Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

GT vs MI Toss : मुंबईने अहमदाबादमध्ये टॉस जिंकला, हार्दिक पंड्याचं कमबॅक, गुजरातविरुद्ध पलटणचा बॉलिंगचा निर्णय

Gujarat Titans vs Mumbai Indians Toss IPL 2025 : गुजरातमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये मुंबईच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला आहे. जाणून घ्या पलटणच्या प्लेइंग ईलेव्हनमध्ये कोण?

GT vs MI Toss : मुंबईने अहमदाबादमध्ये टॉस जिंकला, हार्दिक पंड्याचं कमबॅक, गुजरातविरुद्ध पलटणचा बॉलिंगचा निर्णय
GT vs MI Toss Ipl 2025Image Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Mar 29, 2025 | 7:29 PM

आयपीएलच्या 18 व्या मोसमातील (IPL 2025) नवव्या सामन्यात गुजरात टायटन्स (Gujarat Titans) विरुद्ध मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आमनेसामने आहेत. सामन्याचं आयोजन हे अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. या सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. त्याआधी 7 वाजता टॉस झाला आहे. मुंबईच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला आहे. कर्णधार हार्दिक पंड्या याने फिल्डिंगचा निर्णय घेतला आहे. दोन्ही संघ पहिल्या विजयाच्या प्रतिक्षेत आहेत. दोन्ही संघांना या मोहिमेतील पहिल्या सामन्यात पराभूत व्हावं लागलं. त्यामुळे हा सामना जिंकून विजयाचं खातं उघडण्याचा प्रयत्न दोन्ही संघांचा असणार आहे. त्यामुळे उभयसंघात विजयासाठी चुरस पाहायला मिळणार आहे.

हेड टु हेड रेकॉर्ड्स

आयपीएलमध्ये आतापर्यंत मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात एकूण 5 सामने खेळवण्यात आले आहेत. गुजरातने या 5 पैकी 3 सामन्यात विजय मिळवला आहे. तर मुंबईला 2 वेळा गुजरातवर मात करण्यात यश आलं आहे. उभयसंघात गेल्या हंगामात (IPL 2024) एक सामना खेळवण्यात आला होता. तेव्हा गुजरात टायटन्सने मुंबईवर 6 धावांनी विजय मिळवला होता.

हार्दिक पंड्याची एन्ट्री

गुजरातविरुद्धच्या सामन्यातून मुंबईचा कर्णधार हार्दिक पंड्या परतला आहे. मुंबईचा हा या हंगामातील दुसरा सामना आहे. हार्दिकला पहिल्या सामन्यात कारवाईमुळे खेळता आलं नव्हतं. त्यामुळे सूर्यकुमार यादव याने चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध नेतृत्व केलं होतं. मात्र सूर्याच्या नेतृत्वात मुंबईची मोहिमेतील सुरुवात पराभवाने झाली. त्यामुळे कॅप्टन हार्दिकसमोर मुंबईला गुजरातविरुद्ध विजयी करण्याचं आव्हान असणार आहे.

मुंबईने टॉस जिंकला, गुजरात बॅटिंग करणार

गुजरात टायटन्स प्लेइंग ईलेव्हन : शुबमन गिल (कर्णधार), साई सुदर्शन, जोस बटलर (विकेटकीपर), शेरफेन रदरफोर्ड, शाहरुख खान, राहुल तेवतिया, रशीद खान, रविश्रीनिवासन साई किशोर, कागिसो रबाडा, मोहम्मद सिराज आणि प्रसीद कृष्णा.

मुंबई इंडियन्स प्लेइंग ईलेव्हन : रोहित शर्मा, रायन रिकेल्टन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या (कर्णधार), टिळक वर्मा, नमन धीर, मिचेल सँटनर, दीपक चहर, ट्रेंट बोल्ट, मुजीब उर रहमान आणि सत्यनारायण राजू.

टोळक्यासोबत डान्स, अन् गर्दीवर पैशांची उधळण; कुख्यात टिपूचा व्हिडिओ
टोळक्यासोबत डान्स, अन् गर्दीवर पैशांची उधळण; कुख्यात टिपूचा व्हिडिओ.
राज्यात अवकाळी पावसाची हजेरी, शेती पिकांचं नुकसान
राज्यात अवकाळी पावसाची हजेरी, शेती पिकांचं नुकसान.
कांदा निर्यात शुल्क रद्द, पण अंमलबजावणी कधी?
कांदा निर्यात शुल्क रद्द, पण अंमलबजावणी कधी?.
बीड कारागृहात उरली फक्त कराड गँग; आठवले आणि गीते गँगचे गंभीर आरोप
बीड कारागृहात उरली फक्त कराड गँग; आठवले आणि गीते गँगचे गंभीर आरोप.
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला.
एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप
एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप.
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले.
दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर.., मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद
दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर.., मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद.
'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची
'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची.
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी.