GT vs PBKS : गुजरातने टॉस जिंकला, पंजाबची बॅटिंग की बॉलिंग? प्लेइंग ईलेव्हनमध्ये कोण?
Gujarat Titans vs Punjab Kings Toss Ipl 2025 : गुजरात टायटन्सने पंजाब किंग्सविरुद्ध नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये टॉस जिंकून दुसऱ्या डावात बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आहे.

अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये आयपीएलच्या 18 व्या मोसमातील (IPL 2025) पाचवा सामन्यात गुजरात टायटन्स विरुद्ध पंजाब किंग्स आमनेसामने आहेत. दोन्ही संघांचा हा या हंगामातील पहिला सामना आहे. सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. त्याआधी 7 वाजता टॉस करण्यात आला. गुजरातच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला. कर्णधार शुबमन गिल याने फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता श्रेयस अय्यरच्या नेतृत्वातील पंजाब किंग्स गुजरातच्या गोलंदाजांसमोर किती धावा करणार? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
हेड टु हेड रेकॉर्ड्स
गुजरात टायटन्स विरुद्ध पंजाब किंग्स या दोन्ही संघांचा हा एकमेकांविरूद्धचा सहावा सामना आहे. त्याआधी झालेल्या 5 पैकी 3 सामन्यात गुजरातने विजय मिळवला आहे. तर पंजाब किंग्सने 2 वेळा पलटवार केला आहे. त्यामुळे एका सामन्याचा अपवाद वगळता दोन्ही संघ जवळपास तुल्यबल आहेत. आता पंजाब किंग्सकडे या सामन्यात विजय मिळवून 3-3 अशी बरोबरी करण्याची संधी आहे.
कोण करणार विजयी सुरुवात?
पंजाब आणि गुजरात दोन्ही संघांची गेल्या हंगामातील कामगिरी निराशाजनक राहिली होती. दोन्ही संघांना 14 पैकी फक्त 5-5 सामनेच जिंकता आले होते. पंजाबने 9 सामने गमावले होते. तर गुजरातला 7 वेळा पराभवाचा सामना करावा लागला होता. गुजरातचे साखळी फेरीतील शेवटचे 2 सामने हे पावसामुळे रद्द करण्यात आले होते. दोन्ही संघांसाठी गेला हंगामा अनपेक्षित असा होता. त्यामुळे या मोसमात दोन्ही संघांचा चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न असणार आहे. त्याची सुरुवात या सलामी सामन्यात विजयाने करण्याचा प्रयत्न दोन्ही संघांचा असणार आहे.त्यामुळे या सामन्यात दोन्ही संघात चढाओढ पाहायला मिळणार आहे.
गुजरात टॉसचा बॉस
🚨 Toss 🚨@gujarat_titans have won the toss and opted to bowl first against @PunjabKingsIPL.
Updates ▶️ https://t.co/PYWUriwSzY#TATAIPL | #GTvPBKS pic.twitter.com/7GUAOWuOeR
— IndianPremierLeague (@IPL) March 25, 2025
गुजरात टायटन्स प्लेइंग ईलेव्हन : शुबमन गिल (कॅप्टन), जोस बटलर (विकेटकीपर), साई सुधारसन, शाहरुख खान, राहुल तेवतिया, आर साई किशोर, अर्शद खान, रशीद खान, कागिसो रबाडा, मोहम्मद सिराज आणि प्रसीद कृष्णा.
पंजाब किंग्ज प्लेइंग ईलेव्हन : श्रेयस अय्यर (कॅप्टन), प्रभसिमरन सिंग (विकेटकीपर), प्रियांश आर्य, शशांक सिंग, मार्कस स्टॉइनिस, ग्लेन मॅक्सवेल, सूर्यांश शेडगे, अजमतुल्ला ओमरझाई, मार्को जॅनसेन, अर्शदीप सिंग आणि युझवेंद्र चहल.