Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

CSK vs MI : मुंबईसमोर पहिल्याच सामन्यात सर्वात मोठं आव्हान, कॅप्टन सूर्यकुमार प्रतिक्षा संपवणार?

Chennai Super Kings vs Mumbai Indians Ipl 2025 : आयपीएलमधील सर्वात पहिली यशस्वी टीम मुंबई इंडियन्स 18 व्या मोसमातील मोहिमेतील पहिला सामना चेन्नईविरुद्ध खेळणार आहे. या सामन्यात मुंबईसमोर सर्वात मोठं आव्हान आहे. जाणून घ्या नक्की काय?

CSK vs MI : मुंबईसमोर पहिल्याच सामन्यात सर्वात मोठं आव्हान, कॅप्टन सूर्यकुमार प्रतिक्षा संपवणार?
Suryakumar Yadav MI Ipl 2025Image Credit source: Mipaltan x account
Follow us
| Updated on: Mar 23, 2025 | 5:17 PM

आयपीएलच्या 18 व्या मोसमाला (IPL 025) 22 मार्चपासून सुरुवात झाली. या हंगामतील सलामीच्या सामन्यात बंगळुरुने गतविजेता कोलकातावर मात करत विजयी सुरुवात केली. त्यानंतर आता रविवारी 23 मार्चला डबल हेडरचं आयोजन करण्यात आलं आहे. या डबल हेडरमधीर दुसऱ्या सामन्यात आयपीएलमधील 2 यशस्वी संघ आमनेसामने आहेत. चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात हा सामना होणार आहे. सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी एमए चिदंबरम स्टेडियममध्ये सुरुवात होणार आहे. ऋतुराज गायकवाड हा चेन्नईचं नेतृत्व करणार आहे. तर हार्दिक पंड्यावर बीसीसीआयने स्लो ओव्हर रेटमुळे एका सामन्याची बंदी घातली आहे. त्यामुळे सूर्यकुमार यादव पलटणच्या कर्णधारपदाची धुरा सांभाळणार आहे. सूर्यकुमारला या पहिल्याच सामन्यात इतिहास बदलण्याची संधी आहे. सूर्याकडे गेल्या 12 वर्षात रोहित आणि हार्दिकला कर्णधार म्हणून जमलं नाही ते करुन दाखवण्याची संधी आहे.

‘पलटण’ विजयी सुरुवात करण्यात अपयशी

मुंबई आणि चेन्नई या दोन्ही संघांचा आजचा हा या मोसमातील पहिलावहिला सामना आहे. त्यामुळे दोन्ही संघांचा हा सामना जिंकून विजयी सुरुवात करण्याचा प्रयत्न असणार आहे. मात्र मुंबईवर विजय मिळवण्याचा सर्वाधिक दबाव असणार आहे, त्याचं कारणही तसंच आहे. मुंबईला गेल्या 12 वर्षांपासून आयपीएल मोहिमेतील आपला पहिला सामना जिंकता आलेला नाही. त्यामुळे कर्णधार सूर्यकुमार मुंबईला विजयी करुन गेल्या 12 वर्षांची प्रतिक्षा संपवणार का? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

मुंबईने 2012 साली आयपीएल स्पर्धेत चेन्नईवर मात करत हंगामात विजयी सुरुवात केली होती. मात्र त्यानंतर मुंबईला 2013 पासून ते 2024 पर्यंत विजयी सुरुवात करता आलेली नाही. रोहित शर्माने मुंबईचं 2013 ते 2023 पर्यंत नेतृत्व केलं. रोहितने या दरम्यान मुंबईला आपल्या नेतृत्वात 5 वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकून दिली. मात्र रोहितला विजयी सुरुवात करुन देता आली नाही. तर 2024 मध्ये हार्दिक पंड्या हा देखील विजयी सुरुवात मिळवून देण्यात अपयशी ठरला. त्यामुळे आता सूर्यकुमार ही कामगिरी करणार का? याकडे साऱ्यांचं लक्ष असणार आहे.

हे सुद्धा वाचा

मुंबई इंडियन्स संघ: रोहित शर्मा, विल जॅक्स, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, नमन धीर, रायन रिकेल्टन, रॉबिन मिन्झ (विकेटकीपर), मिचेल सँटनर, जसप्रीत बुमराह, रीस टोपली, ट्रेन्ट बोल्ट, दीपक चहर, मुजीब उर रहमान, कृष्णन श्रीजीत, कर्ण शर्मा, कॉर्बिन बॉश, राजा बावा, अर्जुन तेंडुलकर, बेव्हॉन जेकब्स, अश्वनी कुमार, सत्यनारायण राजू आणि विघ्नेश पुथूर.

चेन्नई सुपर किंग्ज संघ: ऋतुराज गायकवाड (कर्णधार), डेव्हॉन कॉनव्हे, रचिन रवींद्र, विजय शंकर, रवींद्र जडेजा, शिवम दुबे, एमएस धोनी (विकेटकीपर), सॅम करन, आर अश्विन, मथीशा पाथिराना, कमलेश नागरकोटी, नॅथन एलिस, मुकेश चौधरी, राहुल त्रिपाठी, दीपक हुड्डा, खलील अहमद, जेमी ओव्हरटन, शेख रशीद, अंशुल कंबोज, श्रेयस गोपाल, नूर अहमद, गुर्जपनीत सिंग, रामकृष्ण घोष, आंद्रे सिद्धार्थ सी आणि वंश बेदी.

गीतेचा उपदेश याच संविधानात दाखवलेला आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
गीतेचा उपदेश याच संविधानात दाखवलेला आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
आव्हाड-राणे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमने-सामने, मग हस्तांदोलन अन्...
आव्हाड-राणे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमने-सामने, मग हस्तांदोलन अन्....
'...त्याला महाराष्ट्र बाहेर हाकला', कोणत्या मुद्द्यावरून कडूंचा संताप
'...त्याला महाराष्ट्र बाहेर हाकला', कोणत्या मुद्द्यावरून कडूंचा संताप.
वाल्मिक कराडच्या वकिलांनी आरोप मुक्तीसाठी केला अर्ज
वाल्मिक कराडच्या वकिलांनी आरोप मुक्तीसाठी केला अर्ज.
मुंबईत येत्या शनिवारपासून उकाडा तर 'या' महिन्यात धुव्वाधार बरसणार
मुंबईत येत्या शनिवारपासून उकाडा तर 'या' महिन्यात धुव्वाधार बरसणार.
'ठाणे, रिक्षा, चश्मा..', पुण्यात कुणाल कामराच्या समर्थनार्थ बॅनरबाजी
'ठाणे, रिक्षा, चश्मा..', पुण्यात कुणाल कामराच्या समर्थनार्थ बॅनरबाजी.
साडीवाली दीदी..शिंदेंनंतर भाजपच्या बड्या महिला नेत्यावर कामराचा निशाणा
साडीवाली दीदी..शिंदेंनंतर भाजपच्या बड्या महिला नेत्यावर कामराचा निशाणा.
पत्रकार परिषदेत उज्वल निकम यांचा मोठा दावा
पत्रकार परिषदेत उज्वल निकम यांचा मोठा दावा.
संभाजीराजे 'वाघ्या'बाबत म्हणाले, 'महाराजांना अग्नि दिला त्यावेळी...'
संभाजीराजे 'वाघ्या'बाबत म्हणाले, 'महाराजांना अग्नि दिला त्यावेळी...'.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढची सुनावणी 10 एप्रिलला
संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढची सुनावणी 10 एप्रिलला.