IPL 2025 GT vs PBKS Live Streaming : पंजाबसमोर गुजरातचं आव्हान, कोण देणार विजयी सलामी?
Gujarat Titans vs Punjab Kings, Live Streaming: गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्स दोन्ही संघ आयपीएलच्या 18 व्या मोसमातील आपला पहिला सामना खेळण्यासाठी सज्ज आहेत. जाणून घ्या सविस्तर.

आयपीएलच्या 18 व्या मोसमातील (IPL 2025) पाचव्या सामन्यात गुजरात जायंट्स विरुद्ध पंजाब किंग्स आमनेसामने असणार आहेत. दोन्ही संघांचा हा या मोसमातील पहिलाच सामना असणार आहे. शुबमन गिल गुजरातचं नेतृत्व करणार आहे. तर पंजाब नव्या कर्णधारासह नव्या मोसमाची सुरुवात करणार आहे. श्रेयस अय्यर पंजाबचं नेतृत्व करणार आहे. दोन्ही संघांनी जोरदार सराव केला आहे. त्यामुळे दोन्ही संघाचा या हंगामात विजयाने सुरुवात करण्याचा प्रयत्न असणार आहे. त्यामुळे दोन्ही संघात रस्सीखेच पाहायला मिळणार, हे निश्चित आहे. गुजरात विरुद्ध पंजाब सामना कुठे होणार? याबाबत सर्व काही जाणून घेऊयात.
गुजरात टायटन्स विरुद्ध पंजाब किंग्स सामना केव्हा?
गुजरात टायटन्स विरुद्ध पंजाब किंग्स सामना मंगळवारी 25 मार्चला खेळवण्यात येणार आहे.
गुजरात टायटन्स विरुद्ध पंजाब किंग्स सामना कुठे?
गुजरात टायटन्स विरुद्ध पंजाब किंग्स सामन्याचं आयोजन अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे.
गुजरात टायटन्स विरुद्ध पंजाब किंग्स सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?
गुजरात टायटन्स विरुद्ध पंजाब किंग्स सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होईल. तर 7 वाजता टॉस होईल.
गुजरात टायटन्स विरुद्ध पंजाब किंग्स सामना टीव्हीवर कुठे पाहायला मिळेल?
गुजरात टायटन्स विरुद्ध पंजाब किंग्स सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल.
गुजरात टायटन्स विरुद्ध पंजाब किंग्स सामना मोबाईलवर कुठे पाहता येईल?
गुजरात टायटन्स विरुद्ध पंजाब किंग्स सामना मोबाईलवर जिओ-हॉटस्टार एपवर पाहायला मिळेल.
पंजाब किंग्स टीम: जोश इंग्लिस (विकेटकीपर), प्रभसिमरन सिंग, श्रेयस अय्यर (कॅप्टन), ग्लेन मॅक्सवेल, नेहल वढेरा, मार्कस स्टॉइनिस, शशांक सिंग, मार्को जॅनसेन, हरप्रीत ब्रार, अर्शदीप सिंग, युझवेंद्र चहल, विजयकुमार वैशाख, प्रवीण दुबे, लॉकी फर्ग्युसन, झेवियर बार्टलेट, विष्णू विनोद, यश ठाकूर, आरोन हार्डी, अजमतुल्ला ओमरझाई, कुलदीप सेन, प्रियांश आर्य, सूर्यांश शेडगे, हरनूर सिंग, मुशीर खान आणि पायला अविनाश.
गुजरात टायटन्स टीम: जोस बटलर (विकेटकीपर), शुबमन गिल (कर्णधार), साई सुदर्शन, ग्लेन फिलिप्स, शाहरुख खान, वॉशिंग्टन सुंदर, राहुल तेवतिया, रशीद खान, रविश्रीनिवासन साई किशोर, कागिसो रबाडा, मोहम्मद सिराज, प्रसीध कृष्णा, इशांत शर्मा, जयंत यादव, महिपाल लोमरोर, करीम जनात, कुलवंत खेजरोलिया, अनुज रावत, जेराल्ड कोएत्झी, शेरफेन रदरफोर्ड, मानव सुथार, कुमार कुशाग्रा, अर्शद खान, गुरनूर ब्रार आणि निशांत सिंधू.