आयुष्य खूप चांगलं आहे मित्रा, कारण गोलंदाजी..! मिचेल मार्श असं का म्हणाला?
आयपीएल 2025 स्पर्धेत गोलंदाजांचं काय खरं नाही असं दिसत आहे. गोलंदाजांना कुठे चेंडू टाकावा याचा प्रश्न पडला आहे. लखनौ सुपर जायंट्सकडून खेळणाऱ्या मिशेल मार्शने या सामन्यात आक्रमक खेळी केली. 36 चेंडूत 72 धावांची खेळी केली. पण पहिल्या डावानंतर मनातलं सांगून गेला.

आयपीएल स्पर्धा म्हणजे गोलंदाजांचं काय खरं नाही हे जवळपास निश्चित.. कारण फलंदाज चेंडू टप्प्यात आला की आला थेट सीमेपार पोहोचवण्याची ताकद ठेवतात. त्यामुळे गोलंदाजांना कुठे चेंडू टाकावा हेच कळत नाही. लखनौ सुपर जायंट्सने दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या सामन्यात अशीच आक्रमक खेळी केली. लखनौ सुपर जायंट्सने 20 षटकात 8 गडी गमवून 209 धावा केल्या आणि विजयासाठी 210 धावांचं आव्हान दिलं. मिशेल मार्श आणि निकोलस पूरन यांनी दिल्ली कॅपिटल्सच्या गोलंदाजांची पिसं काढली. दुसर्या विकेटसाठी 87 धावांची भागीदारी केली. यावेळी मिशेल मार्शने 36 चेंडूत 6 चौकार आणि 6 षटकारांच्या मदतीने 72 धावा केल्या. मुकेश कुमारच्या गोलंदाजीवर फटका मारताना चूक झाली आणि बाद होत तंबूत परतला. त्याची आक्रमक खेळी आणि पहिला डाव झाल्यानंतर समालोचकांनी त्याला प्रश्न विचारले.
मिशेल मार्श म्हणाला की, ‘मला वाटलं की आम्ही खूप चांगली फलंदाजी केली, आम्ही ज्या पद्धतीने सुरुवात केली त्यानंतर आणखी काही धावा हव्या होत्या, पण मला वाटतं की 210 धावा हा खूप स्पर्धात्मक धावसंख्या आहे. मला वाटतं की हे सगळं तुमच्या कौशल्यांना पाठिंबा देण्याबद्दल आहे. जेव्हा तुम्ही खेळत असता तेव्हा भागीदारी चालू ठेवली पाहिजे. अशा सुरुवातीनंतर येणाऱ्या खेळाडूंना तुम्ही पाठिंबा दिला पाहिजे. दिल्लीच्या खेळाडूंना श्रेय दिले की त्यांनी खेळ जशा केल्या तशाच खेळपट्टीवर मात केली. मला वाटतं ते थोडे स्विंग होत होते. मला विझाग आवडते, येथे एक सुंदर खेळपट्टी आहे, फलंदाजांनी ते आवडले. आशा आहे की आमचे गोलंदाज काम करतील. आयुष्य चांगले आहे मित्रा. गोलंदाजी करत नाही. ‘
ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू मिचेल मार्शला आयपीएल गोलंदाजी न करण्याच्या अटीवर परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे मार्श पूर्णवेळ फलंदाज म्हणून खेळेल. दुखापतीमुळे मार्श चॅम्पियन्स ट्रॉफीमधून बाहेर पडला होता . ESPNcricinfo च्या रिपोर्टनुसार, पुनर्वसन आणि वैद्यकीय तपासणीनंतर मार्शला परिस्थितीनुसार खेळण्याची परवानगी देण्यात आली आहे. मार्शला गोलंदाजी न करण्याचा आणि क्षेत्ररक्षण करताना त्याच्या पाठीला जास्त त्रास होणार नाही याची काळजी घेण्यास सांगितलं आहे.