Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

GT vs MI : मुंबईच्या प्लेइंग ईलेव्हनमध्ये बदल फिक्स, कॅप्टनही बदलणार, गुजरातविरुद्ध विजयी होणार?

Mumbai Indians Playing 11 Against Gujarat Titans IPL 2025 : मुंबई इंडियन्स शनिवारी 29 मार्चला गुजरात टायटन्सविरुद्ध अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये आपल्या मोहिमेतील दुसरा सामना खेळणार आहे.

GT vs MI : मुंबईच्या प्लेइंग ईलेव्हनमध्ये बदल फिक्स, कॅप्टनही बदलणार, गुजरातविरुद्ध विजयी होणार?
Vignesh Puthur and Suryakumar Yadav Mi Ipl 2025Image Credit source: @mipaltan x Account
Follow us
| Updated on: Mar 28, 2025 | 11:09 PM

मुंबई इंडियन्स 2013 पासून आयपीएल हंगामातील आपला पहिला सामना जिंकण्यात अपयशी ठरली. मुंबईने आयपीएलच्या 18 व्या मोसमातही पहिल्या सामन्यातील पराभवाची मालिका कायम ठेवली. मुंबईला 23 मार्चला चेन्नई सुपर किंग्सकडून पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर आता मुंबईचा या हंगामातील दुसरा सामना गुजरात टायटन्सविरुद्ध होणार आहे. गुजरातचही मुंबईसारखीच स्थिती आहे. गुजरातचीही या मोसमात पराभवाने सुरुवात झालीय. त्यामुळे दोन्ही संघांचा आपल्या दुसऱ्या सामन्यात विजयी ट्रॅकवर परतण्याचा प्रयत्न असणार आहे. उभयसंघातील सामना 29 मार्चला अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे.

मुंबईच्या प्लेइंग ईलेव्हनमध्ये पहिल्या पराभवानंतर बदल होणार असल्याचं निश्चित आहे. सूर्यकुमार यादव याने चेन्नई विरुद्ध मुंबईचं नेतृत्व केलं होतं. बीसीसीआयने आयपीएलच्या 17 व्या मोसमात मुंबईच्या शेवटच्या साखळी फेरीतील सामन्यात कर्णधार हार्दिक पंड्या याच्यावर स्लो ओव्हर रेटनुसार कारवाई केली. त्यामुळे हार्दिकला यंदाच्या हंगामातील सलामीच्या सामन्यात अर्थात चेन्नईविरुद्धच्या मॅचला मुकावं लागलेलं. मात्र आता हार्दिक सज्ज झाला आहे. हार्दिकच्या कमबॅकमुळे आता मुंबईच्या प्लेइंग ईलेव्हनमध्ये बदल होणार आहे.

कुणाचा पत्ता कट होणार?

दरम्यान हार्दिकच्या कमबॅकनंतर पलटणच्या प्लेइंग ईलेव्हनमधून कुणाचा पत्ता कट होणार? असा प्रश्न क्रिकेट चाहत्यांना पडला आहे. हार्दिकसाठी रॉबिन मिंझ याला प्लेइंग ईलेव्हनमधून बाहेरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो.

रोहितकडून मोठ्या खेळीची अपेक्षा

दरम्यान गुजरातविरुद्ध रोहित शर्माकडून मुंबईच्या चाहत्यांना मोठ्या खेळीची आशा असणार आहे. रोहित चेन्नईविरुद्ध ढेर झाला होता. रोहितला चेन्नईविरुद्ध भोपळाही फोडता आला नव्हता. त्यामुळे गुजरातविरुद्धच्या सामन्यात रोहितकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

गुजरात टायटन्स टीम: साई सुदर्शन, शुभमन गिल (कर्णधार), जोस बटलर (विकेटकीपर), राहुल तेवतिया, शाहरुख खान, अर्शद खान, रविश्रीनिवासन साई किशोर, रशीद खान, कागिसो रबाडा, मोहम्मद सिराज, प्रसीद कृष्णा, शेरफेन रदरफोर्ड, ग्लेन फिलिप्स, इशांत शर्मा, अनुज रावत, वॉशिंग्टन सुंदर, महिपाल लोमरोर, जयंत यादव, निशांत सिंधू, कुलवंत खेजरोलिया, करीम जनात, जेराल्ड कोएत्झी, मानव सुथार, कुमार कुशाग्रा आणि गुरनूर ब्रार.

मुंबई इंडियन्स टीम : रोहित शर्मा, रायन रिकेल्टन (डब्ल्यू), विल जॅक्स, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या (कर्णधार), तिलक वर्मा, रॉबिन मिन्झ, नमन धीर, मिचेल सँटनर, दीपक चहर, ट्रेंट बोल्ट, सत्यनारायण राजू, विघ्नेश पुथूर, राज बावा, अश्वनी कुमार, कॉर्बिन बॉश, कर्ण शर्मा, जसप्रीत बुमराह, रीस टोपले, मुजीब उर रहमान, बेव्हॉन जेकब्स, अर्जुन तेंडुलकर आणि कृष्णन श्रीजीथ

मुंबई इंडियन्स: हार्दिक पांड्या (कर्णधार), रियान रिकल्टन, विल जॅक्स, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, नमन धीर, मिचेल सँटनर, दीपक चाहर, ट्रेन्ट बोल्ट आणि सत्यनारायण राजू.

महाराष्ट्रात विमानाने यायचा, रेल्वेने सोलापूर गाठायचा अन् मग..
महाराष्ट्रात विमानाने यायचा, रेल्वेने सोलापूर गाठायचा अन् मग...
गोरेंच्या सुपुत्राचा प्रताप! भैय्या पाटलांनी ट्विट केला व्हिडिओ
गोरेंच्या सुपुत्राचा प्रताप! भैय्या पाटलांनी ट्विट केला व्हिडिओ.
कराडने अनेक छोटे-मोठे गुंड जेलमध्ये बोलावून घेतलेत; आव्हाडांचं ट्विट
कराडने अनेक छोटे-मोठे गुंड जेलमध्ये बोलावून घेतलेत; आव्हाडांचं ट्विट.
वाल्मिक कराडने जेलरच्या ऑफिसमध्ये बसून सगळं प्लॅनिंग केलं - मीरा गीते
वाल्मिक कराडने जेलरच्या ऑफिसमध्ये बसून सगळं प्लॅनिंग केलं - मीरा गीते.
कराडला, घुलेला मारहाण होत असताना, बबन गीतेने शेअर केली पोस्ट
कराडला, घुलेला मारहाण होत असताना, बबन गीतेने शेअर केली पोस्ट.
मारहाण घटनेनंतर महादेव गीतेसह चौघांची हर्सुल कारागृहात रवानगी
मारहाण घटनेनंतर महादेव गीतेसह चौघांची हर्सुल कारागृहात रवानगी.
'...अन् देशमुख हत्याप्रकरणातील आरोपी एकमेकांना संपवतील' - मनोज जरांगे
'...अन् देशमुख हत्याप्रकरणातील आरोपी एकमेकांना संपवतील' - मनोज जरांगे.
मारामारी थापड थुपडीची झाली, पण..; धस नेमकं काय म्हणाले
मारामारी थापड थुपडीची झाली, पण..; धस नेमकं काय म्हणाले.
लाडकी बहीणबंद होणार?सरकारकडे पैसे नाहीत?सत्ताधारी-विरोधकांमध्ये जुंपली
लाडकी बहीणबंद होणार?सरकारकडे पैसे नाहीत?सत्ताधारी-विरोधकांमध्ये जुंपली.
घरात वडील आजारी अन् काढणीला आलेलं पीक; चिमुकला करतोय शेताची राखण
घरात वडील आजारी अन् काढणीला आलेलं पीक; चिमुकला करतोय शेताची राखण.