IPL 2024, SRH vs GT : गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबाद सामन्याचा पावसामुळे खेळखंडोबा, आता प्लेऑफची एकच सीट

आयपीएल 2024 स्पर्धेतील प्लेऑफच्या दृष्टीने महत्त्वाचा सामना गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात होणार होता. मात्र पावसामुळे हा सामना रद्द करण्यात आला आहे. हा सामना रद्द झाल्याने हैदराबादने 15 गुणांसह प्लेऑफमध्ये एन्ट्री मारली आहे.

IPL 2024, SRH vs GT : गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबाद सामन्याचा पावसामुळे खेळखंडोबा, आता प्लेऑफची एकच सीट
Image Credit source: IPL/BCCI
Follow us
| Updated on: May 16, 2024 | 10:20 PM

आयपीएल 2024 स्पर्धेतील 65वा सामना गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात होत आहे. या सामन्यावर प्लेऑफचं गणित अवलंबून होतं. गुजरातचं या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं होतं. मात्र हैदराबादची वाट अडवण्याची ताकद गुजरात टायटन्समध्ये होती. पण पावसाने या सामन्यावर पाणी ओतलं. या स्पर्धेत हे दोन संघ दुसऱ्यांदा एकमेकांसमोर उभे ठाकले होते.  त्यामुळे या सामन्यात गुजरातकडून चांगल्या खेळीची अपेक्षा होती. कारण पहिल्या सामन्यात गुजरात टायटन्सने बाजी मारली होती. सनरायझर्स हैदराबादने 20 षटकात 8 गडी गमवून 162 धावा केल्या आणि विजयासाठी 163 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान गुजरात टायटन्सने 19.1 षटकात 3 गडी गमवून पूर्ण केलं होतं. त्यामुळे गुजरातला कमी लेखनं हैदराबादला महागात पडू शकलं असतं. पण सामना न झाल्याने दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण देण्यात आला आहे.  त्यामुळे सामना न खेळताच सनरायझर्स हैदराबादने प्लेऑफमध्ये एन्ट्री मारली आहे.  सामना रद्द करण्यासाठी 10 वाजेपर्यंतची वेळ पाळण्यात आली. मात्र त्यानंतर पावसाची संततधार सुरु असल्याने अखेर सामना रद्द करण्यात आला आहे.

आता प्लेऑफच्या एका जागेसाठी चेन्नई सुपर किंग्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु, दिल्ली कॅपिटल्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात शर्यत आहे. मात्र दिल्ली कॅपिटल्स आणि लखनौ सुपर जायंट्सचा नेट रनरेट पाहिला तर त्यांचं खूपच कठीण आहे. दुसरीकडे, चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांना संधी आहे. पण या सामन्यावरही पावसाचं सावट आहे. हा सामना झाला नाही तर मात्र चेन्नई सुपर किंग्सचं तिकीट पक्कं होईल. दुसरं हा सामना झाला तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला 18 धावा राखून किंवा दिलेलं टार्गेट 18.1 षटकात पूर्ण करावं लागेल.

दोन्ही संघाचे खेळाडू

सनरायझर्स हैदराबाद संघ: अभिषेक शर्मा, ट्रॅव्हिस हेड, नितीश रेड्डी, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अब्दुल समद, शाहबाज अहमद, सनवीर सिंग, पॅट कमिन्स (कर्णधार), भुवनेश्वर कुमार, जयदेव उनाडकट, विजयकांत व्यासकांत, टी नटराजन, उमरान मलिक, मयंक अग्रवाल, ग्लेन फिलिप्स, वॉशिंग्टन सुंदर, राहुल त्रिपाठी, एडन मार्कराम, अनमोलप्रीत सिंग, उपेंद्र यादव, मयंक मार्कंडे, झटावेध सुब्रमण्यन, फजलहक फारुकी, मार्को जानसेन, आकाश महाराज सिंग.

गुजरात टायटन्स संघ: शुबमन गिल (कर्णधार), साई सुदर्शन, डेव्हिड मिलर, शाहरुख खान, मॅथ्यू वेड (विकेटकीपर), राहुल तेवतिया, रशीद खान, नूर अहमद, उमेश यादव, मोहित शर्मा, कार्तिक त्यागी, संदीप वॉरियर, अभिनव मनोहर, शरथ बीआर, दर्शन नळकांडे, जयंत यादव, वृद्धिमान साहा, केन विल्यमसन, विजय शंकर, जोशुआ लिटल, रविश्रीनिवासन साई किशोर, स्पेन्सर जॉन्सन, अजमतुल्ला ओमरझाई, मानव सुथार, गुरनूर ब्रार.

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.