Jasprit Bumrah : जसप्रीत बुमराह या तारखेला खेळणार, हेड कोचकडून अधिकृत शिक्कामोर्तब, पलटणसाठी गूड न्यूज
Jasprit Bumrah Mumbai Indians Ipl 2025 : मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. मुंबईचा यॉर्करकिंग जसप्रीत बुमराह कोणत्या सामन्यातून मैदानात उतरणार? याबाबतची मोठी अपडेट समोर आली आहे.

आयपीएलच्या 18 व्या मोसमात मुंबई इंडियन्सची आतापर्यंत निराशाजनक कामगिरी राहिली आहे. मुंबई इंडियन्सनने आतापर्यंत या हंगामात 4 सामने खेळले आहेत. मुंबईला त्यापैकी फक्त 1 सामनाच जिंकता आला आहे. तर तब्बल 3 सामन्यांमध्ये पराभव स्वीकारावा लागला आहे. मुंबईचा या मोसमातील चौथा सामना हा सोमवारी 7 एप्रिलला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुविरुद्ध वानखेडे स्टेडियममध्ये होणार आहे. त्याआधी मुंबईच्या गोटातून मोठी बातमी समोर आली आहे. मुंबईचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह मैदानात केव्हा उतरणार? याबाबतची माहिती हेड कोच महेला जयवर्धने याने दिली आहे.
जसप्रीत बुमराह याला नववर्षाच्या सुरुवातीला ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील चौथ्या कसोटी सामन्यात दुखापत झाली होती. बुमराहला सिडनीत झालेल्या चौथ्या कसोटी सामन्यात पाठीच्या दुखापतीमुळे जवळपास सव्वा 3 महिने क्रिकेटपासून दूर रहावं लागलं. मात्र बुमराहने या दरम्यानच्या काळात दुखापतीतून बरं होण्यासाठी सर्व आवश्यक ते प्रयत्न केले. त्यानंतर बुमराह काही तासांआधी मुंबई टीममध्ये सामील झाला. त्यामुळे बुमराह मैदानात केव्हा दिसणार? याची उत्सूकता क्रिकेट चाहत्यांना होती. अखेर याचंही उत्तर मिळालं आहे.
बुमराह 6 एप्रिलला मुंबईच्या ट्रेनिंग कॅम्पसह जोडला गेला. बुमराहने शानदार बॉलिंग केली आणि तो आता आरसीबीविरुद्ध खेळण्यासाठी सज्ज आहे, अशी माहिती महेला जयवर्धनने दिली.
“बुमराह टीमसह जोडला गेला आहे. तो सराव करतोय. बुमराह आरसीबीविरुद्ध होणार्या सामन्यासाठी उपलब्ध असणार आहे. बुमराह काल रात्रीच एनसीकडून ना हरकत प्रमाणपत्र घेऊन आला होता. आता आमचे फिजिओ बुमराहवर लक्ष ठेवून आहे. बुमराह बॉलिंगचा सराव करत आहे”, अशी माहिती महेला जयवर्धने याने दिली.
‘आला रे आला’
🚨 JASPRIT BUMRAH WILL PLAY TOMORROW AGAINST RCB 🚨
– MI Coach confirmed Bumrah is available for selection. [Devendra Pandey/Press] pic.twitter.com/p74jm3nBqH
— Johns. (@CricCrazyJohns) April 6, 2025
मुंबई इंडियन्स टीम : रोहित शर्मा, रायन रिकेल्टन (विकेटकीपर), विल जॅक्स, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या (कर्णधार), तिलक वर्मा, रॉबिन मिन्झ, नमन धीर, मिचेल सँटनर, दीपक चहर, ट्रेंट बोल्ट, सत्यनारायण राजू, विघ्नेश पुथूर, राज बावा, अश्वनी कुमार, कॉर्बिन बॉश, कर्ण शर्मा, जसप्रीत बुमराह, रीस टोपले, मुजीब उर रहमान, बेव्हॉन जेकब्स, अर्जुन तेंडुलकर आणि कृष्णन श्रीजीथ.