IPL 2025 Mega Auction : अजिंक्य रहाणे की रिंकु सिंह? दोघांपैकी कुणाला KKR चा कॅप्टन करायला हवं?

Kolkata Knight Riders IPL 2025 Captain : कोलकाता नाईट रायडर्सच्या गोटात एकूण 21 खेळाडू आहेत. श्रेयस अय्यर याला रिलीज केल्याने गतविजेता संघ नव्या कर्णधाराच्या प्रतिक्षेत आहे.

IPL 2025 Mega Auction : अजिंक्य रहाणे की रिंकु सिंह? दोघांपैकी कुणाला KKR चा कॅप्टन करायला हवं?
Rinku singh and ajinkya rahane kkr ipl 2025
Follow us
| Updated on: Nov 26, 2024 | 1:22 PM

आयपीएल 2025 मेगा ऑक्शनमध्ये 557 खेळाडूंमधून फक्त 182 खेळाडूंचीच निवड करण्यात आली. इतर 395 खेळाडू अनसोल्ड राहिल्याने दुर्देवी ठरले. ऋषभ पंत हा आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला. लखनऊने पंतला 27 कोटींमध्ये आपल्या ताफ्यात घेतलं. तर राजस्थानने सर्वात युवा 13 वर्षीय वैभव सूर्यवंशी याला 1 कोटी 10 लाख रुपयांमध्ये घेतलं. या मेगा ऑक्शननंतर सर्व 10 संघांचे खेळाडू निश्चित झाले. गतविजेत्या कोलकाताने आपल्या गोटात 21 खेळाडू घेतले. वेकंटेश अय्यर हा या ऑक्शनमधील एकूण तिसरा तर केकेआरचा सर्वात महागडा खेळाडू ठरला. केकेआरने वेंकटेश अय्यर याच्यासाठी 23 कोटी 75 लाख रुपयांची बोली लावली.

कोण होणार कॅप्टन?

कोलकाताची टीम या ऑक्शननंतर आणखी भक्कम दिसत आहे. श्रेयस अय्यर याने त्याच्या नेतृत्वात केकेआरला 12 वर्षांनंतर आयपीएल चॅम्पियन केलं होतं. मात्र केकेआरने श्रेयसला करारमुक्त केलं. तसेच केकेआरने श्रेयससाठी आरटीएम कार्डही वापरला नाही. त्यामुळे या हंगामात कोलकाताचं नेतृत्व कोण करणार? याकडे साऱ्यांचं लक्ष असणार आहे. कर्णधारपदासाठी रिंकु सिंह आणि अनुभवी अजिंक्य रहाणे या दोघांची नावं चर्चेत आहेत. केकेआरने रिंकूला रिटेन केलंय. तर रहाणेला पहिल्या फेरीत अनसोल्ड राहिल्यानंतर केकेआरने त्याला दुसर्‍या फेरीत 1.50 कोटी या बेस प्राईजमध्ये घेतलं.

अजिंक्य रहाणेला कॅप्टन्सीचा अनुभव

रिंकु सिंह कर्णधारपदासाठी फारच नवखा आहे. तर दुसऱ्या बाजूला अजिंक्य रहाणेला कर्णधारपदाचा तगडा अनुभव आहे. त्यामुळे रहाणे कर्णधारपदासाठी प्रबळ दावेदार आहे. मात्र रहाणेच्या वयाचा अंदाज घेत केकेआर त्याला ही मोठी जबाबदारी देणार का? हा मुद्दा देखील तितकाच महत्त्वाचा ठरणार आहे.

आयपीएल मेगा ऑक्शननंतर 18 व्या मोसमासाठी केकेआर टीम : रिंकू सिंह, वरुण चक्रवर्ती, सुनील नरेन, आंद्रे रसेल, हर्षित राणा, रमनदीप सिंह, वेंकटेश अय्यर, क्विंटन डी कॉक, रहमानुल्लाह गुरबाज, एनरिक नॉर्खिया, अंगकृष रघुवंशी, वैभव अरोरा, मयंक मार्कंडे, रोवमॅन पॉवेल, मनीष पांडे, स्पेन्सर जॉनसन, लवनिथ सिसोदिया, अजिंक्य रहाणे, अनुकूल रॉय, मोईन अली आणि उमरान मलिक.

सरकार कधी स्थापन होणार? दीपक केसरकरांनी थेटच सांगितलं... काय घडतंय?
सरकार कधी स्थापन होणार? दीपक केसरकरांनी थेटच सांगितलं... काय घडतंय?.
निवडणुका संपताच शासन आदेश जारी, रश्मी शुक्लांची पुन्हा नियुक्ती
निवडणुका संपताच शासन आदेश जारी, रश्मी शुक्लांची पुन्हा नियुक्ती.
शिंदेंचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा, काळजीवाहू CM म्हणून पाहणार कारभार
शिंदेंचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा, काळजीवाहू CM म्हणून पाहणार कारभार.
सत्तास्थापनेपूर्वी शिंदेंचं मोठं ट्विट, 'शिवसैनिकांनी एकत्र येऊ नये..'
सत्तास्थापनेपूर्वी शिंदेंचं मोठं ट्विट, 'शिवसैनिकांनी एकत्र येऊ नये..'.
नवा CM कोण? फडणवीसच मुख्यमंत्री होणार, हायकमांडचा ग्रीन सिग्नल?
नवा CM कोण? फडणवीसच मुख्यमंत्री होणार, हायकमांडचा ग्रीन सिग्नल?.
महाराष्ट्राचा CM कोण? 2-2-1 फॉर्म्युला ठरला? शिरसाट स्पष्ट म्हणाले...
महाराष्ट्राचा CM कोण? 2-2-1 फॉर्म्युला ठरला? शिरसाट स्पष्ट म्हणाले....
'30-40 कोटी खर्च, गुंडांचा वापर दडपशाही तरी पराभव अन् खापर दादांवर..'
'30-40 कोटी खर्च, गुंडांचा वापर दडपशाही तरी पराभव अन् खापर दादांवर..'.
पिपाणी अन तुतारीच कन्फ्यूजन, शरद पवार गटाच्या 9 उमेदवारांचे बाजले बारा
पिपाणी अन तुतारीच कन्फ्यूजन, शरद पवार गटाच्या 9 उमेदवारांचे बाजले बारा.
आदित्य ठाकरेंचा शब्द अंतिम... उद्धव ठाकरेंकडून मोठी जबाबदारी
आदित्य ठाकरेंचा शब्द अंतिम... उद्धव ठाकरेंकडून मोठी जबाबदारी.
मनसे महायुतीत जाणार? पराभवानंतर नेत्यांची राज ठाकरेंच्या पुढे भूमिका
मनसे महायुतीत जाणार? पराभवानंतर नेत्यांची राज ठाकरेंच्या पुढे भूमिका.