RR vs PBKS : राजस्थानच्या बाजूने नाणेफेकीचा कौल, कॅप्टन संजू सॅमसनचा निर्णय काय?
Rajasthan Royals vs Punjab Kings Toss : राजस्थान रॉयल्सने टॉस जिंकला आहे. राजस्थान आणि पंजाब किंग्सच्या प्लेईंग ईलेव्हनमध्ये कोण कोण आहे? पाहा.
आयपीएलच्या 17 व्या मोसमातील 65 व्या सामन्यात राजस्थान रॉयल्स आमनेसामने आहेत. संजू सॅमसन याच्याकडे राजस्थान रॉयल्सची कॅप्टन्सी आहे. तर सॅम करन पंजाब किंग्सचं नेतृत्व करतोय. या सामन्याचं आयोजन हे गुवाहाटी येथील बारसपारा क्रिकेट स्टेडियम येथे करण्यात आलं आहे. सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. त्याआधी 7 वाजता टॉस झाला. राजस्थानने टॉस जिंकला. कॅप्टन संजू सॅमसन याने बॅटिंगचा निर्णय घेतला आहे.
प्लेईंग ईलेव्हनमध्ये बदल
राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्स या दोन्ही संघांनी या सामन्यासाठी प्लेईंग ईलेव्हनमध्ये बदल केले आहेत. जॉस बटलर मायदेशी परतला आहे.त्यामुळे राजस्थान रॉयल्सने प्लेईंग ईलेव्हनमध्ये बटलरच्या जागी टॉम कोहलर कॅडरमोर याचा समावेश केला आहे. तर पंजाबने प्लेईंग ईलेव्हनमध्ये दोघांचा समावेश केला आहे. पंजाबने नॅथन एलिस आणि हरप्रीत ब्रार या दोघांना संधी दिली आहे.
पंजाब किंग्स आणि राजस्थान रॉयल्स या दोन्ही संघांचा हा 13 वा सामना आहे. राजस्थानने 12 पैकी 8 सामने जिंकले आहेत.राजस्थान पॉइंट्स टेबलमध्ये दुसऱ्या स्थानी आहे. तर पंजाब क किंग्सला 12 मधून केवळ 4 सामन्यांमध्येच यश आलं आहे. पंजाब 8 गुणांसह पॉइंट्स टेबलमध्ये सर्वात शेवटी 10 व्या स्थानी आहे. या 17 व्या हंगामात मंगळवारी 14 मे रोजी दिल्लीने लखनऊनवर विजय मिळवला. दिल्लीच्या या विजयानंतर राजस्थानने प्लेऑफचं तिकीट कन्फर्म केलं. तर पंजाबचं आव्हान आधीच संपुष्टाटात आलंय. त्यामुळे पंजाबचा हा सामना जिंकून पॉइंट्स टेबलमधील स्थान सुधारण्याचा प्रयत्न असणार आहे. तर दुसऱ्या बाजूला राजस्थान सामना जिंकून टॉप 2 मध्ये कायम राहण्यासाठी प्रयत्नशील असणार आहे.
राजस्थानचा टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय
🚨 Toss Update 🚨
Rajasthan Royals elect to bat against Punjab Kings.
Follow the Match ▶️ https://t.co/IKSsmcpSsa#TATAIPL | #RRvPBKS pic.twitter.com/Y0pglUEwUO
— IndianPremierLeague (@IPL) May 15, 2024
पंजाब किंग्ज प्लेईंग इलेव्हन : सॅम करन (कॅप्टन), प्रभसिमरन सिंग, जॉनी बेअरस्टो, रिली रोसो, शशांक सिंग, जितेश शर्मा (विकेटकीपर), हरप्रीत ब्रार, हर्षल पटेल, नॅथन एलिस, राहुल चहर आणि अर्शदीप सिंग.
राजस्थान रॉयल्स प्लेइंग ईलेव्हन : यशस्वी जयस्वाल, टॉम कोहलर-कॅडमोर, संजू सॅमसन (कॅप्टन आणि विकेटकीपर), रियान पराग, ध्रुव जुरेल, रोवमन पॉवेल, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, संदीप शर्मा, आवेश खान आणि युझवेंद्र चहल.