Mitchell Starc : हर्षित राणाला धमकावल्यानंतर मिचेल स्टार्कला मोठा धक्का, 13 कोटींचा फटका

Mitchell Starc : मिचेल स्टार्क याने टीम इंडियाचा पदार्पणवीर हर्षित राणा याला भीती दाखवली होती. मात्र त्यानंतर अवघ्या काही तासाभरातच स्टार्कला मोठा झटका लागला आहे.

Mitchell Starc : हर्षित राणाला धमकावल्यानंतर मिचेल स्टार्कला मोठा धक्का, 13 कोटींचा फटका
harshit rana and mitchell starcImage Credit source: PTI
Follow us
| Updated on: Nov 24, 2024 | 6:55 PM

टीम इंडियाच्या डेब्यूटंट हर्षित राणा याला पर्थ कसोटी सामन्यात धमकावणाऱ्या ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क याला मोठा झटका लागला आहे. मिचेल स्टार्क याला 13 कोटींचा फटका बसला आहे. मिचेल स्टार्क याने या पहिल्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या दिवशी बॅटिंग करताना हर्षित राणा याला धमकावलं होतं. हर्षित राणा मिचेलला बाऊन्सर टाकत होता. यावरुन “मी तुझ्यापेक्षाही वेगाने बॉलिंग करु शकतो, माझी स्मरणशक्ती फार चांगली आहे”, असं स्टार्क हर्षितला म्हणाला होता. त्यानंतर अवघ्या काही तासांनी स्टार्कला मोठा झटका लागला आहे.

नक्की काय झालं?

आयपीएलच्या आगामी 18 व्या मोसमासाठी सौदी अरेबिया येथील जेद्दाह येथे मेगा ऑक्शनमध्ये मिचेल स्टार्कला मोठा झटका लागला आहे. केकेआरने रिलीज केल्यानंतर स्टार्कने त्याची बेस प्राईज 2 कोटी ठेवली होती.  मिचेलचं नाव प्रमुख खेळाडूंच्या पहिल्या यादीत होतं. या यादीत 6 खेळाडूंची नावं होंती. ऑक्शनमध्ये स्टार्कवर बोली सुरु झाली. स्टार्क आयपीएलच्या 17 व्या मोसमातील सर्वात महागडा खेळाडू ठरला होता. स्टार्कला या मेगा ऑक्शनमध्ये मोठी रक्कम मिळण्याचा अंदाज होता. मात्र सर्व अंदाज चुकीचे ठरले. मिचेल स्टार्कवर फक्त 11 कोटी 75 लाख रुपयांची बोली लागली. दिल्लीने मिचेल स्टार्कला आपल्या ताफ्यात घेतलं. मिचेलला गेल्या हंगामाच्या तुलनेत यंदा 13 कोटींचा फटका बसला.

मिचेल स्टार्क दिल्ली कॅपिट्ल्सच्या गोटात

मिचेल स्टार्कसाठी गेल्या हंगामात सर्वात मोठी बोली लागली होती. तेव्हा कोलकाता नाईट रायडर्सने मिचेल स्टार्कसाठी 24 कोटी 75 लाख रुपये मोजले होते. मिचेल यासह आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळा़डू ठरलेला. मात्र वर्षभरातच स्टार्कला मोठा झटका लागला आहे.

मिचेल हर्षितला काय म्हणाला होता?

दरम्यान कोलकाता नाईट रायडर्सने मेगा ऑक्शनआधी एकूण 6 खेळाडू रिटेन केले होते. या 6 खेळाडूंमध्ये रिंकु सिंह, वरुण चक्रवर्थी, सुनील नरेन, आंद्रे रसेल, हर्षित राणा आणि रमनदीप सिंह यांचा समावेश आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.