IPL 2025: आयपीएल खेळणाऱ्या क्रिकेटपटूंवर पैशाचा पाऊस, जय शाह यांची मोठी घोषणा
Ipl 2025 Jay Shah Bcci: बीसीसीआय सचिव जय शाह यांच्या एका घोषणेमुळे आयपीएल खेळणाऱ्या खेळाडूंवर पैशांचा पाऊस होणार आहे. खेळाडूला किमान साडे सात लाख तर कमाल 1 कोटींपेक्षा अधिक रक्कम मिळणार आहे.
बीसीसीआय अर्थात भारतीय क्रिकेट नियमाक मंडळाचे सचिव जय शाह यांनी मोठी घोषणा केली आहे. जय शाह यांनी आयपीएलच्या 18 व्या मोसमाआधी क्रिकेटपटूंना मालामाल करायचं ठरवलं आहे. आयपीएलमध्ये खेळणाऱ्या खेळाडूंना कराराव्यतिरिक्त प्रत्येक सामन्यासाठी तब्बल 7 लाख 50 हजार रुपये मिळणार आहेत. आयपीएलमध्ये प्रत्येक टीम साखळी फेरीत 14 सामने खेळते. त्यानुसार सर्व सामने खेळणाऱ्या खेळाडूला 1 कोटी 50 लाख रुपये देण्यात येतील. यासाठी प्रत्येक फ्रँचायजी 12 कोटी 60 लाख रुपयांची रक्कम वेगळी ठेवणार आहे. बंगळुरुत आयपीएलच्या सर्वसाधारण बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. जय शाह यांनी एक्स प्लॅटफॉर्मवर याबाबतची माहिती चली आहे.
जय शाह यांची सोशल मीडिया पोस्ट
“आयपीएलमधील निरंतरता आणि उल्लेखनीय कामगिरीच्या सन्मानार्थ ऐतिहासिक निर्णय घेतला गेला आहे. आम्ही आमच्या क्रिकेटपटूंना प्रत्येक सामन्यासाठी 7 लाख 50 हजार मानधन जाहीर करत आहोत. तसेच हंगामातील सर्व सामने खेळणाऱ्या खेळाडूला 1 कोटी 50 लाख रुपये वेगळे दिले जातील. प्रत्येक फ्रँचायजी एका हंगामासाठी मानधनासाठी 12.60 कोटी रुपयांची तरतूद करेल. ही आयपीएल आणि आपल्या खेळाडूंसाठी एका नव्या युगाची सुरुवात आहे”, असं जय शाह यांनी एक्स पोस्टमध्ये म्हटलं आहे.
जय शाह यांची मोठी घोषणा
In a historic move to celebrate consistency and champion outstanding performances in the #IPL, we are thrilled to introduce a match fee of INR 7.5 lakhs per game for our cricketers! A cricketer playing all league matches in a season will get Rs. 1.05 crores in addition to his…
— Jay Shah (@JayShah) September 28, 2024
कुणाला होणार सर्वाधिक फायदा?
आयपीएल स्पर्धेला 2008 पासून सुरुवात झाली. तेव्हापासून ते आतापर्यंत एकूण सतरा हंगाम खेळवण्यात आले आहेत. या 17 हंगामांमध्ये खेळाडूंना करारात ठरलेली रक्कमच मिळायची. मात्र आता बीसीसीआयच्या या निर्णयामुळे अनकॅप्ड (आंतरराष्ट्रीय पदार्पण न झालेले) खेळाडूंचा फायदा होईल, ज्यांना बेस प्राईजमध्ये ताफ्यात घेतलं जातं. आयपीएलमधील ऑक्शनची बेस प्राईज (किमान) ही 20 लाख रुपये आहे. आता ऑक्शनमधून 20 लाख रुपये मिळालेल्या खेळाडूंना प्लेइंग ईलेव्हनमध्ये संधी मिळाल्यास या निर्णयाचा फायदा होणार आहे.