DC vs LSG : आशुतोश शर्माची ‘इमपॅक्ट’ खेळी, रंगतदार सामन्यात दिल्लीचा लखनऊवर 1 विकेटने विजय
IPL 2025 Delhi Capitals vs Lucknow Super Giants Match Result And Highlights : लखनौ सुपर जायंट्सने दिल्ली कॅपिट्ल्सला विजयासाठी 210 धावांचं आव्हान दिलं होतं. दिल्लीने हे आव्हान आशुतोष शर्मा याने केलेल्या नाबाद अर्धशतकी खेळीच्या जोरावर पूर्ण केलं आणि विजयी सलामी दिली.

आशुतोश शर्मा याच्या ‘इमपॅक्ट’ खेळीच्या जोरावर दिल्ली कॅपिट्ल्सने आयपीएलच्या 18 व्या मोसमातील मोहिमेची विजयी सुरुवात केली आहे. लखनौ सुपर जायंट्सने दिल्ली कॅपिट्ल्सला विजयासाठी 210 धावांचं आव्हान दिलं होतं. दिल्लीने हे आव्हान आशुतोषच्या नाबाद अर्धशतकी खेळीच्या जोरावर 9 विकेट्स गमावून 19.3 ओव्हरमध्ये पूर्ण केलं. दिल्लीने 211 धावा केल्या. इमपॅक्ट प्लेअर असलेल्या आशुतोषने आपल्या भूमिकेला न्याय दिला. तसेच आशुतोषला विपराज निगम यानेही निर्णायक क्षणी चांगली साथ दिली. आशुतोष आणि विपराज या दोघांनी सातव्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. या भागीदारीने सामना दिल्लीच्या बाजूने फिरला.
दिल्लीची घसरगुंडी आणि निर्णायक क्षणी कमबॅक
फाफ डु प्लेसीस 29 धावांवर आऊट झाला. फाफच्या रुपात दिल्लीने 65 धावांवर पाचवी विकेट गमावली. त्यामुळे दिल्ली अडचणीत सापडली होती. मात्र इथून दिल्लीने कमबॅक केलं. ट्रिस्टन स्टब्स आणि आशुतोष शर्मा या दोघांनी सहाव्या विकेटसाठी 36 बॉलमध्ये 48 रन्स केल्या. त्यानंतर ट्रिस्टन स्टब्स 22 बॉलमध्ये 34 रन्स करुन आऊट झाला.
त्यानंतर विपराज निगम आणि आशुतोषने सातव्या विकेटसाठी 23 बॉलमध्ये 55 रन्सची पार्टनरशीप केली. त्यानंतर विपराज 15 बॉलमध्ये 39 रन्स करुन आऊट झाला. आशुतोषने त्यानंतर शेपटीच्या फलंदाजांना सोबत घेऊन दिल्लीला विजयापर्यंत पोहचवलं. आशुतोषने दिल्लीला अवघड वाटणारा विजय मिळवून दिला. आशुतोषने दिल्लीसाठी सर्वाधिक आणि नाबाद धावा केल्या. आशुतोषने 31 बॉलमध्ये 5 सिक्स आणि 5 फोरसह नॉट आऊट 66 रन्स केल्या. तर लखनौ सुपर जायंट्सकडून शार्दूल ठाकुर, एम सिद्धार्थ, दिग्वेश राथी, रवी बिश्नोई या चौघांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या.
दिल्लीची विजयी सलामी, आशुतोषची गेमचेंजिग खेळी
Fearless ✅ Courageous ✅
For his 𝙍𝙤𝙖𝙧𝙞𝙣𝙜 game-changing knock, Ashutosh Sharma bags the Player of the Match award 🏆💙
Scorecard ▶ https://t.co/aHUCFODDQL#TATAIPL | #DCvLSG | @DelhiCapitals pic.twitter.com/jHCwFUCvP5
— IndianPremierLeague (@IPL) March 24, 2025
लखनौ सुपर जायंट्स प्लेइंग ईलेव्हन : एडन मार्कराम, मिचेल मार्श, निकोलस पूरन, आयुष बडोनी, ऋषभ पंत (कॅप्टन आणि विकेटकीपर), डेव्हिड मिलर, प्रिन्स यादव, दिग्वेश राठी, शाहबाज अहमद, शार्दूल ठाकुर आणि रवी बिश्नोई.
दिल्ली कॅपिटल्स प्लेइंग ईलेव्हन : जेक फ्रेझर-मॅकगुर्क, फाफ डू प्लेसिस, अभिषेक पोरेल (विकेटकीपर), समीर रिझवी, अक्षर पटेल (कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, विपराज निगम, मिचेल स्टार्क, कुलदीप यादव, मोहित शर्मा आणि मुकेश कुमार.