KKR vs RCB : सॉल्ट-विराटचं अर्धशतक, आरसीबीची विजयी सलामी, केकेआरचा 7 विकेट्सने धुव्वा
Kolkata Knight Riders vs Royal Challengers Bengaluru Match Result : विराट कोहली याच्या धमाकेदार खेळीच्या जोरावर आरसीबीने गतविजेत्या केकेआरचा घरच्या मैदानात 7 विकेट्सने धुव्वा उडवला आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने आयपीएलच्या 18 व्या मोसमात विजयी सलामी दिली आहे. आरसीबीने रजत पाटीदार याच्या नेतृत्वात कोलकाता नाईट रायडर्सचा 7 विकेट्सने धुव्वा उडवला आहे. केकेआरने आरसीबीला विजयासाठी 175 धावांचं आव्हान दिलं होतं. आरसीबीने विजयी आव्हान हे 22 चेंडूआधीच पूर्ण केलं. आरसीबीने 16.2 ओव्हरमध्ये 3 विकेट्स गमावून 177 धावा केल्या. आरसाबीने हे आव्हान फिल सॉल्ट, विराट कोहली आणि रजत पाटीदार या त्रिकुटाच्या स्फोटक खेळीच्या जोरावर पूर्ण केलं.
आरसीबीची अप्रतिम सलामी भागीदारी
विराट कोहली आणि फिलिप सॉल्ट या सलामी जोडीने आरसीबीला शानदार सुरुवात करुन दिली. या दोघांनी 95 धावांची भागीदारी केली. त्यानंतर फिलीप सॉल्ट आऊट झाला.सॉल्टने 31 बॉलमध्ये 2 सिक्स आणि 9 फोरसह 56 रन्स केल्या. त्यानंतर देवदत्त पडीक्कल 10 धावा करुन माघारी परतला.
देवदत्त आऊट झाल्यानंतर कर्णधार रजत पाटीदार आणि विराट कोहली या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 44 धावांची भागीदारी केली. रजतने कर्णधार म्हणून पहिल्या सामन्यात स्फोटक खेळी केली. रजतने 16 चेंडूत 1 षटकार आणि 5 चौकारांसह 34 धावा केल्या. रजतने या झंझावाती खेळीसह आरसीबीला विजयाच्या आणखी जवळ आणून ठेवलं. त्यानंतर विराट आणि लियाम लिविंगस्टोन या जोडीने आरसीबीला विजयापर्यंत पोहचवलं.
विराटने आरसीबीच्या विजयात प्रमुख भूमिका बजावत सर्वाधिक धावा केल्या. विराटने 36 बॉलमध्ये 3 सिक्स आणि 4 फोरसह नॉट आऊट 59 रन्स केल्या. तर लियामने 1 षटकार आणि 2 चौकारांसह नाबाद 15 धावा केल्या. केकेआरकडून सुनील नारायण, वैभव अरोरा आणि वरुण चक्रवर्ती या त्रिकुटाने प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली.
आरसीबीचा ‘विराट’ विजय, गतविजेत्या केकेआरची पराभवाने सुरुवात
Rain? Sure, our boys Reigned! 🤩
Took no prisoners tonight. Excellent start! 🧿❤️#PlayBold #ನಮ್ಮRCB #IPL2025 #KKRvRCB pic.twitter.com/ftaC54R9tv
— Royal Challengers Bengaluru (@RCBTweets) March 22, 2025
कोलकाता नाईट रायडर्स प्लेइंग ईलेव्हन : अजिंक्य रहाणे (कर्णधार), क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), व्यंकटेश अय्यर, रिंकू सिंग, अंगकृष रघुवंशी, सुनील नरेन, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, स्पेन्सर जॉन्सन, हर्षित राणा आणि वरुण चक्रवर्ती.
रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू प्लेइंग ईलेव्हन : रजत पाटीदार (कर्णधार), विराट कोहली, फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा, टीम डेव्हिड, कृणाल पंड्या, रसिक दार सलाम, सुयश शर्मा, जोश हेजलवुड आणि यश दयाल.