राजस्थानकडून रियान पराग याने सर्वाधिक धावा केल्या. रियानने केलेल्या 48 धावांच्या खेळीमुळे राजस्थानला 140 पार मजल मारता आली. आता राजस्थानचे गोलंदाज हा कमी धावसंख्येचा बचाव करतात की पंजाब विजय मिळवून पराभवाची मालिकेला ब्रेक लावतात? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
रियान परागचं अर्धशतक अवघ्या 2 धावांनी हुकलं. रियान पराग याने 33 बॉलमध्ये 6 चौकारांच्या मदतीने आणि 141.18 च्या स्ट्राईक रेटने 48 धावा केल्या. आर अश्विन याने 147.37 च्या स्ट्राईक रेटने 1 सिक्स आणि 3 चौकारांच्या मदतीने 28 धावांचं योगदान दिलं. ओपनर जॉस बटलरन याच्या जागी संधी मिळालेल्या टॉम कोहलर-कॅडमोर याने 18 धावा केल्या. कॅप्टन संजू सॅमसन याने 15 बॉलमध्ये 3 चौकारांसह 18 धावा जोडल्या. तर इतर फलंदाजांना बॅटिंगने काही खास करता आलं नाही. पंजाबकडून राहुल चहर, हर्षल पटेल आणि कॅप्टन सॅम करन या दोघांनी सर्वाधिक 2-2 विकेट्स घेतल्या. तर अर्शदीप सिंह आणि नॅथन एलिस यांच्या खात्यात 1-1 विकेट गेली.
राजस्थान सलग दुसऱ्यांदा अपयशी
दरम्यान राजस्थान रॉयल्स या हंगामात सलग दुसऱ्यांदा अपयशी ठरली आहे. राजस्थानला सलग दुसऱ्यांदा 150 पार मजल मारता आलेली नाही. राजस्थानचा पंजाब किंग्स विरुद्धच्या सामन्याआधी चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध 12 मे रोजी आमनासामना झाला. राजस्थानने त्याने सामन्यात 20 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 141 धावांपर्यंत पोहचली होती. त्यामुळे राजस्थानचे फलंदाज कुठेतरी कमी पडत असल्याचंच यावरुन स्पष्ट होतं.
राजस्थानला 150 च्या आत रोखण्यात पंजाब यशस्वी
Innings Break!
Punjab Kings restrict #RR to 144/9, courtesy of a neat & tidy bowling performance 🎯#PBKS chase starts soon ⏳
Scorecard ▶️ https://t.co/IKSsmcpSsa#TATAIPL | #RRvPBKS pic.twitter.com/yLceePEiEK
— IndianPremierLeague (@IPL) May 15, 2024
पंजाब किंग्ज प्लेईंग इलेव्हन : सॅम करन (कॅप्टन), प्रभसिमरन सिंग, जॉनी बेअरस्टो, रिली रोसो, शशांक सिंग, जितेश शर्मा (विकेटकीपर), हरप्रीत ब्रार, हर्षल पटेल, नॅथन एलिस, राहुल चहर आणि अर्शदीप सिंग.
राजस्थान रॉयल्स प्लेइंग ईलेव्हन : यशस्वी जयस्वाल, टॉम कोहलर-कॅडमोर, संजू सॅमसन (कॅप्टन आणि विकेटकीपर), रियान पराग, ध्रुव जुरेल, रोवमन पॉवेल, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, संदीप शर्मा, आवेश खान आणि युझवेंद्र चहल.