IPL 2024 SRH vs GT Live Streaming: हैदराबादसाठी निर्णायक सामना, गुजरात गेम बिघडवणार?

Sunrisers Hyderabad vs Gujarat Titans Live Streaming : सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध गुजरात टायट्न्स दोन्ही संघ या 17 व्या हंगामात दुसऱ्यांदा आमनेसामने भिडणार आहेत.

IPL 2024 SRH vs GT Live Streaming: हैदराबादसाठी निर्णायक सामना, गुजरात गेम बिघडवणार?
Shubman Gill and Pat Cummins SRH vsGTImage Credit source: BCCI/IPL
Follow us
| Updated on: May 15, 2024 | 4:22 PM

आयपीएलच्या 17 व्या मोसमातील 66 व्या सामन्यात सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात आमनासामना होणार आहे. पॅट कमिन्स याच्याकडे सनरायजर्स हैदराबादचं नेतृत्व असणार आहे. तर शुबमन गिल गुजरात टायटन्सची धुरा सांभाळणार आहे. गुजरातसाठी हा सामना एक औपचारिकताच आहे, कारण त्यांचं आव्हान संपु्ष्टात आलं आहे. तर हैदराबादसाठी हा सामना फार निर्णायक असा आहे. प्लेऑफमध्ये पोहचण्यासाठी हैदराबादला हा सामना कोणत्याही परिस्थितीत जिंकावा लागणार आहे.

गुजरातचा हा 14 वा आणि या हंगामातील शेवटचा सामना असणार आहे. तर हैदराबादचा 13 वा सामना असणार आहे. गुजरातने 13 पैकी 5 सामन्यात विजय मिळवला आहे. तर 7 वेळा पराभवाचा सामना करावा लागलाय. तर एक सामना पावसामुळे रद्द झाला. त्यामुळे गुजरातचं प्लेऑफमध्ये पोहचण्याचं स्वप्न पावसाच्या पाण्यात वाहून गेलं. गुजरात 11 गुणांसह पॉइंट्स टेबलमध्ये आठव्या स्थानी आहे. तर हैदराबादने 12 पैकी 7 सामने जिंकलेत तर दोनदा पराभव स्वीकारला. हैदराबाद 14 गुणांसह पॉइंट्स टेबलमध्ये चौथ्या स्थानी आहे.

दुसऱ्यांदा आमनेसामने

गुजरात विरुद्ध हैदराबाद दोन्ही संघांची या हंगामात आमनेसामने येण्याची ही दुसरी वेळ आहे. याआधी उभयसंघात 31 मार्च रोजी सामना झाला होता. त्या सामन्यात गुजरातने 7 विकेट्सने शानदार विजय मिळवला होता. आता गुजरातचं तर स्पर्धेतून पॅकअप झालंय. त्यामुळे गुजरातचा हा सामना जिंकून पॉइंट्स टेबलमधील स्थान सुधारण्याकडे लक्ष असणार आहे. तसेच हा सामना जिंकून गुजरातचा हैदराबादचा प्लेऑफच्या हिशोबाने गोची करण्याचा प्रयत्न असणार आहे. त्यामुळे आता या निर्णायक सामन्यात हैदराबाद कशी कामगिरी करते,याकडे इतर संघांचं लक्ष असणार आहे.

हैदराबाद विरुद्ध गुजरात सामना केव्हा?

हैदराबाद विरुद्ध गुजरात सामना गुरुवारी 16 मे रोजी होणार आहे.

हैदराबाद विरुद्ध गुजरात सामना कुठे?

हैदराबाद विरुद्ध गुजरात सामना राजीव गांधी स्टेडियम, हैदराबाद येथे होणार आहे.

हैदराबाद विरुद्ध गुजरात सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

हैदराबाद विरुद्ध गुजरात सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे.

हैदराबाद विरुद्ध गुजरात सामना टीव्हीवर कुठे पाहता येईल?

हैदराबाद विरुद्ध गुजरात सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहता येईल.

हैदराबाद विरुद्ध गुजरात सामना मोबाईलवर कुठे पाहायला मिळेल?

हैदराबाद विरुद्ध गुजरात सामना मोबाईलवर फुकटात जिओ सिनेमा एपवर पाहायला मिळेल.

सनरायजर्स हैदराबाद टीम : पॅट कमिन्स (कॅप्टन), जयदेव उनाडकट, झटावेध सुब्रमण्यन, टी नटराजन, मयंक मार्कंडे, भुवनेश्वर कुमार, फजलहक फारुकी, वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद, सनवीर सिंग, ग्लेन फिलिप्स, नितीश रेड्डी, मार्को जॅनसेन, अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, उपेंद्र यादव, एडन मारक्रम, हेनरिक क्लासेन, ट्रॅव्हिस हेड, अनमोलप्रीत सिंग, मयंक अग्रवाल, अब्दुल समद, आकाश महाराज सिंग, वानिंदू हसरंगा आणि उमरान मलिक.

गुजरात टायटन्स प्लेईंग ईलेव्हन : शुबमन गिल (कर्णधार), डेव्हिड मिलर, ऋद्धिमान साहा, साई सुधारसन, शाहरुख खान, मॅथ्यू वेड, केन विल्यमसन, अजमतुल्ला ओमरझाई, अभिनव मनोहर, रशीद खान, विजय शंकर, राहुल तेवतिया, स्पेन्सर जॉन्सन, कार्तिक त्यागी, जोशुआ लिटल, दर्शन नळकांडे, नूर अहमद, रविश्रीनिवासन साई किशोर, मोहित शर्मा, जयंत यादव, उमेश यादव, सुशांत मिश्रा, संदीप वॉरियर, शरथ बीआर आणि मानव सुथर.

धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.