SRH vs PBKS : अभिषेक शर्माची विस्फोटक खेळी, हैदराबादचा पंजाबवर 4 विकेट्सने विजय
Sunrisers Hyderabad vs Punjab Kings Match Result : सनरायजर्स हैदराबादने पंजाब किंग्सवर या हंगामात 9 एप्रिलनंतर आता पुन्हा एकदा पराभूत केलं आहे.
आयपीएलच्या 17 व्या मोसमात सनरायजर्स हैदराबादने साखळी फेरीतील आपल्या मोहिमेचा शेवट हा विजयाने केला आहे. पंजाब किंग्सने सनरायजर्स हैदराबादवर या हंगामात दुसऱ्यांदा विजय मिळवला आहे. पंजाब किंग्सने सनरायजर्स हैदराबादला विजयासाठी 215 धावांचं आव्हान दिलं होतं. हैदराबादने हे आव्हान 19.1 ओव्हर्समध्ये 6 विकेट्स गमावून पूर्ण केलं. हैदराबादसाठी अभिषेक शर्मा याने सर्वाधिक धावांचं योगदान दिलं. तर इतर फलंदाजांनी निर्णायक भूमिका बजावली. हैदराबादने या विजयासह पॉइंट्स टेबलमध्ये राजस्थान रॉयल्सला मागे टाकत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे.
हैदराबादची बॅटिंग
हैदराबादची आयपीएलमध्ये 215 धावांचा यशस्वी पाठलाग करण्याची ही दुसरी वेळ ठरली आहे. हैदराबादने याआधी 2023 मध्ये राजस्थान विरुद्ध 215 धावा चेस केल्या होत्या. हैदराबादकडून पंजाब विरुद्ध आजच्या सामन्यात अभिषे शर्मा याने 28 बॉलमध्ये 6 सिक्स आणि 5 चौकारांच्या मदतीने 66 धावांची खेळी केली. त्यानंतर राहुल त्रिपाठी 33, नितीश रेड्डी 37, हेन्रिक क्लासेन याने 42 धावा केल्या. शाहबाज अहमद 3 धावा करुन आऊट झाला. तर अब्दुल समद आणि सनवीर सिंह या जोडीने हैदराबादला विजयापर्यंत पोहचवलं. सनवीर याने 6 आणि अब्दुलने नाबाद 11 धावा केल्या. पंजाबकडून अर्शदीप सिंह आणि हर्षल पटेल या दोघांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या. तर हरप्रीत ब्रार आणि शशांक सिंह या दोघांच्या खात्यात 1-1 विकेट गेली.
त्याआधी पंजाबने टॉस जिंकून 20 ओव्हमध्ये 5 विकेट्स गमावून 214 धावांपर्यंत मजल मारली. अथर्व तायडे याने 46 धावा जोडल्या. प्रभसिमरन सिंग याने सर्वाधिक 71 रन्स केल्या. रायली रुसो याचं अर्धशतक अवघ्या 1 धावेने हुकलं. रुसो 49 धावांवर आऊट झाला. तर जितेश शर्मा याने अखेरच्या क्षणी 15 चेंडूत नाबाद 32 धावा करत पंजाबला 200 पार पोहचवण्यात मोठी भूमिका बजावली. तर तिघांनी प्रत्येकी 2 धावांचं योगदान दिलं. हैदराबादकडून टी नटराजन याने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या. तर पॅट कमिन्स आणि वी वैशाखनाथ या दोघांनी 1-1 विकेट घेतली.
हैदाराबादचा विजय
A successful chase of 2⃣1⃣5⃣ with 5 balls to spare! 😮@SunRisers finish their final league stage game with a 4⃣-wicket win at home 🧡
Scorecard ▶️ https://t.co/K5rcY5Z8FS#TATAIPL | #SRHvPBKS pic.twitter.com/bwE7HjnMz9
— IndianPremierLeague (@IPL) May 19, 2024
सनरायझर्स हैदराबाद प्लेइंग ईलेव्हन : पॅट कमिन्स (कर्णधार), अभिषेक शर्मा, नितीश रेड्डी, राहुल त्रिपाठी, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अब्दुल समद, शाहबाज अहमद, सनवीर सिंग, भुवनेश्वर कुमार, विजयकांत व्यासकांत आणि टी नटराजन.
पंजाब किंग्ज प्लेइंग ईलेव्हन : जितेश शर्मा (कॅप्टन आणि विकेटकीपर), प्रभसिमरन सिंग, अथर्व तायडे, रायली रोसो, शशांक सिंग, आशुतोष शर्मा, शिवम सिंग, हरप्रीत ब्रार, ऋषी धवन, हर्षल पटेल आणि राहुल चहर.