SRH vs PBKS : एका सामन्याचं नेतृत्व केल्यानंतर पंजाब किंग्सचा कर्णधार जितेश शर्माने मन केलं मोकळं, म्हणाला..

आयपीएल 2024 स्पर्धेतील 69 वा सामना पंजाब किंग्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात सामना पार पडला. या सामन्यात पंजाब किंग्सने 200 पार धावा करूनही हैदराबादने हे लक्ष्य गाठलं. या सामन्याचं नेतृत्व जितेश शर्माकडे सोपवण्यात आलं होतं. या सामन्यानंतर त्याने आपलं मन मोकळं केलं.

SRH vs PBKS : एका सामन्याचं नेतृत्व केल्यानंतर पंजाब किंग्सचा कर्णधार जितेश शर्माने मन केलं मोकळं, म्हणाला..
Image Credit source: IPL/BCCI
Follow us
| Updated on: May 19, 2024 | 9:37 PM

आयपीएल 2024 स्पर्धेत पंजाब किंग्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात सामना पार पडला. या सामन्यात नाणेफेकीचा कौल पंजाब किंग्सने जिंकला आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पंजाब किंग्सने अपेक्षेप्रमाणे 20 षटकात 5 गडी गमवून 214 धावा केल्या आणि विजयासाठी 215 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान सनरायझर्स हैदराबादने 19.1 षटकात 6 गडी गमवून पूर्ण केलं. या विजयासह सनरायझर्स हैदराबादने गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. सनरायझर्स हैदराबादकडून अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, नितीश रेड्डी आणि हेनरिक क्लासेन यांनी जबरदस्त खेळी केली. अभिषेक शर्माने 28 चेंडूत 5 चौकार आणि 6 षटकारांच्या मदतीने 66 धावा केल्या. तर क्लासेनने 26 चेंडूत 3 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 42 धावा केल्या. पंजाब किंग्सने या सामन्यासाठी जितेश शर्माकडे नेतृत्व सोपवलं होतं. शिखर धवन जखमी असल्याने आणि सॅम करन मायदेशी परतल्याने ही धुरा जितेश शर्माकडे सोपवण्यात आली होती. मात्र या स्पर्धेचा शेवट गोड करण्यात पंजाब किंग्सला अपयश आलं. या सामन्यानंतर कर्णधार जितेश शर्माने आपलं मत व्यक्त केलं.

पंजाब किंग्सचा कर्णधार जितेश शर्माने सांगितलं की, “सामना खेळायला एक वेगळी मजा आली. मुलांनी खूप संघर्ष केला आणि आम्हाला खूप मजा आली. परदेशी खेळाडूंशिवाय छान खेळ झाला. जोपर्यंत तुम्ही जमिनीवर अर्थ लावत नाही तोपर्यंत चर्चा मदत करणार नाही. आम्हाला विकेटनुसार खेळावे लागेल आणि त्यानुसार नियोजन करावे लागेल.” जितेश शर्माने या स्पर्धेचं थोडक्यात विश्लेषण केलं. पंजाब किंग्सने या स्पर्धेत 14 सामन्यापैकी फक्त 5 सामन्यात विजय मिळवल, तर 9 सामन्यात पराभवाचं तोंड पाहिलं. पंजाब किंग्सचा संघ 10 गुणांसह गुणतालिकेत नवव्या स्थानावर राहिला आहे.

दोन्ही संघांची प्लेइंग 11

सनरायझर्स हैदराबाद (प्लेइंग इलेव्हन): अभिषेक शर्मा, नितीश रेड्डी, राहुल त्रिपाठी, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अब्दुल समद, शाहबाज अहमद, सनवीर सिंग, पॅट कमिन्स (कर्णधार), भुवनेश्वर कुमार, विजयकांत व्यासकांत, टी नटराजन.

पंजाब किंग्ज (प्लेइंग इलेव्हन): प्रभसिमरन सिंग, अथर्व तायडे, रिली रोसोव, शशांक सिंग, जितेश शर्मा (विकेटकीपर/कर्णधार), आशुतोष शर्मा, शिवम सिंग, हरप्रीत ब्रार, ऋषी धवन, हर्षल पटेल, राहुल चहर.

संक्रांतीनिमित्ताने येवल्यात पैठणी खरेदीसाठी महिलांची झुंबड
संक्रांतीनिमित्ताने येवल्यात पैठणी खरेदीसाठी महिलांची झुंबड.
गृहमंत्री आहेत का झोपलेत ? भरसभेत फोटो दाखवत मनोज जरांगे संतापले
गृहमंत्री आहेत का झोपलेत ? भरसभेत फोटो दाखवत मनोज जरांगे संतापले.
संजय राऊत यांच्या भूमिकेचं स्वागत , निवडणुका या.. विकास ठाकरे
संजय राऊत यांच्या भूमिकेचं स्वागत , निवडणुका या.. विकास ठाकरे.
आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत... संतोष देशमुखांचे भाऊ
आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत... संतोष देशमुखांचे भाऊ.
हत्या प्रकरणातील आरोपींवर MCOCA ; ज्येष्ठ वकील माजिद मेमन म्हणाले..
हत्या प्रकरणातील आरोपींवर MCOCA ; ज्येष्ठ वकील माजिद मेमन म्हणाले...
Santosh Deshmukh Murder : विष्णू चाटेला 2 दिवसांची सीआयडी कोठडी
Santosh Deshmukh Murder : विष्णू चाटेला 2 दिवसांची सीआयडी कोठडी.
Santosh Deshmukh Murder : MCOCA लागल्यानं काय होणार ?
Santosh Deshmukh Murder : MCOCA लागल्यानं काय होणार ?.
संतोष देशमुख हत्याकांडात सात जणांवर MCOCA , वाल्मिक कराडचं काय ?
संतोष देशमुख हत्याकांडात सात जणांवर MCOCA , वाल्मिक कराडचं काय ?.
धामोरी गावात भुताची अफवा, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पण..
धामोरी गावात भुताची अफवा, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पण...
'बूंद से गयी वो हौद से नही आतीं' गुलाबराव पाटलांचा ठाकरेंवर घणाघात
'बूंद से गयी वो हौद से नही आतीं' गुलाबराव पाटलांचा ठाकरेंवर घणाघात.