IPL 2025 GT vs PBKS : पंजाब किंग्स आणि गुजरात टायटन्स आमनेसामने, अशी असू शकते प्लेइंग 11
आयपीएल 2025 स्पर्धेतील पाचवा सामना गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्स यांच्यात होणार आहे. या सामन्याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. पंजाब किंग्स श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात मैदानात उतरणार आहे. चला जाणून घेऊयात या सामन्यातील संभाव्य प्लेइंग 11 बाबत

पंजाब किंग्स आणि गुजरात टायटन्स आयपीएल 2025 स्पर्धेतील पहिला सामना खेळणार आहे. दोन्ही संघ विजयी सुरुवात करण्यासाठी उत्सुक असतील यात काही शंका नाही. गुजरात टायटन्सने 2022 मध्ये जेतेपद मिळवलं होतं. पण पंजाब किंग्सची झोळी रितीच आहे. त्यामुळे पंजाब किंग्सने गतविजेत्या कोलकात्या संघाचा कर्णधार असलेल्या श्रेयस अय्यरवर डाव लावला आहे. श्रेयस अय्यरच्या खांद्यावर आता पंजाब किंग्सची धुरा असणार आहे. त्यामुळे श्रेयस अय्यरच्या खांद्यावर आता जेतेपद मिळवून देण्याची मोठी जबाबदारी असणार आहे. पंजाब किंग्सने आयपीएल 2018 उपांत्य फेरीत आणि 2014 च्या अंतिम फेरीत जागा मिळवली होती. पण जेतेपदाचं स्वप्न काही पूर्ण करता आलं नाही. दुसरीकडे, शुबमन गिलच्या नेतृत्वात गुजरात टायटन्सचं मागचं पर्व काही खास नव्हतं. गुणतालिकेत आठव्या स्थानी समाधान मानावं लागलं होतं. त्यामुळे या सामन्यात गिल आणि अय्यर सामना पाहायला मिळणार आहे.
गुजरातकडे शुबमन गिल आणि जोस बटलर ही जबरदस्त जोडी आहे. मधल्या फळीत शेफरेन रूदरफोर्ड, साई सुदर्शन आणि मसून शाहरूख खान आहेत. तर अष्टपैलू राशिद खान, राहुल तेवतिया, ग्लेन फिलिप्स, वॉशिंग्टन सुंदर आणि महिपाल लोमरोर आहेत. गोलंदाजीत मोहम्मद सिराज आहे. तर कागिसो रबाडा, प्रसिद्ध कृष्णा, गेराल्ड कोएत्झे आणि इशांत शर्मा आहेत.
पंजाब किंग्सच्या फलंदाजीची धुरा कर्णधार अय्यर, जोश इंग्लिस, प्रभसिमरन सिंग, मार्कस स्टोयनिस आणि ग्लेन मॅक्सवेलवर अवलंबून असेल. तर अझमतुल्ला उमरझाई, स्टोइनिस, मार्को जानसेन, शशांक सिंग आणि मुशीर खानसारखे अष्टपैलू खेळाडू आहेत. गोलंदाजीची धुरा अर्शदीप सिंगच्या खांद्यावर असेल. तसेच लॉकी फर्ग्युसन, कुलदीप सेन आणि यश ठाकूर वेगवान गोलंदाज आहे.फिरकीची जबाबदारी युजवेंद्र चहल आणि हरप्रीत ब्रार खांद्यावर असेल.
दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग 11
गुजरात टायटन्स: शुबमन गिल (कर्णधार), जोस बटलर (यष्टीरक्षक), साई सुदर्शन, ग्लेन फिलिप्स, राहुल तेवतिया, वॉशिंग्टन सुंदर, रशीद खान, मोहम्मद सिराज, साई किशोर, कागिसो रबाडा, प्रसिद्ध कृष्णा.
पंजाब किंग्स: प्रभसिमरन सिंग, जोश इंग्लिस (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर (कर्णधार), मार्कस स्टोइनिस, ग्लेन मॅक्सवेल, शशांक सिंग, नेहल वधेरा, मार्को जानसेन, हरप्रीत ब्रार, अर्शदीप सिंग, युजवेंद्र चहल.