IPL Auction 2025 Live Streaming: इलेक्शननंतर आता होणार खेळाडूंचा फैसला, आयपीएल ऑक्शन कुठे पाहता येणार?
IPL 2025 Auction Date and Time: आयपीएल 2025 च्या मेगा ऑक्शनची साऱ्यांचा उत्सुकता लागून आहे. जाणून घ्या ऑक्शन लाईव्ह कुठे पाहायला मिळेल?
महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक 2024 चा निकाल स्पष्ट झाला आहे. राज्यातील 288 मतदारसंघांमध्ये 20 नोव्हेंबरला मतदान पार पडलं. त्यानंतर 23 नोव्हेंबरला निकाल लागला आहे. राज्यात महायुतीला एकतर्फी बहुमत मिळालं आहे. तर मविआचा डब्बा गूल झाला आहे. उमदेवारांचा फैसला लागल्यानंतर आता सर्वांचं लक्ष हे आयपीएल 2025 च्या मेगा ऑक्शनकडे लागून आहे. आयपीएलच्या 18 व्या मोसमासाठीचं मेगा ऑक्शन 2 दिवस असणार आहे. त्यामुळे कोणता खेळाडू महागडा ठरणार? कोणत्या खेळाडूला कोणती टीम घेणार? हे जाणून घेण्याची उत्सूकता अनेकांना लागली आहे. अशात आपण मेगा ऑक्शन लाईव्ह कुठे पाहता येणार? हे जाणून घेऊयात.
आयपीएल 2025 मेगा ऑक्शन केव्हा?
आयपीएल 2025 मेगा ऑक्शन 24 आणि 25 नोव्हेंबरला मेगा ऑक्शन होणार आहे.
आयपीएल 2025 मेगा ऑक्शन कुठे होणार?
आयपीएल 2025 मेगा ऑक्शन सौदी अरेबिया येथील जेद्दाह शहरात होणार आहे.
आयपीएल 2025 मेगा ऑक्शनला किती वाजता सुरुवात होणार?
आयपीएल 2025 मेगा ऑक्शनला भारतीय वेळेनुसार दुपारी 3 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे.
आयपीएल 2025 मेगा ऑक्शन टीव्हीवर कुठे पाहायला मिळेल?
आयपीएल 2025 मेगा ऑक्शन टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील विविध चॅनेल्सवर पाहायला मिळेल.
आयपीएल 2025 मेगा ऑक्शन मोबाईलवर लाईव्ह कुठे पाहायला मिळेल?
आयपीएल 2025 मेगा ऑक्शन मोबाईलवर जिओ सिनेमा एपवर लाईव्ह पाहायला मिळेल.
मेगा ऑक्शनचं काउंटडाऊन सुरु
CAN. NOT. WAIT ⏳
We are less than 24 hours away from the #TATAIPL Mega Auction 🔥🔥#TATAIPLAuction pic.twitter.com/ej2kJdL3rw
— IndianPremierLeague (@IPL) November 23, 2024
मेगा ऑक्शनबाबत महत्तवाचं
दरम्यान या मेगा ऑक्शनसाठी तब्बल 1 हजार 574 खेळाडूंनी नाव नोंदवलं होतं. मात्र त्यापैकी फक्त 574 खेळाडूंचीच मेगा ऑक्शनसाठी निवड करण्यात आली. आता आयपीएलमधील एकूण 10 फ्रँचायींना एकूण 204 खेळाडूंची गरज आहे. अशात 574 खेळाडूंवर बोली लागणार आहे. मात्र त्यातून कोणते 204 खेळाडू भाग्यवान ठरतात? याकडे साऱ्यांचं लक्ष असणार आहे.
सर्वात युवा आणि वयस्कर खेळाडू
वैभव सूर्यवंशी हा 13 वर्षीय या मेगा ऑक्शनमधील सर्वात युवा खेळाडू आहे. वैभव सूर्यवंशी याची बेस प्राईज ही 30 लाख रुपये इतकी आहे. तर इंग्लंडचा माजी वेगवान गोलंदाज हा या मेगा ऑक्शनमधील सर्वात वयस्कर खेळाडू आहे. जेम्स अँडरसन या दिग्गज गोलंदाजाला कोणती टीम आपल्या गोटात घेते? याकडेही साऱ्यांचं लक्ष असणार आहे.