RR vs KKR Confirmed Playing XI, IPL 2025 : कोलकाताला मोठा झटका, मॅचविनर खेळाडू ‘आऊट’, राजस्थानकडूनही बदल
Rajasthan Royals vs Kolkata Knight Riders Confirmed Playing XI in Marathi: आयपीएलच्या 18 व्या मोसमात पराभवाने सुरुवात झालेल्या कोलकाता नाईट रायडर्सला दुसऱ्या सामन्यात मोठा झटका लागला आहे. केकेआरचा मॅचविनर खेळाडू राजस्थानविरुद्धच्या सामन्यातून बाहेर झाला आहे.

आयपीएलच्या 18 व्या मोसमातील (IPL 2025) सहाव्या सामन्यात राजस्थान रॉयल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स आमनेसामने आहेत. या सामन्याचं आयोजन हे गुवाहाटीतील बारसपारा क्रिकेट स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. या सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. त्याआधी 7 वाजता टॉस झाला आहे. कोलकाताच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला. कर्णधार अजिंक्य रहाणे याने फिल्डिंगचा निर्णय घेत राजस्थानला बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे. कोलकाताला या सामन्याआधी मोठी झटका लागला आहे. कोलकाताचा मॅचविनर खेळाडू बाहेर झाला आहे.
कोलकाताचा मॅचविनर खेळाडू आऊट
कोलकाता आणि राजस्थान या दोन्ही संघांचा या मोसमातील हा दुसरा सामना आहे. दोन्ही संघांची या मोसमात पराभवाने सुरुवात झालीय. त्यामुळे दोन्ही संघ दुसऱ्या सामन्यात विजयाच्या तयारीने उतरले आहेत. दोन्ही संघांनी आपल्या प्लेइंग ईलेव्हनमध्ये प्रत्येकी 1-1 बदल केला आहे. कोलकाताचा मॅचविनर खेळाडू ऑलराउंडर सुनील नारायण हा या सामन्यात खेळणार नसल्याची माहिती कर्णधार अजिंक्य रहाणे याने टॉसदरम्यान दिली. सुनीलला बरं वाटत नसल्याने त्याला या सामन्याला मुकावं लागलं आहे. सुनीलच्या जागी प्लेइंग ईलेव्हनमध्ये मोईन अली याचा समावेश करण्यात आला आहे.
राजस्थानकडून कुणाला संधी?
दरम्यान राजस्थाननेही कोलकाताप्रमाणे 1 बदल केलाय. फझलहक फारुकी याच्या जागी वानिंदू हसरंगा याचा समावेश करण्यात आला आहे. आता वानिंदू या संधीचा किती फायदा घेतो? याकडे टीम मॅनजमेंटचं लक्ष असणार आहे.
केकेआर-आरआर पहिल्या विजयासाठी सज्ज, कोण जिंकणार?
Both teams all in readiness to get their 1st 𝗪 of the season. 🙌
Who will bag 2 crucial points in Guwahati tonight? 🤔
Updates ▶ https://t.co/lGpYvw7zTj#TATAIPL | #RRvKKR | @KKRiders | @rajasthanroyals pic.twitter.com/KZqXx2jQtu
— IndianPremierLeague (@IPL) March 26, 2025
राजस्थान रॉयल्स प्लेइंग ईलेव्हन : यशस्वी जैस्वाल, संजू सॅमसन, नितीश राणा, रियान पराग (कर्णधार), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), शिमरोन हेटमायर, वानिंदू हसरंगा, जोफ्रा आर्चर, महेश तीक्षाना, तुषार देशपांडे आणि संदीप शर्मा.
कोलकाता नाइट रायडर्स प्लेइंग ईलेव्हन : क्विंटन डी कॉक, व्यंकटेश अय्यर, अजिंक्य रहाणे (कर्णधार), रिंकू सिंग, मोईन अली, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, स्पेन्सर जॉन्सन, वैभव अरोरा, हर्षित राणा आणि वरुण चक्रवर्ती.