Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आयपीएल 2025 स्पर्धेतील त्या सामन्याला लागली होती नजर, शेवटी बीसीसीआयने घेतला निर्णय

आयपीएल 2025 स्पर्धेची उत्सुकता शिगेला पोहोचली असताना एका सामन्यांवर संकट वाढलं होतं. 6 एप्रिलचा सामना होणार की नाही अशी चर्चा रंगली होती. मात्र आता हे संकट टळलं असून बीसीसीआयने स्पर्धा सुरु होण्यापूर्वीच निर्णय घेतला आहे.

आयपीएल 2025 स्पर्धेतील त्या सामन्याला लागली होती नजर, शेवटी बीसीसीआयने घेतला निर्णय
Follow us
| Updated on: Mar 20, 2025 | 8:01 PM

आयपीएल 2025 स्पर्धा 22 मार्चपासून सुरु होणार आहे आणि अंतिम सामना 25 मे रोजी होणार आहे. या स्पर्धेचं वेळापत्रक दीड महिन्याआधीच जाहीर झालं होतं. मात्र या स्पर्धेतील 6 एप्रिलला होणाऱ्या सामन्यांवर संकट होतं. त्यामुळे बीसीसीआयने वेळीच पावलं उचलून वेळापत्रक बदललं आहे. कोलकाता नाईट रायडर्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात होणार होता. पण सुरक्षेच्या कारणास्तव या सामन्यावर सावट होतं. रामनवमीच्या दिवशी हा सामना होणार असल्याने प्रशासनाने हात वर केले होते. पुरेशी सुरक्षा पुरवू शकत नाही असं सांगितलं होतं. क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगालने कोलकाता पोलीस आणि स्थानिक प्रशासनाने दिलेल्या सूचनेनंतर ही माहिती दिली होती. बीसीसीआयचं या सूचनेमुळे टेन्शन वाढलं होतं. वेळापत्रक नियोजित असल्याने सामन्याची वेळ बदलणं खूपच कठीण होतं. पण बीसीसीआयने यावर वेळीच तोडगा काढला आहे.

कोलकाता नाईट रायडर्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यातील सामना 6 एप्रिलला कोलकात्याच्या ईडन गार्डनर मैदानात होणार होता. पण आता हा सामना सुरक्षेच्या कारणास्तव शिफ्ट केला आहे. आता हा सामना कोलकात्याऐवजी गुवाहाटीला होणार आहे. 6 एप्रिलला दुपारी 3.30 वाजता या सामन्याला सुरुवात होईल. तर दुसरा सामना सनरायझर्स हैदराबाद आणि गुजरात टायटन्स यांच्यात याच दिवशी होणार आहे. हा सामना हैदराबादमध्ये संध्या 7.30 वाजता सुरु होईल. या पर्वातील वेळापत्रकानुसार 12 दिवस डबल हेडर सामने असणार आहेत.

आयपीएल 2025 स्पर्धेत एकूण 10 संघ असून 65 दिवसात 74 सामने होणार आहेत. भारतातील 13 ठिकाणी हे सामने होणार आहेत. यापैकी 62 सामने हे संध्याकाळी असणार आहेत. तर 12 सामने दुपारी होणार आहेत. या स्पर्धेतील पहिला सामना 22 मार्चला होणार आहे. गतविजेता कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात हा सामना होणार आहे.

कबरीचा वाद सुरूच... NIA चं पथक संभाजीनगरात, 'पुरातत्व'चं संरक्षण अन्..
कबरीचा वाद सुरूच... NIA चं पथक संभाजीनगरात, 'पुरातत्व'चं संरक्षण अन्...
56 वरून वाद पेटला, चित्रा वाघांचा थेट इशारा; पुन्हा नादाला लागाल तर...
56 वरून वाद पेटला, चित्रा वाघांचा थेट इशारा; पुन्हा नादाला लागाल तर....
रेल्वेच्या तिन्ही मार्गावर उद्या ब्लॉक, 'या' वेळात प्रवास कराल तर...
रेल्वेच्या तिन्ही मार्गावर उद्या ब्लॉक, 'या' वेळात प्रवास कराल तर....
येत्या 48 तासात महाराष्ट्रावर मोठं संकट, 'या' राज्यांना IMD कडून अलर्ट
येत्या 48 तासात महाराष्ट्रावर मोठं संकट, 'या' राज्यांना IMD कडून अलर्ट.
'ज्याची जशी लायकी, तो तशी वक्तव्य करतो'.., चित्रा वाघ स्पष्टच बोलल्या
'ज्याची जशी लायकी, तो तशी वक्तव्य करतो'.., चित्रा वाघ स्पष्टच बोलल्या.
नागपूर राडा; चार आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
नागपूर राडा; चार आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी.
औरंगजेबाची कबर ही मराठ्यांच्या पराक्रमाचं स्मारक, राऊतांची प्रतिक्रिया
औरंगजेबाची कबर ही मराठ्यांच्या पराक्रमाचं स्मारक, राऊतांची प्रतिक्रिया.
तोंड उघडलं तरी घाणच बाहेर निघते; मेहबूब शेख यांची वाघ यांच्यावर टीका
तोंड उघडलं तरी घाणच बाहेर निघते; मेहबूब शेख यांची वाघ यांच्यावर टीका.
धार्मिक स्थळांना चोख बंदोबस्त; प्रार्थनेसाठी संचारबंदीतून शिथिलता
धार्मिक स्थळांना चोख बंदोबस्त; प्रार्थनेसाठी संचारबंदीतून शिथिलता.
सभागृहाची ऐसी तैसी करायचं काम सुरू आहे; जयंत पाटील संतापले
सभागृहाची ऐसी तैसी करायचं काम सुरू आहे; जयंत पाटील संतापले.