SRH vs RR Qualifier 2: हैदराबादची फायनलमध्ये धडक, राजस्थानवर 36 धावांनी मात, ध्रुव जुरेलची एकाकी झुंज
Sunrisers Hyderabad vs Rajasthan Royals Qualifier 2 Match Highlights In Marathi: सनरायजर्स हैदराबादने राजस्थान रॉयल्सला विजयासाठी 176 धावांचं आव्हान दिलं होतं.
सनरायजर्स हैदराबादने या विजयासह अंतिम फेरीत धडक मारली आहे. आयपीएलच्या 17 व्या मोसमातील क्वालिफायर 2 सामन्यात सनरायजर्स हैदराबादने राजस्थान रॉयल्सवर 36 धावांनी विजय मिळवला आहे. हैदराबादने राजस्थानला विजयासाठी 176 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र राजस्थानला 20 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 139 धावाच इतक्याच धावा करता आल्या. राजस्थानकडून ध्रुव जुरेल या युवा फलंदाजाने अर्धशतकी खेळी करत एकाकी झुंज दिली. मात्र त्याला दुसऱ्या बाजूने साथ मिळाली नाही.राजस्थानचं या पराभवासह स्पर्धेतील आव्हान इथेच संपुष्टात आलं. सनरायजर्स हैदराबादची फायनलमध्ये पोहचण्याची एकूण तिसरी तर 2018 नंतर पहिलीच वेळ ठरली. तर आता 26 मे रोजी कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद यांच्यात ट्रॉफीसाठी महामुकाबला होणार आहे.
राजस्थानकडून ध्रुव जुरेल याने एकट्याने सर्वाधिक धावा केल्या. ध्रुवने अखेरपर्यंत एकाकी झुंज दिली. ध्रुवने 35 बॉलमध्ये 7 चौकार आणि 2 षटाकारांसह नाबाद 56 धावांची खेळी केली. तर ओपनर यशस्वी जयस्वाल याने 21 चेंडूत 42 धावांची खेळी केली. कॅप्टन संजू सॅमसन आणि टॉम कोहलर-कैडमोर या दोघांनी प्रत्येकी 10-10 धावा केल्या. तर इतर फलंदाज अपयशी ठरले. हैदराबादकडून शाहबाज अहमद याने 3 विकेट्स घेतल्या. अभिषेक शर्माने दोघांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. तर पॅट कमिन्स आणि टी नटराजन या दोघांनी 1-1 विकेट घेतली.
हैदराबादची बॅटिंग
दरम्यान त्याआधी राजस्थानने टॉस जिंकून हैदराबादला बॅटिंगसाठी भाग पाडलं. हैदराबादने 20 ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावून 175 धावा केल्या. हैदराबादकडून सर्वाधिक 50 धावा केल्या. तर राहुल त्रिपाठी याने 37 आणि ट्रेव्हिस हेड याने 34 धावांचं योगदान दिलं. तर शाहबाज अहमद आणि अभिषेक शर्मा या दोघांनी अनुक्रमे 18 आणि 12 रन्सचं योगदान दिलं. तर राजस्थानकडून आवेश खान आणि ट्रेंट बोल्ट या दोघांनी प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या. तर संदीप शर्मा याने 2 विकेट्स चांगली साथ दिली.
हैदराबादचा विजयी क्षण
Plenty to cheer & celebrate for the @SunRisers 🥳
An impressive team performance to seal a place in the all important #Final 🧡
Scorecard ▶️ https://t.co/Oulcd2FuJZ… #TATAIPL | #Qualifier2 | #SRHvRR | #TheFinalCall pic.twitter.com/nG0tuVfA22
— IndianPremierLeague (@IPL) May 24, 2024
सनरायजर्स हैदराबाद प्लेइंग ईलेव्हन: पॅट कमिन्स (कॅप्टन), ट्रेव्हिस हेड, अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, नितीश रेड्डी, एडेन मार्कराम, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अब्दुल समद, भुवनेश्वर कुमार, जयदेव उनादकट आणि टी नटराजन.
राजस्थान रॉयल्स प्लेइंग ईलेव्हन: यशस्वी जयसवाल, टॉम कोहलर-कैडमोर, संजू सॅमसन (कॅप्टन आणि विकेटकीपर), रियान पराग, ध्रुव जुरेल, रोवमैन पॉवेल, आर अश्विन, ट्रेंट बोल्ट, अवेश खान, संदीप शर्मा आणि युजवेंद्र चहल.