
आयपीएलच्या 18 व्या मोसमात (IPL 2025) रविवारी 23 मार्चला डबल हेडरचं आयोजन करण्यात आलं आहे. या डबल हेडरमधील दुसऱ्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स हे 2 तगडे आणि यशस्वी संघ आमनेसामने आहेत. सामन्याचं आयोजन हे एमए चिदंबरम स्टेडियममध्ये (चेपॉक) करण्यात आलं आहे. या सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. त्याआधी 7 वाजता टॉस झाला. चेन्नईने टॉस जिंकला. कर्णधार ऋतुराज गायकवाड याने फिल्डिंगचा निर्णय घेत मुंबईला बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे.
मुंबई विरुद्ध चेन्नई दोन्ही संघ आयपीएल स्पर्धेत आतापर्यंत एकूण 37 वेळा एकमेकांविरुद्ध खेळले आहेत.मुंबईने या 37 पैकी सर्वाधिक सामन्यात विजय मिळवला आहे. मुंबईने 20 सान्यांत चेन्नईवर मात केली आहे. तर चेन्नईने 17 सामन्यात विजय मिळवला आहे. तसेच चेन्नईने मुंबईविरुद्ध गेल्या 6 पैकी 5 सामन्यात विजय मिळवला आहे. तसेच चेन्नईने मुंबईवर गेल्या 3 सामन्यांत सलग विजय मिळवला आहे.
मुंबईने आतापर्यंत चेन्नईविरुद्ध चेपॉक स्टेडियममध्ये एकूण 9 सामने खेळले आहेत. मुंबईने 9 पैकी 6 सामन्यात चेन्नईवर विजय मिळवला आहे. तर चेन्नईला मुंबईविरुद्ध आपल्याच घरच्या मैदानात फक्त 3 सामन्यातच जिंकता आलं आहे.
चेन्नईने टॉस जिंकला
🚨 Toss from the MA Chidambaram Stadium 🏟@ChennaiIPL won the toss and elected to bowl against @mipaltan
Updates ▶️ https://t.co/QlMj4G7kV0 #TATAIPL | #CSKvMI pic.twitter.com/y4Ddqxvr1n
— IndianPremierLeague (@IPL) March 23, 2025
दरम्यान मुंबईची पहिले बॅटिंग असल्याने क्रिकेट चाहत्यांना रोहित शर्माच्या बॅटिंगची प्रतिक्षा आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. रोहितने न्यूझीलंडविरुद्ध अंतिम फेरीत स्फोटक खेळी केली होती. चाहत्यांना तशाच खेळीची अपेक्षा आयपीएलमध्येही असणार आहे.
मुंबई इंडियन्स प्लेइंग ईलेव्हन : रोहित शर्मा, रायन रिकेल्टन (विकेटकीपर), विल जॅक्स, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, नमन धीर, रॉबिन मिन्झ, मिचेल सँटनर, दीपक चहर, ट्रेंट बोल्ट आणि सत्यनारायण राजू.
चेन्नई सुपर किंग्ज प्लेइंग ईलेव्हन : ऋतुराज गायकवाड (कर्णधार), रचिन रवींद्र, दीपक हुडा, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, सॅम करन, एमएस धोनी (विकेटकीपर), आर अश्विन, नूर अहमद, नॅथन एलिस आणि खलील अहमद.