दिल्ली कॅपिटल्स संघात मोठी उलथापालथ, गांगुलीला साईड लाईन करत या खेळाडूकडे प्रमुख कोचपदाची धुरा!
आयपीएल 2025 स्पर्धेपूर्वी फ्रेंचायझीमध्ये मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे. मेगा लिलाव पार पडणार आहे. तत्पूर्वी फ्रेंचायझींनी बॅक स्टाफमध्ये बदल करण्यास सुरुवात केली आहे. असाच काहीसा बदल दिल्ली कॅपिटल्स संघात झाला आहे. पाँटिंगने सोडचिठ्ठी दिल्यानंतर सौरव गांगुलीला धुरा मिळेल असं वाटत होतं. पण आता ही दुसऱ्याकडेच सोपवण्यात आली आहे
आयपीएल 2025 स्पर्धेपूर्वी मेगा लिलाव पार पडणार आहे. या लिलावासाठी आतापासूनच फ्रेंचायझींनी कंबर कसली आहे. खासकरून अजूनही जेतेपदावर नाव न कोरलेल्या संघांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. यात पंजाब किंग्स, लखनौ सुपर जायंट्स, दिल्ली कॅपिटल्स हे संघ आघाडीवर आहेत. नुकतंच रिकी पाँटिंगने दिल्ली कॅपिटल्स फ्रेंचायझी सोडली होती. त्यानंतर पंजाब किंग्स संघाची कास धरली. असं असताना त्याच्या जागी सौरव गांगुलीला धुरा मिळेल अशी चर्चा होती. मात्र तसं काही घडलं नाही. दिल्ली कॅपिटल्सने 2025 स्पर्धेपूर्वी संघासाठी नव्या कोचची घोषणा केली आहे. माजी क्रिकेटपटू हेमांग बदानीकडे मुख्य प्रशिक्षकपदाची धुरा सोपण्यात आली आहे. बदानीसोबत माजी क्रिकेटपटू वेणुगोपाल रावला क्रिकेट संचालक म्हणून पदभार सोपवला आहे. म्हणजेच रिकी पाँटिंगच्या जागी हेमांग बदानी याची नियुक्ती झाली आहे. तर राव यांनी भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली याची जागा घेतली आहे. ईएसपीएनक्रिकइन्फोकडून मिळालेल्या माहितीनुसार, येत्या काही दिवसांत दिल्ली कॅपिटल्स फ्रेंचायझी सहाय्यक प्रशिक्षक आणि मार्गदर्शकांच्या कोचिंग स्टाफमध्ये आणखी बदल करणार आहे.
दुसरीकडे, 2014 पासून सहाय्यक प्रशिक्षक आणि टॅलेंट स्काउट म्हणून काम करणाऱ्या प्रवीण आम्रेचा करार संपुष्टात आणला आहे. म्हणजेच या पर्वात प्रवीण आम्रे संघासोबत नसेल. इतकंच काय तर दिल्ली फ्रेंचायझीने दर दोन वर्षांनी आयपीएल आणि डब्ल्यूपीएल संघातील ऑपरेशनल नेतृत्व अदलाबदल करण्याची भूमिका घेतली आहे. याचाच एक भाग म्हणून सौरव गांगुली पुढील दोन पर्वात डब्ल्यूपीएलमधील फ्रेंचायझीसाठी क्रिकेट संचालक म्हणून कार्यभार सांभाळेल. गांगुली 2027 मध्ये पुन्हा एकदा आयपीएलसाठी काम करेल, अशी चर्चा आहे.
🚨𝐀𝐍𝐍𝐎𝐔𝐍𝐂𝐄𝐌𝐄𝐍𝐓🚨
We’re delighted to welcome Venugopal Rao & Hemang Badani in their roles as Director of Cricket (IPL) & Head Coach (IPL) respectively 🫡
Here’s to a new beginning with a roaring vision for success 🙌
Click here to read the full story 👇🏻… pic.twitter.com/yorgd2dXop
— Delhi Capitals (@DelhiCapitals) October 17, 2024
दरम्यान, हेमांग बदानी भारतासाठी 40 वनडे आणि 4 कसोटी सामने खेळला आहे. त्यामुळे त्याच्या नियुक्तीमुळे क्रीडारसिसांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. पण देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्याने दिलेलं प्रशिक्षण जमेची बाजू ठरली. टी20 क्रिकेटमधील त्याचं प्रशिक्षण चर्चेचं विषय ठरलं आहे. हेमांग बदानी काही वर्षे चेन्नई सुपर किंग्ज संघाचा भाग होता. त्यानंतर चेपॉक सुपर गिलीज संघाच्या मुख्य प्रशिक्षकाची जबाबदारी स्वीकारली होती. या कारकिर्दित टीएनपीएलमध्ये तीन किताब जिंकले. आयपीएल 2022 मध्ये सनरायझर्स हैदराबादने क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आणि स्काउट बनवले. बदानीला विदेशी लिगमध्येही प्रशिक्षणाचा अनुभव आहे. 2023 मध्ये सनरायझर्स ईस्टर्न केपचा सहाय्यक प्रशिक्षक होता. तेव्हा एसए20 स्पर्धेचं जेतेपद जिंकलं होतं. जाफना किंग्जने अलीकडेच लंका प्रीमियर लीग जिंकली. तेव्हा तो प्रशिक सल्लागार होता.