SRH vs RR : हैदराबादचा राजस्थान विरुद्ध टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय, 300 पार जाणार?
Sunrisers Hyderabad vs Rajasthan Royals Toss : सनराजयर्स हैदराबादने राजस्थान रॉयल्स विरुद्ध टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. पाहा दोन्ही संघांची प्लेईंग ईलेव्हन.
आयपीएलच्या 17 व्या मोसमातील 50 व्या सामन्यात सनराजयर्स हैदराबाज विरुद्ध राजस्थान रॉयल्स आमनेसामने आहेत. या सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी हैदराबादमधील राजीव गांधी स्टेडिममध्ये सुरुवात होणार आहे. त्याआधी 7 वाजता टॉस झाला. हैदराबादच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला. हैदराबादचा कॅप्टन पॅट कमिन्स याने राजस्थान विरुद्ध पहिले बॅटिंगचा निर्णय घेत संजू सॅमच्या कॅप्टन्सीतील राजस्थानला फिल्डिंगसाठी भाग पाडलं आहे. हैदराबाद आपल्या होम ग्राउंडमध्ये हा सामना खेळत आहे. हैदराबादने या हंगामात विक्रमी धावसंख्या उभारली आहे. त्यामुळे आता हैदराबाद राजस्थान विरुद्ध 300 पार मजल मारणार का? याची उत्सूकता क्रिकेट चाहत्यांना लागली आहे.
सनरायजर्स हैदराबाद या 17 व्या हंगामात 10 गुणांसह पॉइंट्स टेबलमध्ये पाचव्या स्थानी आहे. तर चौथ्या क्रमांकावर चेन्नई सुपर किंग्स आहे. चेन्नईचेही 10 पॉइंट्स आहेत.मात्र त्यांनी हैदराबादच्या तुलनेत एक सामना जास्त खेळला आहे. हैदराबादने राजस्थानवर विजय मिळवला तर त्यांना लखनऊला मागे टाकण्याची संधी आहे. राजस्थानच्या नावावर 9 सामन्यात 16 पॉइंट्स आहेत. राजस्थानने फक्त 1 सामना गमावला आहे.
हेड टु हेड रेकॉर्ड्स
दरम्यान सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात आतापर्यंत आयपीएलच्या इतिहासात एकूण 18 सामने झाले आहेत. दोन्ही संघ हे तुल्यबळ आहेत. हैदराबाद आणि राजस्थान दोन्ही संघांनी प्रत्येकी 9-9 सामने जिंकले आहेत. तर उभयसंघात झालेल्या 5 सामन्यांमध्ये राजस्थानने 2 वेळा विजय मिळवलाय. तर हैदराबाद दोनदा यशस्वी झालीय
हैदराबादने टॉस जिंकला
🚨 Toss Update 🚨@SunRisers win the toss and will be batting first against @rajasthanroyals
Follow the Match ▶️ https://t.co/zRmPoMjvsd#TATAIPL | #SRHvRR pic.twitter.com/VUCv2r7X9x
— IndianPremierLeague (@IPL) May 2, 2024
राजस्थान रॉयल्स प्लेइंग ईलेव्हन : संजू सॅमसन (कॅप्टन आणि विकेटकीपर), यशस्वी जयस्वाल, रियान पराग, ध्रुव जुरेल, रोवमन पॉवेल, शिमरॉन हेटमायर, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, आवेश खान, युझवेंद्र चहल आणि संदीप शर्मा.
सनरायजर्स हैदराबाद प्लेइंग ईलेव्हन : पॅट कमिन्स (कर्णधार), ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, अनमोलप्रीत सिंग, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), नितीश रेड्डी, अब्दुल समद, शाहबाज अहमद, मार्को जॅनसेन, भुवनेश्वर कुमार आणि टी नटराजन.