CSK vs RCB : रजत पाटीदारची अर्धशतकी खेळी, चेन्नईसमोर 197 धावांचं आव्हान, कोण जिंकणार?
Chennai Super Kings vs Royal Challengers Bengaluru 1st Innings Highlights : आरसीबीसाठी रजत पाटीदार याने सर्वाधिक धावांचं योगदान दिलं. तर अखेरच्या क्षणी टीम डेव्हिड याने फटकेबाजी केली. त्यामुळे आरसीबीला 190 पार मजल मारता आली.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने चेन्नई सुपर किंग्सला विजयासाठी 197 धावांचं आव्हान दिलं आहे. आरसीबीने चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियममध्ये 20 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 197 धावा केल्या. आरसीबीसाठी कर्णधार रजत पाटीदार याने सर्वाधिक धावांचं योगदान दिलं. रजतने अर्धशतक केलं. रजत व्यतिरिक्त विराट कोहली, फिलिप सॉल्ट आणि देवदत्त पडीक्कल या त्रिकुटानेही महत्त्वाची खेळी केली. तर अखेरच्या क्षणी टीम डेव्हिड याने 20 व्या ओव्हरमध्ये सलग 3 चौकार ठोकून आरसीबीला 190 पार पोहचवलं. आता सीएसके घरच्या मैदानात हे विजयी आव्हान पूर्ण करणार का? याकडे यलो आर्मीचं लक्ष असणार आहे.
आरसीबीची बॅटिंग
आरसीबीसाठी कर्णधार रजत पाटीदार याने सर्वाधिक धावा केल्या. रजतने 32 बॉलमध्ये 3 सिक्स आणि 4 फोरसह 51 रन्स केल्या. तसेच टॉप 3 फलंदाजांनीही चांगलं योगदान दिलं. मात्र त्या तिघांपैकी एकालाही मोठी खेळी करता आली नाही. फिल सॉल्ट याने 16 बॉलमध्ये 1 सिक्स आणि 5 फोरच्या मदतीने 32 रन्स केल्या. देवदत्त पडीक्कल 14 बॉलमध्ये 27 रन्स करुन माघारी परतला. तर विराट कोहली याने 30 बॉलमध्ये 31 रन्स केल्या.
त्यानंतर लियाम लिविंगस्टोन आणि जितेश शर्मा या दोघांकडून आरीसीबीला फटकेबाजीची आशा होती. मात्र या दोघांपैकी कुणालाही तसं करणं जमलं नाही. लिविंगस्टोन 10 आणि जितेश शर्मा 12 धावा करुन माघारी परतले. तर टीम डेव्हिड याने 20 व्या ओव्हरमध्ये धमाका केला. टीमने शेवटच्या ओव्हरमध्ये सलग 3 सिक्स झळकावले. त्यामुळे सामन्यात रंगत आली आणि आरसीबाला 190 पार पोहचता आलं. डेव्हिडने 8 बॉलमध्ये 3 सिक्स आणि 1 फोरसह नॉट आऊट 22 रन्स केल्या.
चेन्नईसाठी नूर अहमद याने सर्वाधिक विकेट्स घेतल्या. नूरने तिघांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. मथीशा पथिराणा याने दोघांना आऊट केलं. तर खलील अहमद आणि आर अश्विन या दोघांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.
चेन्नईसमोर 197 धावांचं आव्हान
Innings Break ‼
Solid show with the bat by @RCBTweets 👏👏
They put up a target 🎯 of 1️⃣9️⃣7️⃣ for #CSK
Which way is this one going? 🤔
Scorecard ▶ https://t.co/I7maHMwxDS #TATAIPL | #CSKvRCB pic.twitter.com/ZUtXTDeSDi
— IndianPremierLeague (@IPL) March 28, 2025
रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू प्लेइंग इलेव्हन : विराट कोहली, फिलिप सॉल्ट, देवदत्त पडिक्कल, रजत पाटीदार (कर्णधार), लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा (विकेटकीपर), टिम डेव्हिड, क्रुणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, जोश हेजलवुड आणि यश दयाल.
चेन्नई सुपर किंग्ज प्लेइंग ईलेव्हन : रचीन रवींद्र, ऋतुराज गायकवाड (कॅप्टन), राहुल त्रिपाठी, दीपक हुडा, सॅम कुरन, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, नूर अहमद, मथीशा पाथीराना आणि खलील अहमद.