SRH vs RR: राजस्थानच्या पराभवानंतर कॅप्टन संजू जसप्रीत बुमराहचं नाव घेत म्हणाला…..

Ipl 2024 Qualifier 2 Sanju Samson: राजस्थान रॉयल्सला सनराजयर्स हैदराबादकडून क्वालिफायर 2 सामन्यात पराभूत व्हावं लागलं. राजस्थानच्या पराभवानंतर कॅप्टन संजू सॅमसनने जसप्रीत बुमराह याचं नावं घेतलं. नक्की तो काय म्हणाला?

SRH vs RR: राजस्थानच्या पराभवानंतर कॅप्टन संजू जसप्रीत बुमराहचं नाव घेत म्हणाला.....
sanju samson says sandip sharma best bowler after bumrahImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: May 25, 2024 | 1:47 AM

सनरायजर्स हैदराबादने चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियममध्ये धमाका करत राजस्थान रॉयल्सवर क्वालिफायर 2 सामन्यात 36 धावांनी विजय मिळवला. हैदराबादने या विजयासह राजस्थाचं पॅकअप केलं. तर हैदराबाद विजयासह अंतिम फेरीत पोहचली आहे. अंतिम सामना हा 26 मे रोजी कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध होणार आहे.या हंगामातील क्वालिफायर 2 सामना हा हैदराबाद विरुद्ध राजस्थान यांच्यात पार पडला. राजस्थानने या सामन्यात टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय घेतला. हैदराबादने 20 ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावून 175 धावांपर्यंत झेप घेतली. तर राजस्थानला 7 विकेट्स गमावून 139 धावाच करता आल्या.

संजू सॅमसनकडून संदीप शर्मा याची जसप्रीत बुमराह याच्यासह तुलना

राजस्थानच्या पराभवानंतर पोस्ट मॅच प्रेझेंटेनशनमध्ये कॅप्टन संजून सॅमसन याला वेगवान गोलंदाज संदीप शर्मा याच्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर संजू सॅमसन याने उत्तर दिलं. “मी संदीपसाठी फार आनंदी आहे. ऑक्शनमध्ये त्याला कुणीही घेतलं नाही. मात्र त्यानंतर संदीप शर्मा राजस्थान टीममध्ये बदली खेळाडू म्हणून जोडला गेला. संदीप शर्मा याने शानदार कामगिरी केली. जर संदीपची आकडेवारी पाहिलीत, तर जसप्रीत बुमराहनंतर त्याचाच नंबर आहे. संदीपची इकॉनॉमी आणि इतर सर्व बाबी उल्लेखनीय आहेत”, असं संजू सॅमसन याने म्हटलं.

संदीप शर्मा याची कामगिरी

दरम्यान संदीप शर्मा याने क्वालिफायर 2 सामन्यात सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध घातक सलामीवीर ट्रेव्हिस हेड याला आऊट केलं. संदीपने एकूण 4 ओव्हरमध्ये 25 धावांच्या मोबदल्यात 2 विकेट्स घेतल्या. संदीपने या हंगामातील एकूण 11 सामन्यांमध्ये 13 विकेट्स घेतल्या. संदीपची 18 धावांच्या मोबदल्यात 5 विकेट्स ही सर्वोत्तम कामगिरी राहिली.

सनरायजर्स हैदराबाद प्लेइंग ईलेव्हन: पॅट कमिन्स (कॅप्टन), ट्रेव्हिस हेड, अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, नितीश रेड्डी, एडेन मार्करम, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अब्दुल समद, भुवनेश्वर कुमार, जयदेव उनादकट आणि टी नटराजन.

राजस्थान रॉयल्स प्लेइंग ईलेव्हन: यशस्वी जयसवाल, टॉम कोहलर-कैडमोर, संजू सॅमसन (कॅप्टन आणि विकेटकीपर), रियान पराग, ध्रुव जुरेल, रोवमैन पॉवेल, आर अश्विन, ट्रेंट बोल्ट, अवेश खान, संदीप शर्मा आणि युजवेंद्र चहल.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.