IPL 2024 Schedule | सामन्यांच्या तारखा, ठिकाण आणि वेळ, आयपीएलबाबत मोठी बातमी

Ipl 2024 Schedule And Venue | आयपीएलच्या 17 व्या मोसमासाठी ऑक्शन दुबईत पार पडणार आहे. त्यात आता या आगामी हंगामाचं वेळापत्रक केव्हा जाहीर होणार, कुठे होणार याबाबत मोठी बातमी समोर आली आहे.

IPL 2024 Schedule | सामन्यांच्या तारखा, ठिकाण आणि वेळ, आयपीएलबाबत मोठी बातमी
Follow us
| Updated on: Dec 17, 2023 | 8:17 PM

मुंबई | भारतीय क्रिकेट संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे. सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात टी 20 मालिका बरोबरीत सोडवल्यानंतर टीम इंडियाने केएल राहुलच्या कॅप्टन्सीत एकदिवसीय मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली. त्यानंतर या मालिकेतील दुसरा सामना हा मंगळवारी 19 डिसेंबर रोजी पार पडणार आहे. याच दिवशी आयपीएलच्या 17 व्या मोसमासाठीचा लिलाव पार पडणार आहे. या लिलावात 77 जागांसाठी 333 खेळाडू मैदानात आहे. यामध्ये दिग्गज खेळाडूंचा समावेश आहे. त्यामुळे या खेळाडूंना आपल्या गोटात घेण्यासाठी 10 संघांमध्ये चढाओढ पाहायला मिळणार आहे. ऑक्शनची लगबग असताना आता दुसऱ्या बाजूला आयपीएलच्या आगामी मोसमाच्या वेळापत्रकाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.

आयपीएल 2024 च्या मोसमाचं वेळापत्रक जाहीर केव्हा होणार, हा प्रश्न क्रिकेट चाहत्यांकडून उपस्थित केला जात आहे. याबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. त्याबाबत आपण सविस्तर जाणून घेऊयात. आयपीएल गव्हर्निंग काउन्सिलने 17 व्या मोसमाच्या वेळापत्रकाबाबत घोषणा केली आहे. त्यामुळे सामने कोणत्या तारखेला होणार, कुठे होणार, किती वाजता सुरु होणार या आणि अशा असंख्य प्रश्नांची उत्तर क्रिकेट चाहत्यांना मिळणार आहेत.

देशात अवघ्या काही महिन्यांवर लोकसभा निवडणुका येऊन ठेपल्या आहेत. अशात निवडणूक आयोगाकडे लक्ष लागलेलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, निवडणूक आयोगाने सार्वत्रिक निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्यानंतरच आयपीएलचं वेळापत्रक जाहीर केलं जाण्याची शक्यता आहे.

आयपीएल भारतात की बाहेर?

आता वेळापत्रकानंतर क्रिकेट चाहत्यांना असाही प्रश्न आहे की 17 व्या मोसमातील सामने भारतात होणार की बाहेर? 2009 मध्ये सार्वत्रिक निवडणुकांमुळे आणि कोरोनामुळे आयपीएलच्या काही मोसमाचं आयोजन हे परदेशात करण्यात आलं होतं. 2009 साली लोकसभा निवडणुकांमुळे सुरक्षेच्या कारणास्तव आयपीएल परदेशात आयोजित करण्यात आलं होतं. यंदाही निवडणुका आहेत. त्यामुळे आयपीएल भारतात होणार की बाहेर, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

दरम्यान आयपीएल 2024 केव्हा सुरु होणार, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती नाही. मात्र मीडिया रिपोर्ट्सनुसार, आयपीएल 17 व्या मोसमाला मार्च महिन्यातील तिसऱ्या आठवड्यापासून सुरुवात होऊ शकते.

धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.