IPL 2024 | मुंबई इंडियन्सचा विस्फोटक फंलदाज तिलक वर्मा ‘झटका’ देण्यासाठी तयार

Tilak Varma Ipl Career | तिलक वर्मा याचं आयपीएल आणि मुंबई इंडियन्ससाठीचं तिसरं वर्ष आहे. आयपीएलच्या कामगिरीवर तिलकला टीम इंडियात संधी मिळाली. तिलकची आयपीएल आणि आंतरराष्ट्रीय कारकीर्द कशी आहे? जाणून घ्या.

IPL 2024 | मुंबई इंडियन्सचा विस्फोटक फंलदाज तिलक वर्मा 'झटका' देण्यासाठी तयार
Follow us
| Updated on: Mar 16, 2024 | 8:58 PM

मुंबई | क्रिकेट रणसंग्रमाला अर्थात आयपीएलच्या 17 व्या हंगामाला येत्या 22 मार्चपासून सुरुवात होणार आहे. लोकसभा निवडणुकांमुळे आयपीएलच्या या पर्वातील पहिल्याच टप्प्याचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. पहिल्या टप्प्यात एकूण 10 संघ 21 सामने खेळणार आहेत. त्यापैकी मुंबई 4 मॅचेस खेळणार आहे. त्याआधी मुंबई इंडियन्ससाठी खेळणारा फलंदाज तिलक वर्मा आपल्या बॅटिंगने प्रतिस्पर्ध्यांना झटका द्यायला तयार झाला आहे. तिलक वर्माने 17 व्या सिजनआधी झंझावाती खेळी करत रणशिंग फुकलं आहे. इलेक्ट्रीशनचा मुलगा असलेला तिलक वर्मा याने नुकतंच डीवाय पाटील स्टेडियममध्ये सेंट्रल रेल्वे विरुद्ध झंझावाती खेळी केली होती. तिलकने 44 बॉलमध्ये 91 धावांची खेळी केली होती. तसेच 1 विकेटही घेतली होती. मुंबई इंडियन्सने तिलकच्या या कामिगिरीचा व्हीडिओ शेअर केला. त्यामुळे तिलककडून आयपीएलमध्ये अशाच झंझावाती खेळीची अपेक्षा असणार आहे.

तिलक वर्मा याची आयपीएल कारकीर्द

तिलक वर्मा याने 2022 साली मुंबई इंडियन्सकडून आयपीएल पदार्पण केलं. तिलकने विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेच्या 2020-2021 हंगामात 2 शतकं ठोकत सर्वांच लक्ष वेधून घेतलं होतं. त्यानंतर मुंबई इंडियन्सने 1 कोटी 70 लाख रुपये मोजून तिलकला आपल्या ताफ्यात घेतलं. तिलक तेव्हापासून मुंबई इंडियन्समध्येच आहे. तिलकने मुंबईसाठी आयपीएलमध्ये केलेल्या कामगिरीच्या जोरावरच त्याला टीम इंडियात संधी मिळाली. दरम्यान तिलकने टीम इंडियाचं 4 एकदिवसीय आणि 16 टी 20 सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व केलं आहे. तसेच 25 आयपीएल सामने खेळले आहेत. तिलकने वनडे आणि टी 20 मध्ये अनुक्रमे 68 आणि 336 धावा केल्या आहेत. तसेच आयपीएलमध्ये 740 धावा केल्या आहेत.  आता तिलक आगामी टी 20 वर्ल्ड कपच्या पार्श्वभूमीवर या 17 व्या पर्वात कशी कामगिरी  करतो, याकडे निवड समितीचंही लक्ष असणार आहे.

आयपीएल 2024 साठी मुंबई इंडियन्स | रोहित शर्मा, हार्दिक पंड्या (कॅप्टन), डेवाल्ड ब्रेविस, सूर्यकुमार यादव, ईशान किशन, तिलक वर्मा, टीम डेविड, विष्णु विनोद, शम्स मुलानी, नेहल वढेरा, जसप्रित बुमरा, कुमार कार्तिकेय, पीयूष चावला, आकाश मधवाल, जेसन बेहरेनडोर्फ, रोमारियो शेफर्ड, अर्जुन तेंडूलकर, गेराल्ड कोएत्झी, दिलशान मदुशंका, श्रेयस गोपाल, नुवान तुषारा, नमन धीर, अंशुल कंबोज, मोहम्मद नबी आणि शिवालिक शर्मा.

'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ.
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण.
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.
शाळेच्या शौचालयात विद्यार्थिनीचं टोकाच पाऊल अन् संपवलं जीवन, काय घडलं?
शाळेच्या शौचालयात विद्यार्थिनीचं टोकाच पाऊल अन् संपवलं जीवन, काय घडलं?.
'तर आम्ही आमचा मार्ग...'; मविआत वादाची ठिणगी? राऊतांचं मोठं वक्तव्य
'तर आम्ही आमचा मार्ग...'; मविआत वादाची ठिणगी? राऊतांचं मोठं वक्तव्य.
मंत्रिपद तूर्त वाचलं, मुंडेंच्या राजीनाम्यावर दादा स्पष्टच म्हणाले...
मंत्रिपद तूर्त वाचलं, मुंडेंच्या राजीनाम्यावर दादा स्पष्टच म्हणाले....
आकाचा आकासुद्धा 302 च्या लाईनमध्ये? सुरेश धसांचा वाल्मिक कराडला इशारा
आकाचा आकासुद्धा 302 च्या लाईनमध्ये? सुरेश धसांचा वाल्मिक कराडला इशारा.
'हाके भाजपचे हस्तक', माईकच हिस्कावला अन् स्थानिकांनी त्यांनाच सुनावलं
'हाके भाजपचे हस्तक', माईकच हिस्कावला अन् स्थानिकांनी त्यांनाच सुनावलं.
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.