Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2025 : केकेआरला मोठा धक्का, वेगवान गोलंदाज 18 व्या मोसमातून दुखापतीमुळे बाहेर, या खेळाडूचा समावेश

IPL 2025 KKR : गतविजेता कोलकाता नाईट रायडर्सला 18 व्या मोसमाच्या काही दिवसांआधी झटका लागला आहे. केकेआरचा वेगवान गोलंदाजाला दुखापतीमुळे या हंगामातून बाहेर पडावं लागलं आहे.

IPL 2025 : केकेआरला मोठा धक्का, वेगवान गोलंदाज 18 व्या मोसमातून दुखापतीमुळे बाहेर, या खेळाडूचा समावेश
KKR IPL 2025Image Credit source: @KKRiders X Account
Follow us
| Updated on: Mar 17, 2025 | 4:03 PM

आयपीएलच्या 18 व्या मोसमाला शनिवार 22 मार्चपासून सुरुवात होणार आहे. या 18 व्या हंगामासाठी एकूण 10 संघांनी आपल्या पद्धतीने सुरुवात केली आहे. सर्व खेळाडू या हंगामासाठी सज्ज झाले आहेत. अशात गतविजेत्या कोलकाता नाईट रायडर्सला मोठा झटका लागला आहे. केकेआरचा वेगवान गोलंदाज दुखापतीमुळे या संपूर्ण हंगामातून बाहेर पडला आहे. त्यामुळे केकेआर टीम मॅनजमेंटचं टेन्शन वाढलं आहे. ‘जम्मू एक्सप्रेस’ म्हणून ओळखला जाणारा उमराम मलिक याला दुखापतीमुळे या हंगामातून बाहेर पडावं लागलं आहे. इंडियन प्रीमियर लीगकडून याबाबतची माहिती सोशल मीडियावरुन देण्यात आली आहे. आयपीएलने प्रसिद्धी पत्रकाद्वारे बदली खेळाडूचंही नाव जाहीर करण्यात आलं आहे.

कुणाला संधी?

उमरान मलिक याच्या जागी केकेआर संघात डावखुरा वेगवान गोलंदाज चेतन साकरिया याला संधी दिली आहे. चेतन साकरिया याला 75 लाख रुपयांत केकेआरने आपल्या गोटात घेतलं आहे. उमरानला झालेल्या दुखापतीमुळे चेतनला ही संधी मिळाली. त्यामुळे उमरानची दुखापत चेतनच्या पथ्यावर पडली, असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही.

चेतन साकरिया याने टीम इंडियाचं मोजक्याच सामन्यात प्रतिनिधित्व केलं आहे.चेतनने टीम इंडियाकडून 1 एकदिवसीय आणि 2 टी 20i सामने खेळले आहेत. तसेच चेतनने आयपीएलमध्ये 19 सामने खेळले आहेत. चेतनने आयपीएलमधील 19 सामन्यांमध्ये 20 विकेट्स घेतल्या आहेत.

चेतन मेगा ऑक्शनमध्ये अनसोल्ड राहिला होता. मात्र त्यानंतर कोलकाता नाईट रायडर्सने चेतनला नेट बॉलर म्हणून संघात घेतलं होतं.आता चेतनला मुख्य संघात संधी मिळाली आहे.

उमरान मलिक ‘आऊट’

कोलकाताचा पहिला सामना केव्हा?

दरम्यान गतविजेता कोलकाता आयपीएलच्या 18 व्या मोसमातला पहिलाच सामना खेळणार आहे. कोलकाता या हंगामातील पहिल्याच सामन्यात बंगळुरुविरुद्ध भिडणार आहे. हा सामना कोलकातामधील ऐतिहासिक ईडन गार्डनमध्ये खेळवण्यात येणार आहे.

अजिंक्य रहाणेकडे नेतृत्व

दरम्यान अजिंक्य रहाणे 18 व्या मोसमात कोलकाता नाईट रायडर्सचं नेतृत्व करणार आहे. केकेआरने रहाणेला दीड कोटीत आपल्या ताफ्यात घेतलं. त्यानंतर केकेआरने रहाणेला कर्णधारपदाची जबाबदारी दिली.

कोलकाता नाईट रायडर्स टीम : अजिंक्य रहाणे (कर्णधार), सुनील नरेन, आंद्रे रसेल, वरुण चक्रवर्ती, हर्षित राणा, रमनदीप सिंह, रिंकू सिंह, वेंकटेश अय्यर, क्विंटन डी कॉक, रहमानुल्लाह गुरबाज, एनरिक नॉर्खिया, अंगकृष रघुवंशी, वैभव अरोरा, मयंक मार्कंडेय, मनीष पांडे, रोवमन पॉवेल, स्पेन्सर जॉनसन, अनुकूल रॉय, उमरान मलिक, मोईन अली आणि लवनीथ सिसोदिया.

जळगावात दोन गटात तूफान राडा
जळगावात दोन गटात तूफान राडा.
नितेश राणेंकडून विधानपरिषदेत नार्वेकरांचा मित्र म्हणून उल्लेख
नितेश राणेंकडून विधानपरिषदेत नार्वेकरांचा मित्र म्हणून उल्लेख.
आरोपी गौरव अहुजाचा येरवडामध्ये मुक्काम वाढला
आरोपी गौरव अहुजाचा येरवडामध्ये मुक्काम वाढला.
तृप्ती देसाईंसोबत काय झाली चर्चा? धनंजय देशमुखांनी दिली प्रतिक्रिया
तृप्ती देसाईंसोबत काय झाली चर्चा? धनंजय देशमुखांनी दिली प्रतिक्रिया.
फडणवीसांची औरंगजेबाशी तुलना! 'त्या' वक्तव्यानंतर सपकाळ आता म्हणताय...
फडणवीसांची औरंगजेबाशी तुलना! 'त्या' वक्तव्यानंतर सपकाळ आता म्हणताय....
औरंगजेबाच्या कबरीवरून वातावरण तापलं, बघा कुठं, कसा झाला अंत?
औरंगजेबाच्या कबरीवरून वातावरण तापलं, बघा कुठं, कसा झाला अंत?.
स्वारगेट प्रकरणातील पीडितेनं DCM शिंदेंकडे केली एकच मागणी, म्हणाली...
स्वारगेट प्रकरणातील पीडितेनं DCM शिंदेंकडे केली एकच मागणी, म्हणाली....
'जिसे, निभा ना सकू..', अजितदादांची शायरीतून विरोधकांना टोलेबाजी
'जिसे, निभा ना सकू..', अजितदादांची शायरीतून विरोधकांना टोलेबाजी.
पटोलेंच्या ऑफरवर दादांनी उडवली खिल्ली, 'तुम्ही कशाचा पाठिंबा देताय...'
पटोलेंच्या ऑफरवर दादांनी उडवली खिल्ली, 'तुम्ही कशाचा पाठिंबा देताय...'.
औरंगजेबाच्या कबरीचं प्रकरण तापलं; बजरंग दलाचं राज्यभरात आंदोलन
औरंगजेबाच्या कबरीचं प्रकरण तापलं; बजरंग दलाचं राज्यभरात आंदोलन.