“मी कसा प्लेयर आहे आहे हे कोणाला…”, विराट कोहलीचं त्या टीकेला सडेतोड उत्तर
आयपीएल 2024 स्पर्धेतील सर्वात उत्कंठा वाढवणारा सामना आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात होत आहे.हा सामना प्लेऑफच्या दृष्टीने खूपच महत्त्वाचा आहे. या सामन्यातील निकाल प्लेऑफचा चौथा संघ ठरवणार आहे. या सामन्यापूर्वी विराट कोहलीने आपल्यावर होत असलेल्या टीकांना चोख उत्तर दिलं आहे.
आयपीएल 2024 स्पर्धेत एखाद्या चमत्काराप्रमाणे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने कामगिरी केली आहे. साखळी फेरीत वारंवार पराभवाचं तोंड पाहिल्यानंतर प्लेऑफच्या शर्यतीत संघ असेल असं कोणालाही वाटलं नव्हतं. मात्र काळाच्या पोटात काय दडलं आहे हे कोणीही सांगू शकत नाही. चेन्नई सुपर किंग्सविरुद्धच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने जर तरची सर्व गणितं सोडवली तर प्लेऑफमध्ये स्थान मिळवणारा चौथा संघ ठरेल. या स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुसाठी विराट कोहली हा कणा ठरला आहे. त्याच्या सर्वाधिक धावा हे त्याचं उत्तम उदाहरण आहे. एका शतकी खेळीसह विराट कोहलीने 5 अर्धशतकं झळकावली आहेत. 661 धावांसह विराट कोहली सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत अव्वल स्थानी आहे. तसेच त्याच्या डोक्यावर ऑरेंज कॅपचा साज गेल्या काही दिवसांपासून कायम आहे. पण त्याच्या स्ट्राईक रेटवर माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी टीकास्त्र सोडलं होतं. त्यामुळे विराट कोहलीचे चाहते नाराज झाले होते. मात्र त्या टीकेवर विराट कोहलीने अप्रत्यक्षरित्या खडे बोल सुनावले आहेत. ही आग थंड होत नाही तोच सुनील गावस्कर यांच्या आणखी एका विधानाने भडका उडाला आहे.
“मला अजिबात प्रतिक्रिया देण्याची गरज वाटत नाही. मी मैदानात काय करू शकतो हे मला माहिती आहे. मी कसा खेळाडू आणि माझ्यात काय क्षमता आहे हे कोणालाही सांगण्याची गरज नाही. सामना कसा जिंकावा हे मी कोणालाच विचारलं नाही. मी स्वत: वेगवेगळ्या परिस्थितीत अयशस्वी होन शिकले ओहा. हे योगायोगाने घडत नाही. ठीक आहे तुम्ही संघासाठी एक किंवा दोन सामने जिंकलात. पण तिथे उभं राहून वारंवार जिंकत असाल तर हा योगायोग होऊ शकत नाही.”, असं विराट कोहलीने अप्रत्यक्षरित्या टीकाकारांना सुनावलं आहे.
Reminiscing the fond memories 🤩
Watch King Kohli take a trip down the memory lane in a special edition of Inside Out 👉 https://t.co/L4ALcHkzGZ#TATAIPL #JioCinema | @imVkohli | @ImRaina
— JioCinema (@JioCinema) May 18, 2024
विराट कोहलीची टी20 वर्ल्डकप संघात निवड झाली आहे. आयपीएल 2024 स्पर्धेतही त्याने चांगली कामगिरी केली आहे. 13 डावांमध्ये त्याने 155.16च्या स्ट्राईक रेटने 661 धावा केल्या आहेत. आता त्याच्याकडून टी20 वर्ल्डकप स्पर्धेतही चांगल्या खेळीची अपेक्षा आहे. दुसरीकडे, सुनील गावस्कर यांनी पुन्हा एकदा विराट कोहलीवर टीकास्त्र सोडलं आहे. विराट कोहलीच्या स्ट्राईक रेटवर पुन्हा एकदा आपलं मत नोंदवलं आहे.
Sunil Gavaskar said, "when Virat Kohli started his career it was a stop-start career. The fact that MS Dhoni gave him that little extra momentum is why he is the Kohli we see today". pic.twitter.com/tymB9ckTdz
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) May 17, 2024
स्टार स्पोर्ट्सशी बोलताना सुनील गावस्कर म्हणाले की, “जेव्हा विराट कोहलीने आपल्या करिअरची सुरुवात केली तेव्हा त्याचं करिअर थांबलं होतं. सुरुवातीला तो काही खास कामगिरी करत नव्हता. पण तरीही महेंद्रसिंह धोनीने त्याला संधी दिली. पण तरीही बऱ्याच सामन्यात त्याची कामगिरी हवी तशी झाली नाही. पण तरीही धोनीने त्याच्यावर विश्वास दाखवला. याच कारणामुळे आज आपण विराट कोहलीला ओळखतो.”