IPL 2024, Point Table : पंजाब-बंगळुरु सामन्यानंतर गुणतालिकेत उलथापालथ, कसा पडला फरक ते समजून घ्या
आयपीएलमध्ये प्रत्येक सामन्यानंतर गुणतालिकेवर फरक दिसून येत आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि पंजाब किंग्स सामन्यातील निकालानंतर त्याचा थेट प्रभाव गुणतालिकेवर दिसून आला आहे. आयपीएलमधील दुसऱ्या टप्प्यातील पहिला सामना होता. त्यामुळे या सामन्याचा निकालाने गुणतालिकेत उलथापालथ झाली आहे.
आयपीएल 2024 स्पर्धेतील सहावा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि पंजाब किंग्स यांच्यात पार पडला. हा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने 4 गडी राखून जिंकला. या सामन्यातील निकालानंतर गुणतालिकेत आखणी एक संघ 2 गुणांसह शर्यतीत उतरला आहे. पहिल्या टप्प्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला पराभवाचं तोंड पाहावं लागलं होतं. मात्र दुसऱ्या सामन्यात कमबॅक करत पंजाब विरुद्धचा सामना जिंकला. त्यामुळे दोन गुणांसह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुनेही प्लेऑफच्या दिशेने आपलं खातं खोललं आहे. होम ग्राउंड असल्याने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला त्याचा फायदा झाला असंच म्हणावं लागेल. राजस्थान रॉयल्स, चेन्नई सुपर किंग्स, पंजाब किंग्स, गुजरात टायटन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यानंतर दोन गुण मिळवणारा आरसीबी हा सहावा संघ आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा संघ गुणतालिकेत सहाव्या स्थानावर आहे.
राजस्थान रॉयल्सचे 2 गुणांसह +1.000 नेट रनरेट आहे. त्यामुळे पहिलं स्थान अबाधित आहे. चेन्नई सुपर किंग्सचे 2 गुण +0.779 रनरेटसह दुसऱ्या, गुजरात टायटन्स 2 गुणांसह +0.300 रनरेटसह तिसऱ्या, कोलकाता नाईट रायडर्सचा 2 गुण +0.200 रनरेटसह चौथ्या आहे. पंजाब किंग्सला एका सामन्यात विजय आणि एका सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. पण 2 गुण आणी 0.025 नेट रनरेटसह पाचव्या स्थानी आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु 2 गुण आणि -0.180 नेट रनरेटसह सहाव्या स्थानी आहे. पंजाबचं यात नुकसान झालं असून थेट तिसऱ्या स्थानावर पाचव्या स्थानी घसरला आहे.
संघ | सामने | विजय | पराजय | नेट रनरेट | गुण |
---|---|---|---|---|---|
राजस्थान रॉयल्स | 3 | 3 | 0 | +1.249 | 6 |
कोलकाता नाईट रायडर्स | 2 | 2 | 0 | +1.047 | 4 |
चेन्नई सुपर किंग्स | 3 | 2 | 1 | 0.976 | 4 |
गुजरात टायटन्स | 3 | 2 | 1 | -0.738 | 4 |
सनरायझर्स हैदराबाद | 3 | 1 | 2 | +0.204 | 2 |
लखनऊ सुपर जायंट्स | 2 | 1 | 1 | 0.025 | 2 |
दिल्ली कॅपिटल्स | 2 | 1 | 2 | -0.016 | 2 |
पंजाब किंग्स | 3 | 1 | 2 | 0.337 | 2 |
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु | 3 | 1 | 2 | -0.711 | 2 |
मुंबई इंडियन्स | 3 | 0 | 3 | -1.423 | 0 |
सनरायझर्स हैदराबद, मुंबई इंडियन्स, सनरायझर्स हैदराबाद, दिल्ली कॅपिटल्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांनी पहिला सामना गमावला आहे. त्यामुळे खात्यात एकही गुण नाही. त्यामुळे नेट रनरेटच्या आधारे हैदराबाद सातव्या, मुंबई इंडियन्स आठव्या, दिल्ली कॅपिटल्स नवव्या आणि लखनौ सुपर जायंट्स दहाव्या स्थानावर आहे.
26 मार्चला चेन्नई सुपर किंग्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात सामना होत आहे. या सामन्यातील निकालानंतर गुणतालिकेवर फरक दिसून येईल. कारण या दोन्ही संघांनी पहिला सामना जिंकला आहे. तसेच मागच्या पर्वात हे दोन संघ अंतिम सामन्यात आमनेसामने आले होते. तेव्हा चेन्नई सुपर किंग्सने गुजरातला पराभवाचं पाणी पाजलं होतं. त्यामुळे या सामन्यात द्वंद्व पाहायला मिळणार आहे. आता कोण हा सामना जिंकतो आणि आपल्या पारड्यात दोन गुणांची कमाई करतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.