IPL 2024, RR vs PBKS : नाणेफेकीचा कौल राजस्थानच्या बाजूने, गोलंदाजी निवडत संजू सॅमसन म्हणाला…
आयपीएल 2024 स्पर्धेतील 27 वा सामना राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्स यांच्यात होत आहे. राजस्थानचा संघ गुणतालिकेत पहिल्या, तर पंजाबचा संघ गुणतालिकेत आठव्या स्थानावर आहे. त्यामुळे पंजाबला या सामन्यातील विजय खूपच महत्त्वाचा आहे. दरम्यान नाणेफेकीचा कौल राजस्थानच्या बाजूने लागला.
आयपीएल 2024 स्पर्धेतील 27 व्या सामन्यात राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्स आमनेसामने आहेत. राजस्थानचा संघ सध्या जबरदस्त फॉर्मात असून गुणतालिकेत अव्वल स्थानी आहे. तर पंजाब किंग्सची कामगिरीही चांगली राहिली आहे. पण शेवटच्या षटकात हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावून घेतला जात आहे. त्यामुळे गुणतालिकेत पंजाबचा संघ आठव्या स्थानावर आहे. महाराजा यादविंद्र सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये स्पर्धेतील तिसरा सामना होत आहे. या मैदानावरील शेवटच्या दोन सामन्यांमध्ये अतितटीच्या लढती पाहायला मिळाल्या. पंजाब किंग्स आणि राजस्थान रॉयल्स आतापर्यंत 26 वेळा आमनेसामने आले आहेत. यात पंजाब किंग्सने 11 वेळा, तर राजस्थान रॉयल्सने 15 वेळा बाजी मारली आहे. दरम्यान राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसन याने नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम गोलंदाजी स्वीकारली आहे.
राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसन म्हणाला की, “आम्ही प्रथम गोलंदाजी करू. प्रथम गोलंदाजी करण्यासाठी योग्य विकेट दिसते. आमचं ध्येय ठरलं आहे आणि त्या पद्धतीने आम्ही काम करत आहोत. आम्ही चांगले करत आहोत. बाहेरही बरीच आव्हाने आहेत, आज संघातून काही खेळाडू वगळण्यात आलं आहे. संघात रोव्हमन आणि कोटियन इलेव्हनमध्ये घेतले आहेत.”
पंजाब किंग्सचा कर्णधार सॅम करन म्हणाला की, “शिखरला दुखापत आहे. आम्हीही आधी गोलंदाजी केली असती. पण आता आम्हाला चांगल्यापैकी धावा कराव्या लागतील. समतोल चांगला आहे, आम्हाला आणखी काही गेम जिंकायला आवडेल. पण मधली फळी चांगली आहे. विशेषतः शशांक आणि आशुतोष चांगलं खेळत आहेत. आमच्याकडे रोमांचक खेळाडू आणि भरपूर गुणवत्ता आहे. शिखर धवनऐवजी तायडेला संघात घेतलं आहे.” शिखर धवन आजच्या सामन्यात खेळत नाही. त्यामुळे संघाची धुरा सॅम करनकडे सोपवण्यात आली आही. जितेश शर्मा उपकर्णधार असताना ही धुरा सॅम करनकडे सोपवण्यात आली आहे.
दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन
पंजाब किंग्ज (प्लेइंग इलेव्हन): जॉनी बेअरस्टो, अथर्व तायडे, प्रभसिमरन सिंग, सम कुरन (कर्णधार), लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा (विकेटकीपर), शशांक सिंग, हरप्रीत ब्रार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग, कागिसो रबाडा.
राजस्थान रॉयल्स (प्लेइंग इलेव्हन): संजू सॅमसन (विकेटकीपर/कर्णधार), रियान पराग, ध्रुव जुरेल, शिमरॉन हेटमायर, रोवमन पॉवेल, तनुष कोटियन, केशव महाराज, ट्रेंट बोल्ट, आवेश खान, कुलदीप सेन, युझवेंद्र चहल.