IPL 2024 RR vs RCB Eliminator Live Streaming: राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आमनेसामने
Rajasthan Royals vs Royal Challengers Bengaluru Eliminator Live Streaming : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने विजयी षटकार पूर्ण करत प्लेऑफमध्ये धडक मारली आहे. आता आरसीबीचा सामना हा राजस्थान विरुद्ध होणार आहे.
आयपीएलच्या 17 व्या मोसमातील क्वालिफायर 1 सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने मंगळवारी 21 मे रोजी सनरायजर्स हैदराबादचा पराभव करत फायनलमध्ये प्रवेश केला. हैदराबादच्या पराभवानंतरही त्यांना फायनलमध्ये पोहचण्याची आणखी संधी असणार आहे. हैदराबाद एलिमिनेटर सामना जिंकणाऱ्या संघाविरोधात क्वालिफायर 2 सामना खेळणार आहे. एलिमिनेटरमध्ये राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आमनेसामने असणार आहेत. फाफ डु प्लेसिस आरसीबीचं नेतृत्व करणार आहे. तर संजू सॅमसन याच्याकडे राजस्थान रॉयल्सची कॅप्टन्सी आहे. हा सामना जिंकणारा संघ क्वालिफायर 2 मध्ये सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध भिडणार आहे. या सामन्याबाबत जाणून घेऊयात.
राजस्थान विरुद्ध बंगळुरु एलिमिनेटर सामना केव्हा?
राजस्थान विरुद्ध बंगळुरु एलिमिनेटर सामना आज बुधवारी 22 मे रोजी खेळवण्यात येणार आहे.
राजस्थान विरुद्ध बंगळुरु एलिमिनेटर सामना कुठे?
राजस्थान विरुद्ध बंगळुरु एलिमिनेटर सामना नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद येथे होणार आहे.
राजस्थान विरुद्ध बंगळुरु एलिमिनेटर सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?
राजस्थान विरुद्ध बंगळुरु एलिमिनेटर सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होईल.
राजस्थान विरुद्ध बंगळुरु एलिमिनेटर सामना टीव्हीवर कुठे पाहायला मिळेल?
राजस्थान विरुद्ध बंगळुरु एलिमिनेटर सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहता येईल.
राजस्थान विरुद्ध बंगळुरु एलिमिनेटर सामना मोबाईलवर फुकटात कुठे पाहायला मिळेल?
राजस्थान विरुद्ध बंगळुरु एलिमिनेटर सामना मोबाईलवर फुकटात जिओ सिनेमा एपवर पाहायला मिळेल.
राजस्थान रॉयल्स टीम : संजू सॅमसन (कॅप्टन आणि विकेटकीपर), यशस्वी जयस्वाल, टॉम कोहलर-कॅडमोर, रियान पराग, ध्रुव जुरेल, रोवमन पॉवेल, रवीचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, संदीप शर्मा, आवेश खान, नांद्रे बर्गर, युझवेंद्र चहल, कुलदीप सेन, शुभम सेन, शुभम , केशव महाराज, डोनोवन फरेरा, नवदीप सैनी, शिमरॉन हेटमायर, तनुष कोटियन, आबिद मुश्ताक आणि कुणाल सिंग राठौर.
रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू टीम : फॅफ डु प्लेसिस (कर्णधार), दिनेश कार्तिक (विकेटकीपर), विराट कोहली, रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, कॅमेरॉन ग्रीन, महिपाल लोमरोर, कर्ण शर्मा, यश दयाल, लॉकी फर्ग्युसन, मोहम्मद सिराज, स्वप्नील सिंग, अनुज रावत, सुयश प्रभुदेसाई, विजयकुमार वैशाख, हिमांशू शर्मा, मयंक डागर, अल्झारी जोसेफ, मनोज भंडागे, आकाश दीप, सौरव चौहान, राजन कुमार आणि टॉम करन.