GT vs PBKS : श्रेयस-शशांकचा तडाखा, अखेरच्या 5 ओव्हरमध्ये जोरदार फटकेबाजी, गुजरातसमोर 244 रन्सचं टार्गेट
Gujarat Titans vs Punjab Kings 1st Innings Highligts : पंजाबच्या फलंदाजांनी गुजरात टायटन्सच्या गोलंदाजांची धुलाई करत पहिल्याच सामन्यात 240 पार मजल मारली आहे.

पंजाब किंग्स टीमने गुजरात टायटन्ससमोर आयपीएलच्या 18 व्या मोसमातील पाचव्या सामन्यात 244 धावांचं आव्हान ठेवलं आहे. पंजाबने अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये 20 षटकांत 5 विकेट्स गमावून 243 धावा केल्या. पंजाबसाठी कॅप्टन श्रेयस अय्यर याने सर्वाधिक धावा केल्या. ओपनर प्रियांश आर्या याने 47 धावांचं योगदान दिलं. तर अखेरच्या क्षणी शशांक सिंह याने श्रेयस अय्यरसह तोडफोड बॅटिंग करत पंजाबला 240 पोहचवलं. शशांकने नॉट आऊट 44 रन्स केल्या. पंजाबने यासह इतिहास घडवला. पंजाबची ही दुसरी सर्वोच्च धावसंख्या ठरली. आता गुजरात या धावांचा पाठलाग करणार का? याकडे सर्वांचं लक्ष आहे.
त्याआधी प्रभसिमरन सिंह 5, प्रियांश आर्या 47 आणि अझमतुल्लाह ओमरझई याने 16 धावा केल्या. तर ग्लेन मॅक्सवेल आला तसाच गेला. मॅक्सवेल पहिल्याच बॉलवर आऊट झाला. त्यानंतर पंजाबला 162 धावांवर पाचवा झटका लागला. मार्कस स्टोयनिस 20 धावांवर (15.2 ओव्हर) बाद झाला. स्टोयनिस आऊट झाल्यानंतर शशांक सिंह मैदानात आला. शशांकने श्रेयसला दुसऱ्या बाजूने अप्रतिम साथ दिली. त्यामुळेच पंजाबला 240 पार मजल मारता आली.
सहाव्या विकेटसाठी 81 धावांची भागीदारी
शशांक सिंह आणि श्रेयस अय्यर या दोघांनी अखेरच्या 28 बॉलमध्ये तोडफोड बॅटिंग केली. दोघांनी मैदानात चौफेर फटकेबाजी केली. दोघांनी फक्त 28 चेंडूत नाबाद 81 धावांची नाबाद भागीदारी केली आणि पंजाबला 243 धावांपर्यंत पोहचवलं. श्रेयस अय्यर याने 42 बॉलमध्ये 9 सिक्स आणि 5 फोरसह नॉट आऊट 97 रन्स केल्या. तर शशांकने 16 चेंडूत 2 षटकार आणि 6 चौकारांच्या मदतीने नाबाद 44 धावा केल्या. तसेच गुजरात टायटन्सकडून साई किशोर याने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तर कगिसो रबाडा आणि राशिद खान या दोघांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.
पंजाबच्या 243 धावा
𝐇𝐢𝐠𝐡𝐞𝐬𝐭-𝐞𝐯𝐞𝐫 𝐈𝐏𝐋 𝐭𝐨𝐭𝐚𝐥 𝐚𝐭 𝐭𝐡𝐞 𝐍𝐚𝐫𝐞𝐧𝐝𝐫𝐚 𝐌𝐨𝐝𝐢 𝐒𝐭𝐚𝐝𝐢𝐮𝐦. 🔥
Let’s get the job done with the ball 💪#PunjabKings #IPL2025 #GTvPBKS #BasJeetnaHai pic.twitter.com/bSjppJ02hT
— Punjab Kings (@PunjabKingsIPL) March 25, 2025
गुजरात टायटन्स प्लेइंग ईलेव्हन : शुबमन गिल (कॅप्टन), जोस बटलर (विकेटकीपर), साई सुदर्शन, शाहरुख खान, राहुल तेवतिया, आर साई किशोर, अर्शद खान, रशीद खान, कागिसो रबाडा, मोहम्मद सिराज आणि प्रसीद कृष्णा.
पंजाब किंग्ज प्लेइंग ईलेव्हन : श्रेयस अय्यर (कॅप्टन), प्रभसिमरन सिंग (विकेटकीपर), प्रियांश आर्य, शशांक सिंग, मार्कस स्टॉइनिस, ग्लेन मॅक्सवेल, सूर्यांश शेडगे, अजमतुल्ला ओमरझाई, मार्को जॅनसेन, अर्शदीप सिंग आणि युझवेंद्र चहल.