IPL 2024 | आयपीएलच्या 17 व्या मोसमाआधी ‘या’ खेळाडूची कर्णधारपदी वर्णी

IPL 2024 | आयपीएलच्या 17 व्या मोसमाआधी एका टीमने नव्या कर्णधाराची घोषणा केली आहे. या फ्रँचायजीने सोशल मीडियावरुन याबाबतची माहिती दिली आहे.

IPL 2024 | आयपीएलच्या 17 व्या मोसमाआधी 'या' खेळाडूची कर्णधारपदी वर्णी
Follow us
| Updated on: Mar 04, 2024 | 12:32 PM

मुंबई | आयपीएल 17 व्या मोसमाला 22 मार्चपासून सुरुवात होणार आहे. देशातील सार्वत्रिक निवडणुकांमुळे यंदा 17 व्या हंगामातील 17 दिवसांचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. या 17 दिवसांमध्ये एकूण 21 सामने पार पडणार आहेत. पहिल्या टप्प्यात प्रत्येक संघ किमान 3 आणि जास्तीत 5 सामने खेळणार आहे. या हंगामासाठी अवघे काही दिवस बाकी असल्याने अनेक खांदेपालट सुरु आहे. अशात अशीच एक मोठी अपडेट समोर आली आहे. एसआरएच अर्थात सनरायजर्स हैदराबाद टीमने नव्या कर्णधाराची घोषणा सोशल मीडियावरुन केली आहे. ऑस्ट्रेलियाचा वर्ल्ड कप विजेता खेळाडू पॅट कमिन्स याच्याकडे या 17 व्या मोसमासाठी सनरायजर्स हैदराबाद टीमच्या कर्णधारपदाची सूत्रं सोपवण्यात आली आहेत.

एडन मारक्रम याच्याकडे गेल्या हंगामात सनरायजर्स हैदराबाद टीमची धुरा होती. मात्र आता मारक्रम याची उचलबांगडी करत पॅटला जबाबदारी दिली आहे. मारक्रमने आपल्या नेतृत्वात दक्षिण आफ्रिका टी 20 लीगमध्ये चॅम्पियन केलं होतं. मात्र त्याला कॅप्टन म्हणून आयपीएलमध्ये उल्लेखनीय कामगिरी करता आली नाही. एसआरएचला 16 व्या हंगामात एडनच्या नेतृत्वात एसआरएचला 14 पैकी फक्त 4 सामनेच जिंकता आले. त्यामुळे आता एडनच्या जागी पॅटला जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

हे सुद्धा वाचा

पॅट दुसरा सर्वात महागडा खेळाडू

पॅट कमिन्स हा आयपीएलच्या इतिहासातील दुसरा सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. आयपीएलच्या 17 व्या मोसमासाठी डिसेंबर 2023 मध्ये मिनी ऑक्शन पार पडलं. सनरायजर्स हैदराबादने पॅटला या ऑक्शनमध्ये 20 कोटी 50 लाख रुपये मोजून आपल्या ताफ्यात घेतलं. तर ऑस्ट्रेलियाचा मिचेल स्टार्क हा सर्वात महागडा ठरला. मिचेलसाठी केकेआर अर्थात कोलकाता नाईट रायडर्सने 24 कोटी 75 लाख रुपये मोजले.

एसआरएचचं पहिल्या टप्प्यातील वेळापत्रक

एसआरएच विरुद्ध कोलकाता, 23 मार्च, संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटं

एसआरएच विरुद्ध मुंबई इंडियन्स, 27 मार्च, संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटं

एसआरएच विरुद्ध गुजरात टायटन्स, 31 मार्च, दुपारी 3 वाजून 30 मिनिटं

एसआरएच विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स, 5 एप्रिल, संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटं.

पॅट कमिन्स ऑरेंज आर्मीचा नवा कॅप्टन

आयपीएल 2024 साठी सनरायजर्स हैदराबाद टीम | पॅट कमिन्स (कॅप्टन), मयंक अग्रवाल, राहुल त्रिपाठी, अनमोलप्रीत सिंह, नितीश कुमार रेड्डी, एडेन मार्कराम, ग्लेन फिलिप्स, हेनरिक क्लासेन, उपेंद्र सिंह यादव, अभिषेक शर्मा, अब्दुल समद, सनवीर सिंह, वाशिंगटन सुंदर, शाहबाज अहमद, मार्को जानसन, भुवनेश्वर कुमार, टी नटराजन, फजलहक फारूकी, उमरान मलिक, ट्रॅव्हिस हेड, जयदेव उनादकट, वानिंदु हसरंगा, झटवेध सुब्रमण्यन आणि आकाश सिंह.

धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.