IPL Mega Auction : ‘सॉरी श्रेयस..’, प्रिती झिंटाकडून श्रेयस अय्यरची माफी, पाहा व्हीडिओ

Preity Zinta On Shreyas Iyer : श्रेयस अय्यर हा आयपीएल स्पर्धेच्या इतिहासातील दुसरा सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. श्रेयस अय्यर याच्यसाठी पंजाब किंग्सने 26 कोटी 75 लाख रुपयांची बोली लावली.

IPL Mega Auction : ‘सॉरी श्रेयस..’, प्रिती झिंटाकडून श्रेयस अय्यरची माफी, पाहा व्हीडिओ
shreyas iyer and preity Zinta
Follow us
| Updated on: Nov 28, 2024 | 5:01 PM

सौदी अरेबिया येथील जेद्दाह शहरात 24 आणि 25 नोव्हेंबरला 2 दिवसीय आयपीएल 2025 मेगा ऑक्शन पार पडलं. या मेगा ऑक्शनमध्ये ऋषभ पंत हा आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला. तसेच 13 वर्षीय वैभव सूर्यवंशी यानेही भाव खाल्ला. वैभव सूर्यवंशी हा आयपीएल इतिहासातील सर्वात युवो कोट्यधीश ठरला. वैभवसाठी राजस्थानने 1 कोटी 10 लाख रुपये मोजले. तर टीम इंडियाचा विस्फोटक फलंदाज आणि गतविजेच्या केकेआरचा कर्णधार श्रेयस अय्यर हा दुसरा सर्वात महागडा खेळाडू ठरला. केकेआरने करारमुक्त केल्यानंतर पंजाब किंग्सने श्रेयसवर मोठी बोली लावत त्याला आपल्या गोटात घेतलं.

पंजाबने श्रेयससाठी 26 कोटी 75 लाख रुपये इतकी मोठी बोली बोलून आपल्याकडे घेतलं.मात्र काहीच वेळात अभिनेत्री आणि पंजाब किंग्सची को-ऑनर असलेली प्रिती झिंटा हीने श्रेयसला संपूर्ण रक्कम मिळणार नाही, असं म्हटलं आणि त्यासाठी अय्यरची ऑन कॅमेरा माफी मागतिली. नक्की काय झालं? तसेच प्रिती झिंटा हीने काय म्हटलं हे आपण जाणून घेऊयात.

आयपीएलचं मिनी ऑक्शन असो मेगा ऑक्शन, कायमच चाहत्यांना आणि क्रिकेट विश्वाला आधीचे रेकॉर्ड ब्रेक होणार, अशी आशा असते. यंदाही तसंच झालं. पंतसाठी 27 आणि श्रेयससाठी 26 कोटींपेक्षा मोठ्या रक्कमेची बोली लावण्यात आली. याबाबतच प्रिती झिंटा हीला प्रश्न करण्यात आला. यावर प्रिती झिंटा म्हणाली की, आयपीएलमध्ये होणारी प्रत्येक गोष्ट ही रेकॉर्ड ब्रेक होण्याचीच नेहमीपासून आशा आहे. इथेच प्रिती झिंटा म्हणाली की श्रेयसला संपूर्ण रक्कम मिळणार नाही.

प्रिती झिंटा काय म्हणाली?

प्रितीने श्रेयसला 26 कोटी रक्कम मिळण्याबाबतचा उच्चार करताच ब्रॉडकॉस्टर्सने तिला 27 कोटी (26.75 कोटी) किंमत असल्याचं दुरुस्त केलं. इथेच प्रिती झिंटाने डाव साधला आणि फिरकी घेण्याचा प्रयत्न केला. प्रितीने मस्करीत श्रेयसला सॉरी म्हणत त्याच्यावर ऑक्शनमध्ये लावण्यात आलेल्या बोलीच्या रक्कमेतून कर कापण्यात येईल, याचीही आठवण करुन दिली. प्रिती यानंतर हसू लागली. या सर्व प्रकाराचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

“सॉरी श्रेयस..”, प्रिती झिंटाचा व्हीडिओ

मेगा ऑक्शननंतर पंजाब टीम : शशांक सिंह आणि प्रभसिमरन सिंह, अर्शदीप सिंह, श्रेयस अय्यर, युजवेंद्र चहल, मार्कस स्टोयनिस, ग्लेन मॅक्सवेल, नेहाल वढेरा, विष्णु विनोद, विजयकुमार वैशाक, यश ठाकुर, हरप्रीत ब्रार, प्रवीण दुबे, पायला अविनाश, जेवियर बार्टलेट, सूर्यांश शेडगे, मुशीर खान, एरॉन हार्डी, प्रियांश आर्य, कुलदीप सेन, हरनूर पन्नू, अझमतुल्लाह ओमरझई, लॉकी फर्ग्युसन, जॉश इंग्लिस आणि मार्को यानसन.

'दमानियांना जे करायचं ते करू द्या...', गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल
'दमानियांना जे करायचं ते करू द्या...', गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल.
कल्याण अत्याचार प्रकरण, आरोपी विशाल गवळीच्या वकिलाला धमकी
कल्याण अत्याचार प्रकरण, आरोपी विशाल गवळीच्या वकिलाला धमकी.
बीडच्या फरार आरोपींचं प्रसिद्ध पत्रक जारी, नेमकं काय म्हटलंय?
बीडच्या फरार आरोपींचं प्रसिद्ध पत्रक जारी, नेमकं काय म्हटलंय?.
राऊतांना मातोश्रीवर धुतलं, खोलीत डांबलं? बातम्या व्हायरल; राऊत भडकले
राऊतांना मातोश्रीवर धुतलं, खोलीत डांबलं? बातम्या व्हायरल; राऊत भडकले.
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट, 'या' पाच प्रकारच्या बहिणींना आता...
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट, 'या' पाच प्रकारच्या बहिणींना आता....
'मेजर ध्यानचंद खेलरत्न'ची घोषणा, मनु भाकर-डी गुकेशसह कोणाचा सन्मान?
'मेजर ध्यानचंद खेलरत्न'ची घोषणा, मनु भाकर-डी गुकेशसह कोणाचा सन्मान?.
'आमच्याकडे आता गर्दी, आमच्यासोबत या असं आम्ही साळवींना म्हटलो नाही'
'आमच्याकडे आता गर्दी, आमच्यासोबत या असं आम्ही साळवींना म्हटलो नाही'.
'दादांच्या ताफ्यात वाल्मिक कराडची गाडी..' बीडच्या खासदाराचा गौप्यस्फोट
'दादांच्या ताफ्यात वाल्मिक कराडची गाडी..' बीडच्या खासदाराचा गौप्यस्फोट.
अंत्यविधीची तयारी सुरू अन् 'तो' जिवंत झाला; सिनेमात शोभेल अशी घटना
अंत्यविधीची तयारी सुरू अन् 'तो' जिवंत झाला; सिनेमात शोभेल अशी घटना.
ठाकरे गटाचे राजन साळवी भाजपच्या वाटेवर? होणाऱ्या चर्चांवर म्हणाले...
ठाकरे गटाचे राजन साळवी भाजपच्या वाटेवर? होणाऱ्या चर्चांवर म्हणाले....