Shardul Thakur : पालघरमधील ठाकुरला मोठा धक्का, लॉर्ड शार्दुल अनसोल्ड

Shardul Thakur Unsold : पालघर एक्सप्रेस म्हणून ओळखला जाणारा टीम इंडियाचा ऑलराउंडर शार्दूल ठाकुर हा आयपीएल 2025 मेगा ऑक्शनमध्ये अनसोल्ड राहिला आहे.

Shardul Thakur : पालघरमधील ठाकुरला मोठा धक्का, लॉर्ड शार्दुल अनसोल्ड
shardul thakur unsold ipl 2025 auction
Follow us
| Updated on: Nov 25, 2024 | 6:22 PM

आयपीएल 2025 मेगा ऑक्शनच्या दुसऱ्या दिवशी (25 नोव्हेंबर) टीम इंडियाचा स्टार ऑलराउंडर पालघर एक्सप्रेस आणि लॉर्ड या नावाने ओळखला जाणारा शार्दूल ठाकूर अनसोल्ड राहिला. सौदी अरेबिया येथील जेद्दाह शहरात मेगा ऑक्शनचं आयोजन करण्यात आलं आहे. ऑक्शनच्या पहिल्या दिवशी 84 पैकी 72 खेळाडू सोल्ड झाले. तर 12 खेळाडूंना कुणीच घेतलं नाही. त्यानंतर दुसऱ्या दिवसाच्या ऑक्शनला सुरुवात कॅप्ड फलंदाजांच्या फेरीपासून सुरुवात झाली. या फेरीमध्ये अजिंक्य रहाणे आणि पृथ्वी शॉ हे दोन्ही मुंबईकर फलंदाज अनसोल्ड राहिले.

कॅप्ड बॅट्समनंतर कॅप्ड ऑलराउंड खेळाडूंच्या फेरीला सुरुवात झाली. ऑक्शनर मल्लिका सागर यांनी शार्दूलचं नाव घेतलं. मात्र शार्दुलसाठी कुणीच इंटरेस्ट दाखवला नाही. ऑक्शनर यांनी शार्दुलवर बोली लावण्यापर्यंत वाट पाहिली. मात्र कोणत्याच टीमला शार्दुलला घेण्यात स्वारस्य नसल्याचं लक्षात आलं. त्यानंतर ऑक्शनर मल्लिका सागर यांनी शार्दूल ठाकुर अनसोल्ड असं जाहीर केलं. शार्दुलची बेस प्राईज 2 कोटी आहे. शार्दुल पहिल्या फेरीत अनसोल्ड राहिला. त्यामुळे या ऑक्शनमध्ये सर्वात शेवटी एक्सलरेशन राऊंडमध्ये शार्दुलला कुणी घेणार का? याकडे साऱ्यांचं लक्ष असणार आहे.

शार्दूलची गेल्या हंगामातील कामगिरी

शार्दुल ठाकुर आयपीएलच्या 17 व्या हंगामात (IPL 2024) चेन्नई सुपर किंग्सकडून खेळला. मात्र शार्दुलला त्याच्या ऑलराउंड या भूमिकेला न्याय देता आला नाही. शार्दुल 9 सामन्यांमध्ये 309 धावा देत फक्त 5 विकेट्सच मिळवल्या. तर शार्दुलला 21 धावाच करता आल्या. शार्दुलला कोणत्याही टीमने न घेण्यामागचं त्याची गेल्या हंगामातील कामगिरी हे प्रमुख कारणांपैकी एक आहे.

ऑलराउंडर शार्दूल ठाकुर अनसोल्ड

शार्दूल ठाकुर याची आयपीएल कारकीर्द

शार्दुल ठाकुर याने आयपीएलमध्ये आतापर्यंत 95 सामन्यांमध्ये अनेक संघांचं प्रतिनिधित्व केलं आहे. शार्दुलने 92 डावांमध्ये 94 विकेट्स घेतल्या आहेत. शार्दुलची 36 धावांच्या मोबदल्यात 4 विकेट्स ही आयपीएल कारकीर्दीतील सर्वोत्तम कामगिरी राहिली आहे. तसेच शार्दुलने 37 डावांमध्ये बॅटिंग करताना 1 अर्धशतक, 27 चौकार आणि 13 षटकारांच्या मदतीने 307 धावा केल्या आहेत.

'तुम्हारा तो वक्त है, हमारा दौर...', अब्दुल सत्तारांची शेरो शायरी
'तुम्हारा तो वक्त है, हमारा दौर...', अब्दुल सत्तारांची शेरो शायरी.
पवार कुटुंब एकत्र येणार? दादांच्या आईचं विठोबाकडे साकडं म्हणाल्या...
पवार कुटुंब एकत्र येणार? दादांच्या आईचं विठोबाकडे साकडं म्हणाल्या....
2025ला राज्यात कोणते प्रकल्प सुरू होणार?सरकारकडून या प्रकल्पाची घोषणा
2025ला राज्यात कोणते प्रकल्प सुरू होणार?सरकारकडून या प्रकल्पाची घोषणा.
ठाकरे गटाला मोठा धक्का? बडा नेता पक्षाला रामराम करण्याच्या तयारीत
ठाकरे गटाला मोठा धक्का? बडा नेता पक्षाला रामराम करण्याच्या तयारीत.
महायुतीच्या 9 मंत्र्यांनी अद्याप पदभार स्वीकरलाच नाही, कारण नेमकं काय?
महायुतीच्या 9 मंत्र्यांनी अद्याप पदभार स्वीकरलाच नाही, कारण नेमकं काय?.
'बजरंगाच्या छातीत राम तर माझ्या छातीत शरद पवार', झिरवाळ काय म्हणाले?
'बजरंगाच्या छातीत राम तर माझ्या छातीत शरद पवार', झिरवाळ काय म्हणाले?.
'केरळ मिनी पाक', नितेश राणेंच्या त्या वक्तव्याचा केरळच्या CMकडून निषेध
'केरळ मिनी पाक', नितेश राणेंच्या त्या वक्तव्याचा केरळच्या CMकडून निषेध.
नववर्षाच्या पहिल्या दिवशी राज ठाकरेंकडून आदेश,'माझ्या मनसैनिकांनो...'
नववर्षाच्या पहिल्या दिवशी राज ठाकरेंकडून आदेश,'माझ्या मनसैनिकांनो...'.
मस्साजोगच्या ग्रामस्थांचं सामूहिक जलसमाधी आंदोलन, मागणी नेमकी काय?
मस्साजोगच्या ग्रामस्थांचं सामूहिक जलसमाधी आंदोलन, मागणी नेमकी काय?.
भक्तीभावानं नवं वर्षाचं स्वागत; पंढरपूर, शिर्डीत भाविकांची मोठी गर्दी
भक्तीभावानं नवं वर्षाचं स्वागत; पंढरपूर, शिर्डीत भाविकांची मोठी गर्दी.